Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा

admin
Last updated: 2025/06/27 at 4:11 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

तेहरान , 27 जून (हिं.स.)।इस्रायल आणि इराणमध्ये युद्धविराम जाहीर झाल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी गुरुवारी(दि.२६) इस्रायलविरुद्धच्यायुद्धात विजयाचा दावा केला आणि म्हटले की, इराणने अमेरिकेला जोरदार थोबाडीत मारली.अमेरिकेने इस्रायलला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. अमेरिकेच्या मध्यस्थीने मंगळवारी(दि.२४) लागू झालेल्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर खामेनी यांनी ही पहिलीच टिप्पणी आहे.

इराणच्या सरकारी दूरचित्रवाणीवर प्रसारित झालेल्या व्हिडिओ संदेशात खामेनी म्हणाले की, इस्लामिक रिपब्लिक विजयी झाला अन् अमेरिकेच्या थोबाडीत मारली. खामेनी यांनी आपल्या भाषणात अमेरिकेच्या मध्यस्थीवरही भाष्य केले. ते म्हणाले, अमेरिकेने हस्तक्षेप केला, कारण त्यांना वाटले की, जर त्यांनी हस्तक्षेप केला नाही, तर झिओनिस्ट राजवट (इस्रायल) पूर्णपणे नष्ट होईल. या युद्धाचा अमेरिकेला काहीच फायदा झाला नाही, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

१३ जून रोजी युद्ध सुरू झाल्यापासून सर्वोच्च नेते खामेनी यांनी १९ जून रोजी एक व्हिडिओ संदेश जारी केला, परंतु तो त्यांच्या बंकरमधूनच रेकॉर्ड करण्यात आला. त्यानंतर आता गुरुवारी(दि.२६) त्यांनी आणखी एक व्हिडिओ संदेश जारी केला, जो इराणी सरकारी चॅनेल आणि त्यांच्या सोशल मीडिया पेजवर टाकण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी इस्रायलवरील विजयाबद्दल आपल्या नागरिकांना अभिनंदन केले आणि हा ऐतिहासिक क्षण असल्याचे म्हटले.

दरम्यान, युद्ध सुरू झाल्यापासून सर्वोच्च नेते खामेनी सार्वजनिक ठिकाणी दिसले नव्हते. इस्रायलने इराणच्या अणु तळांवर हल्ला केल्याने युद्ध सुरू झाले. तेव्हापासून असे म्हटले जात होते की, खामेनी एका गुप्त ठिकाणी लपून बसले आहेत.

You Might Also Like

गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी

युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा

अंतराळ स्थानकाहून शुक्लांचा हिंदी भाषेतून संदेश

‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल

राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
Next Article युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
अंतराळ स्थानकाहून शुक्लांचा हिंदी भाषेतून संदेश
देश - विदेश June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?