Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुराप्पासह मुलीस कोरोनाची लागण; ट्वीट करुन दिली माहिती
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुराप्पासह मुलीस कोरोनाची लागण; ट्वीट करुन दिली माहिती

Surajya Digital
Last updated: 2020/08/03 at 9:21 AM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

बंगळुरु : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. येडियुरप्पा यांनीच ट्विटरवरुन यासंदर्भात खुलासा केला आहे. माझी प्रकृती ठीक असून खबरदारीचा उपाय म्हणून मी रुग्णालयामध्ये दाखल झालो आहे, अशी माहिती येडियुरप्पा यांनी ट्विटवरुन दिली आहे. त्यांच्या पाठोपाठ आता त्यांंच्या मुलीची सुद्धा कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, त्यांना मणिपाल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

येडियुरप्पा हे कोरोनाचा संसर्ग झालेले देशातील दुसरे मुख्यमंत्री आहेत. यापूर्वी २५ जुलै रोजी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही ट्विट करून मला करोनाची बाधा झाली आहे, अशी माहिती दिली होती.
मुख्यमंत्री बी.एस येडियुरप्पा यांनी स्वतः ट्विट करुन चाचणी पॉजीटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ‘मी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलो आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. यादरम्यान माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ला क्वारंटाइन करावं आणि निरीक्षण करावं’, असे आवाहन त्यांनी ट्वीट करत केले.

काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना करोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले होते त्याला २४ तासही उलटत नाहीत तोपर्यंतच कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस येडियुरप्पा यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यासह उत्तर प्रदेशचे भाजप अध्यक्षांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे.

You Might Also Like

‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल

राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!

ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले

युद्धविराम होताच इराणने भारताचे मानले जाहीर आभार

मोर्शीत चाकूच्या धाकावर फायनान्स कर्मचाऱ्यांना लुटले

TAGGED: #कर्नाटक #मुख्यमंञी #येडियुराप्पा #कोरोना #लागण #मणिपल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सांगलीत आज नवीन पॉझिटिव्ह 294 ची भर पडल्याने बाधितांच्या आकड्याने गाठला तीन हजाराचा टप्पा
Next Article भारत सरकारने आयपीएल दिली परवानगी; चिनी प्रायोजक विव्होमुळे #BoycottIPL या हॅशटॅग ट्रेंडिंगमधून नाराजी

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?