मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतच्या महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवरील ट्वीटनंतर सर्वच स्तरातून तिच्यावर टीकेची झोड उठत आहे. तसेच, अनेकांनी तिला विरोध केला आहे. मुंबईकरांच्या विरोधानंतर कंगनाला आता उपरती झाल्याचं दिसत आहे. “मुंबईनं मला यशोदा आईसारखं स्वीकारलं, मुंबई माझी कर्मभूमी आहे”, असं ट्वीट कंगनाने ट्वीट केलंय.
कंगनाच्या ट्वीटनंतर शिवसेना, काँग्रेस, मनसे या पक्षांनी कंगनाला सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. अनेक नेत्यांनी कंगनावर टीकेची झोड उठवली. तर अनेक कलाकारांनीही कंगनाविरोधात त्यांचा निषेध नोंदवला आहे. इतकंच नाही तर मुंबईकरांनीही तिला विरोध केला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यानंतर आता कंगनाने आणखी एक ट्वीट केलं. “महाराष्ट्रासह माझ्या सर्व मित्रांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे कोणतेही शब्द नाहीत. त्यांना माझा हेतू माहित आहे आणि मला माझी कर्मभूमी असलेल्या मुंबईबाबत माझं प्रेम सिद्ध करायची गरज नाही, जिने मला यशोदा आईसारखं स्वीकारलं, जय मुंबई जय महाराष्ट्र”, असं ट्वीट कंगनाने केलं.
अभिनेत्री कंगना रनौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर सर्वच स्तरावरुन तिच्यावर टीकेची झोड उठत आहे. महाराष्ट्रातील शिवसेना, काँग्रेस, मनसे या पक्षांनी कंगनाला सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेनेच्या महिला आघाडीने तर कंगनाचा फोटो असलेल्या पोस्टरवर जोडो मारो आंदोलन केलं. त्यानंतर कंगनाने ट्विटरवर शिवसेनेवर नाव न घेता निशाणा साधला.