Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शिक्षकाने मुलीची छेड काढत दिली भावाला जिवे ठार मारण्याची धमकी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

शिक्षकाने मुलीची छेड काढत दिली भावाला जिवे ठार मारण्याची धमकी

Surajya Digital
Last updated: 2023/07/21 at 8:32 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
● पोलिस शिक्षकाची धिंड काढणार का? पालकांतून संतप्त सवालस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

● पोलिस शिक्षकाची धिंड काढणार का? पालकांतून संतप्त सवाल

 

कुर्डुवाडी : महाविद्यालयातून घरी चालत निघालेल्या मुलीस शिक्षकाने तिच्या समोर मोटरसायकल आडवी लावून, तिचा हात पकडून तू मला आवडतेस असे म्हणत होकार दे, नाहीतर मी तुझ्या भावाला ठार मारेन अशी धमकी दिल्याची घटना घडलीय. यात पालक खूप संतप्त झाले आहेत. Teacher teases girl, threatens to kill brother Solapur Kave Kurduwadi Dhind Police parents angry

ही घटना दि. १ जून रोजी, दुपारी १२.५० वाजणेच्या दरम्यान कव्हे (ता. माढा) शिवारात घडली. पिडीतेने भीतीपोटी दि. २१ जुलै रोजी, कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. यावरून एका शिक्षका विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात कव्हे (ता.माढा ) येथील प्रबोधनकार ठाकरे विद्यालयातील शिक्षक पांडुरंग यादव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहिती अशी की, परगावी शिकत असलेल्या महाविद्यालयास सुट्टी असल्याने पिडीत मुलगी आपल्या गावाकडे चालत जात असताना काही अंतरावर गेल्यानंतर प्रबोधनकार ठाकरे विद्यालय कव्हे येथील शिक्षक पांडुरंग यादव यांने मोटरसायकल आडवी लावून वाट आडवली.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

पीडिता एकटी असल्याचे पाहून त्याने तिचा हात पकडून तू मला आवडतेस असे म्हणत होकार दे नाहीतर तुझा भाऊ शाळेत एकटा जातो येतो तुही एकटी ये-जा करतेस असे म्हणून तू जर मला नकार दिलास तर मी तुला व तुझ्या भावाला जिवे ठार मारेन व तुझ्या आईला तुझे बाहेर प्रेमसंबंध आहेत असे सांगेन तसेच तुझे शिक्षण बंद करायला लावेन, अशी धमकी देवून तो तेथून निघून गेला.

पीडिता रडत घरी गेल्यावर घडलेला प्रकार आईला सांगितला. यानंतर या शिक्षकाने पीडिताच्या आईला वारंवार फोन करून तुमच्या मुलीचे गावातील मुलाशी प्रेमसंबंध आहेत. त्याच्या बरोबर पळून जाणार आहे असे सांगत होता. पिडीत मुलगी आईसह पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी येणार होती. परंतु शिक्षक पांडुरंग यादव याने तू जर माझ्या विरोधात तक्रार दिल्यास तुझ्या आईसह भावास ठार मारेन, अशी धमकी दिल्याने पीडिता घाबरल्याने तक्रार देण्यास येऊ शकली नसल्याचे म्हटले.

२१ जुलै, शुक्रवार रोजी धाडस करून शिक्षक पांडुरंग यादव याच्या विरोधात पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, शिक्षका विरोधात भा.दं.वि.३५४(अ), ३५४ (ड)३४१,५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुर्डूवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांनी नुकतेच मुलींची छेड काढाल तर शहरातून धिंड काढली जाईल असे प्रसार माध्यमांसमोर सांगितले होते. या शिक्षकाची धिंड काढणार का? असा सवाल ग्रामीण भागासह शहरातील पालक वर्गातून प्रश्न उपस्थित केला जात आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Teacher #teases #girl #threatens #kill #brother #Solapur #Kave #Kurduwadi #Dhind #Police #parents #angry, #शिक्षक #मुली #छेड #भाऊ #कव्हे #सोलापूर #जिवे #ठार #धमकी #कुर्डुवाडी #पोलीस #धिंड #पालक #संतप्त
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कार व मोटर सायकल अपघातात मोहोळमधील तरुण ठार, कारचालक फरार 
Next Article तब्बल 41 अधिका-यांच्या बदल्या, सोलापूरच्या जिल्हाधिकारीपदी कुमार आशीर्वाद

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?