Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: वारकऱ्यांचा कार्तिकवारी करण्याचा निर्धार; भजन आंदोलन करुन दिला इशारा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रसोलापूर

वारकऱ्यांचा कार्तिकवारी करण्याचा निर्धार; भजन आंदोलन करुन दिला इशारा

Surajya Digital
Last updated: 2020/11/09 at 8:21 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : वारकरी परंपरेमध्ये “आषाढी कार्तिकी विसरू नका मज | सांगतसे गुज पांडुरंग || ” या उक्ती प्रमाणे वारी नित्य नेमाला खूप मोठे महत्व असून तो नेम निष्ठेने सांभाळला जातो. त्यामुळे कार्तिकवारी करण्याचा निर्धार महाराष्ट्रातील वारकऱ्यांनी घेतला असून त्यास परवानगी द्यावी.
या मागणीसाठी मंडळाचे वतीने श्री विठ्ठल रुक्मिणी यांचे स्मरण करून संत नामदेव महाराज व संत चोखामेळा महाराज यांना वंदन करून संत नामदेव महाराज पायरी समोर आज पंढरपूर येथे ” भजन आंदोलन ” करण्यात आले.

वारकरी भाविकांनी चैत्रवारी, रामनवमी, बीज, एकनाथ महाराज उत्सव, हनुमान जयंती,आषाढीवारी, श्रावण मास, अधिकमास,
गणेशोत्सव, नवरात्र हे सर्व उत्सव शासन सूचना स्वीकारून साजरे केले. महामारी कोरोनामुळे कुणीही शासन विरोधात भूमिका घेतली नाही. शासनाला आतापर्यंत सहकार्यच केले. परंतु सध्या बाजारपेठेसह सर्व दुकाने खुली केली आहेत. चित्रपट गृह, नाट्य गृह, जिम सर्व सुरु झाले आहे. बससेवा पूर्ण क्षमतेने सुरु झाली आहे. कोणतेच क्षेत्र खुले करण्याचे राहिले नाही.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

रुग्ण संख्या ही खूपच कमी होत आहे. त्यामुळे येणाऱ्या कार्तिक वारीमध्ये पारंपरिक दिंडी व पालखी घेऊन येणेसाठी किमान 50 भाविकांना अटी व नियम घालून परवानगी द्यावी. पंढरपूर बाहेरून येणाऱ्या दिंडीला पंढरपूरमध्ये नगर प्रदक्षिणा करण्यासाठी विशिष्ट कालावधी देऊन परवानगी द्यावी. तसेच आळंदी येथील समाधी सोहळा, आळंदी नगर प्रदक्षिणा, त्या उत्सवातील पारंपरिक कार्यक्रम करण्यासाठी परवानगी देऊन शासनाने दरवर्षी प्रमाणे नियोजन करावे. पंढरपूर ते आळंदी पायी जाणारे प्रत्येक दिंडीतील वारकऱ्यांची संख्या किमान 100 असावी. तसेच सुप्रसिद्ध मंदिर व इतर मंदिर असे दोन भाग करून नियमावली तयार करावी.

नित्यनेम करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व इतर मंदिर खुली करून सुप्रसिद्ध मंदिर टप्प्याटप्प्याने खुले करून कीर्तन, भजन व काकडा आरती करण्यासाठी नियम व अटी घालून परवानगी लवकरात लवकर जाहीर करावी, अन्यथा आझाद मैदान, मुंबई येथे आंदोलन केले जाईल याची नोंद घ्यावी, असे निवेदन अखिल भाविक वारकरी मंडळ यांचे कडून ईमेलद्वारे मुख्यमंत्री ठाकरे यांना देऊन सचिन ढोले साहेब (प्रांत अधिकारी पंढरपूर) यांना ही दिले आहे.

आजच्या भजन आंदोलनास प्रातीनीधीक स्वरूपात सुधाकर इंगळे महाराज (राष्ट्रीय अध्यक्ष ),बळीराम जांभळे (राष्ट्रीय सचिव ), जोतिराम चांगभले (जिल्हा अध्यक्ष ), माऊली भगरे (जिल्हा सह अध्यक्ष ), नागनाथ नवले महाराज (जिल्हा सहअध्यक्ष ),मोहन शेळके (जिल्हा सचिव ), कुमार गायकवाड (शहर संघटक ), महेश चोरमुले, निवृत्ती मोरे, गोपाल कोकरे (शहर अध्यक्ष मंगळवेढा ), मल्लिकार्जुन राजमाने (शहर उपाध्यक्ष मंगळवेढा ),सतीश पाटील ( तालुका उपाध्यक्ष मंगळवेढा ), अजिंक्य मोरे, अभिमन्यु डोंगरेमहाराज यांची उपस्थिती होती.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

TAGGED: #वारकऱ्यांचा #कार्तिकवारी #करण्याचानिर्धार #भजनआंदोलन #इशारा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भाजपने पदवीधर – शिक्षक मतदारसंघाचे चार उमेदवार केले जाहीर
Next Article शेतक-यांना दिलासा : अतिवृष्टीचे पहिल्या हप्त्यापोटी २२९७ कोटी वितरित करण्याचा आदेश

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?