पुणे, 20 ऑगस्ट – खडकवासला धरण साखळी परिसरात ९५ ते १०५ मिमी पावसाची नोंद झाली असून, साखळीतील चारही धरणे भरल्याने विसर्ग वाढविण्यात आला आहे. सध्या मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले जात असून ३५,३१० क्युसेक विसर्ग कायम ठेवण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी आणि पुणे मंडळाचे अधीक्षक अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली हा विसर्ग काटेकोरपणे नियंत्रणात ठेवला जात आहे. प्रत्येक तासाला पावसाचे प्रमाण आणि धरणातील पाण्याची पातळी तपासून नियोजन केले जात आहे.
खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे यांनी सांगितले की, रात्री उशिरा अतिवृष्टी झाली तरी विसर्ग वाढविण्याऐवजी तो तसाच सुरू ठेवण्याची शक्यता आहे. अधिकारी वर्ग धरण परिसरात थांबून परिस्थितीवर नियंत्रण ठेवत आहेत