बंगळूरू, 27 मे : कर्नाटकातील भाजपच्या 2 आमदारांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया’ केल्याच्या आरोपावरुन आमदार एसटी सोमशेखर आणि ए शिवराम हेब्बर यांना पक्षातून 6 वर्षांसाठी काढून टाकण्यात आल्याचे प्रदेशाध्यक्ष बी वाय विजयेंद्र यांनी दिली.
आमदार सोमशेखर आणि हेब्बर हे अनुक्रमे यशवंतपूर आणि येल्लापूर विधानसभा मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करतात. बहिष्कृत आमदारांनी त्वरित प्रतिक्रिया दिलेली नाही. ए शिवराम हेब्बर हे 2019 मध्ये जेडीएस-काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार पाडण्यासाठी 17 बंडखोर काँग्रेस आमदारांपैकी शिवराम हेबर हे एक होते. शिवराम हेब्बर यांच्यावर पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप होता. भाजपमध्ये येण्यापूर्वी शिवराम हेब्बर काँग्रेसमध्ये होते. कर्नाटकमध्ये गेल्या फेब्रुवारीमध्ये राज्यसभेच्या 4 जागांसाठी मतदान झाले.
या चार जागांपैकी काँग्रेसने 3 आणि भाजपने एक जागा जिंकली. व्हीप जारी असूनही, एसटी सोमशेखर यांनी काँग्रेस उमेदवार अजय माकन यांच्या बाजूने मतदान केले, ज्यामुळे भाजपला फक्त एकच जागा जिंकता आली. असा दावा केला जात आहे की सोमशेखर आणि हेब्बर हे पक्ष नेतृत्वावर कथितपणे नाराज होते. एसटी सोमशेखर हे कर्नाटकातील यशवंतपूर मतदारसंघाचे भाजप आमदार आहेत. तर शिवराम हेबर हे येल्लापूर मतदारसंघाचे भाजप आमदार आहेत. त्यांनी पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभाग असल्याचे नाकारले होते.