Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: जुन्या वादातून पोलीस हेडक्वार्टरमध्ये घुसून पोलिसाचा खून
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीमहाराष्ट्र

जुन्या वादातून पोलीस हेडक्वार्टरमध्ये घुसून पोलिसाचा खून

Surajya Digital
Last updated: 2022/09/15 at 4:32 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ मराठा – आक्षेपार्ह वक्तव्य पोलीस निरीक्षक निलंबित

यवतमाळ – यवतमाळमध्ये पोलीस मुख्यालयात घुसून पोलीस कर्मचाऱ्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जुन्या वादातून निशांत खडसे यांचा खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. Jalgaon Nishant Khadse killed a policeman by entering the police headquarters due to an old dispute

अवधुतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस मुख्यालयाच्या दारात ही घटना घडली आहे. निशांत खडसे असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते कामानिमित्त पोलीस मुख्यालय येथे आले होते. त्यावेळी मुख्यालयाच्या समोरच दबा धरून बसलेल्या अज्ञात मारेकऱ्याने अचानक खडसे यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला.

 

जुन्या वादातून दोन युवकांनी पोलीस मुख्यालयासमोरच पोलीस कर्मचाऱ्याची हत्या केली आहे. ही घटना बुधवारी रात्री यवतमाळ जिल्ह्यात घडली असून खून प्रकरणाने पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे. निशांत खडसे असं मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, निशांत खडसे हे पोलीस दलात कार्यरत होते. ते काल बुधवारी रात्री कामानिमित्त पोलीस मुख्यालय येथे गेले होते. तेव्हा दोन तरुणांनी अचानक पोलीस मुख्यालयाच्या गेटजवळ लोखंडी रॉडने हल्ला चढवून निशांत खडसे यांची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच अवधूतवाडी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

 

खडसे यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करून गंभीर जखमी केले. हल्‍ला केल्यानंतर मारेकरी पळून गेला. यानंतर तेथे असलेल्या सहकारी पोलिसांनी रक्‍तबंबाळ झालेल्या निशांत खडसे यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल कऱण्यात आले होते; पण अतिप्रमाणात रक्‍तस्राव झाल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

 

पोलीस मुख्यालयाच्या गेटजवळच ही घटना घडल्यामुळे पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. घटनेची माहिती मिळताच अवधूतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. जुन्या भांडणाच्या वादातून मारेकर्‍याकडून निशांत खडसे यांचा खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्‍त केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

□ मराठा – आक्षेपार्ह वक्तव्य पोलीस निरीक्षक निलंबित

 

जळगांव – मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी यथील पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्यावर अखेर कारवाई करण्यात आली असून त्यांना निलंबीत करण्यात आलं आहे.

एका पोलीस कर्मचाऱ्याशी बोलताना त्यांनी मराठा समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्याची क्लीप व्हायरल झाली होती. यानंतर मराठा समाजाच्या संघटनांनी आक्रमक होत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती.

 

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #Jalgaon #NishantKhadse #killed #policeman #byentering #police #headquarters #old #dispute, #यवतमाळ #जुन्या #वादातून #पोलीस #हेडक्वार्टर #घुसून #पोलिस #खून #निशांतखडसे
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article धुराडे पेटवण्यासाठी कारखाने सज्ज मात्र मागील एफआरपीचे 203 कोटी थकित
Next Article ‘दुसऱ्या प्रकल्पाचे आमिष दाखवणे हे लहान मुलाची समजूत काढल्यासारखे’

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?