Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: करमाळ्यात बिबट्याने घेतला दुसरा बळी, बिबट्याला ठार मारण्याची मागणी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

करमाळ्यात बिबट्याने घेतला दुसरा बळी, बिबट्याला ठार मारण्याची मागणी

Surajya Digital
Last updated: 2020/12/05 at 10:39 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : अंजनडोह (ता. करमाळा) येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका विवाहित महिला ठार झाली आहे. ही घटना शनिवारी (ता. 5) सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. जयश्री दयानंद शिंदे (वय 25) असे मृत महिलेचे नाव आहे.

दोन दिवसांत दुसरा बळी बिबट्याने घेतला आहे. त्यामुळे करमाळा तालुक्‍यात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या बिबट्याला तत्काळ ठार मारण्याची मागणी केली जात आहे. अंजनडोहपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या गावडे वस्तीजवळ ही घटना घडली आहे.

तर बिबट्याला मारण्याचे आदेश मिळण्याची प्रक्रिया सुरू असून, लवकर आदेश मिळताच बिबट्याला ठार केले जाईल, अशी माहिती वन विभागाचे सहाय्यक वन संरक्षक संजय कडू यांनी दिली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

जयश्री शिंदे या दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास लिंबुणीच्या बागेत लिंबे गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. सायंकाळी सहा वाजल्या तरी जयश्री शिंदे घरी आल्या नाहीत म्हणून लिंबुणीच्या बागेत तिच्या शोधासाठी तिचे पती दयानंद शिंदे हे गेले असता जयश्री शिंदे या दिसून आल्या नाहीत.

त्यानंतर त्यांनी हाका मारल्या, मात्र कोणताच आवाज न आल्याने दयानंद शिंदे यांनी बागेत शोधाशोध सुरू केली असता त्यांना लिंबुणीच्या बागेत रक्त सांडलेले दिसून आले. तेथेच त्यांचे मुंडके पडलेले दिसले.

* आतापर्यंत आठबळीचे वृत्त

करमाळा तालुक्‍यात आलेला बिबट्या अहमदनगर, बीड जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्‍यात आला असल्याचा वन अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. अहमदनगर, बीड भागात बिबट्याने चार बळी घेतले आहेत. त्याठिकाणी पोलिस पथक तसेच वन विभागाचे अधिकारी पोहोचून अधिक माहिती घेत आहेत. तरी प्रत्येक गावातच लोकांनी जागृत राहावे अशा सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. आतापर्यत बिबट्याचा हल्ल्यात आठ जणांना आपला प्राण गमवावे लागला आहे. नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाच्या पिंजऱ्याला चकवा देत असुन दिवसेंदिवस हल्ले वाढत चालले आहे.

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #बिबट्या #हल्ला #करमाळा #दुसरा #बळी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अभिमानास्पद ! आदर पुनावाला ठरले ‘एशियन अॉफ द इयर’
Next Article महामानवाचे आर्थिक विचार…विनम्र अभिवादन

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?