Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अंकुश शिंदेंना बढती, सोलापूरचे नवे पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

अंकुश शिंदेंना बढती, सोलापूरचे नवे पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे

Surajya Digital
Last updated: 2021/08/24 at 7:53 AM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची बढतीवर बदली झाली असून नवीन पोलीस आयुक्त म्हणून मूळचे सोलापूरचे दत्तात्रय कराळे यांची नियुक्ती झाली आहे. ते सध्या ठाणे येथे कार्यरत होते. काल सोमवारी रात्री उशिरा हे आदेश निघाले. अंकुश शिंदे यांनी चांगली कामगिरी केली होती. शहरवासियांनी त्यांना समाजमाध्यमांवर शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाने रात्री उशिरा राज्यातील काही आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यामध्ये सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे. अंकुश शिंदे यांना विशेष पोलीस महानिरीक्षक सुधार सेवा मुंबई या ठिकाणी पदोन्नती मिळाली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

त्यांच्या जागेवर ठाणे शहर अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांची सोलापूर शहर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मागील अनेक दिवसांपासून सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या बदलीची चर्चा ऐकण्यास मिळत होती. निश्चित त्यांना विशेष पोलीस महानिरीक्षक पदी पदोन्नती मिळेल अशी चर्चा होती त्या प्रमाणे त्यांना बढती मिळाली आहे.

नवे आयुक्त दत्तात्रय कराळे हे सोलापुरातील उत्तर तालुक्यातील देगाव येथील असल्याचे सांगितले जात आहे. ते मूळचे सोलापूरचे असल्याने शहरवासियांकडून अपेक्षा वाढल्या आहेत. ते लवकरच पदभार स्वीकारणार आहेत.

You Might Also Like

सोलापूर शहर-जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांत सरकार विरोधात खदखद

सोलापूर-मुंबई विमानसेवा महिन्यात सुरू करण्याचा प्रयत्न

सोलापूर एमआयडीसीत 56 बेकायदा बांधकामे

सोलापुरात इतर आजारांसाठी दाखल रुग्णांपैकी 7 जण कोरोना पॉझिटिव्ह

उजनी धरणात मुसळधार पावसामुळे अवघ्या ३ दिवसांत 12 टीएमसी पाणीसाठा;

TAGGED: #AnkushShinde #promoted #DattatrayaKarale #new #policecommissioner #Solapur, #अंकुशशिंदे #बढती #सोलापूर #नवे #पोलिसआयुक्त #दत्तात्रयकराळे
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘हा’ फॉर्म लवकर भरा, अन्यथा 7 लाखांचे नुकसान
Next Article ‘कोंबडीचोर नारायण राणे हाय हाय…’च्या सोलापुरात घोषणा, घातला चपलांचा हार

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?