Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: टेंभुर्णीजवळ ट्रक -कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, नातू जखमी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

टेंभुर्णीजवळ ट्रक -कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, नातू जखमी

Surajya Digital
Last updated: 2022/08/04 at 10:33 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

□ नातवाचा वाढदिवस साजरा करणे राहून गेले

टेंभुर्णी : टेंभुर्णीजवळ आठ किलोमीटरवर असलेल्या दगड अकोले पाठी जवळ झालेल्या माल ट्रक व अल्टोकारच्या धडकेत टेंभुर्णी येथील पती-पत्नी जागीच ठार झाले. तर त्यांचा नातू जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली.  Husband and wife killed, grandson injured in truck-car collision near Tembhurni Birthday celebration

Contents
□ नातवाचा वाढदिवस साजरा करणे राहून गेले□ शेटफळ येथे शेतात विष पिऊन आत्महत्यास्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ उलट्या झाल्याने विवाहितेचा मृत्यू□ कोयत्याच्या मारहाणीत जखमी□ लवंग येथे कोयत्याने मारहाण

 

ही घटना आज गुरुवारी ( दि. 4) दुपारी चारच्या सुमारास घडली. तर गोरख मारुती माने (वय 55) व ताई गोरख माने (वय 46) अशी अपघातात पावलेल्या पती-पत्नी आहेत तर नातू अनमोल शांतीलाल माने (वय वर्ष 2) हा बचावला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की गोरख मारुती माने व त्यांची पत्नी ताई गोरख माने हे दोघे आपल्या आल्टो कार एम एच 09 ए. बी 7254 या गाडीने त्यांचा पंढरपूर मध्ये असलेला नातू अनमोल याला घेऊन आपल्या टेंभूर्णी गावी अनमोलचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पंढरपूर हून टेंभूर्णी कडे घेऊन निघाले होते.

दुपारी चार वाजणेचे सुमारास दगड अकोले बस थांब्याजवळ आली असताना टेंभुर्णीहून पंढरपूरकडे येणारा मालट्रक क्रमांक एम एच आर 3303 ने अल्टो कारला जोरात धडक दिली. या झालेल्या अपघातात गोरख माने व ताई माने हे दोघे पती-पत्नी जागीच ठार झाले. त्यांचा नातू अनमोल माने हा दोन वर्षांचा बालक बचावला. त्याचे पायाला जखम झाली असून त्याच्यावर टेंभुर्णीतील पाटील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

अनमोल चा वाढदिवस साजरा करण्यासाठी गोरख माने व ताई माने या पंढरपूर येथे नातवाला आणण्यासाठी गेले होते. अनमोलला पंढरपूरहून घेऊन टेंभुर्णीकडे येत असताना वाटेतच दगड अकोले या ठिकाणी माने पती-पत्नीवर काळाने घाला घातला. यात दोघांचा जीव गेला. व नातू अनमोल चा वाढदिवस साजरा करण्याची माने पती-पत्नीची इच्छा अपुरी राहिली. या घटनेने टेंभुर्णी परिसरात व्यक्त होत आहे.

 

 

□ शेटफळ येथे शेतात विष पिऊन आत्महत्या

सोलापूर  : शेटफळ (ता.मोहोळ) येथील भांगे यांच्या शेतात कामाला गेल्यानंतर विष प्राशन केल्याने सचिन बलभीम इंगळे (वय २२ रा. सिध्देवाडी (ता.मोहोळ) हा उपचारादरम्यान मरण पावला. गुरुवारी सकाळी हा प्रकार घडल्यानंतर त्याला मोडनिंब येथे प्राथमिक उपचार करून अनिल(भाऊ) यांनी सोलापूरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारा दरम्यान तो मरण पावला अशी प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

□ उलट्या झाल्याने विवाहितेचा मृत्यू

 

 

रोपळे (ता.माढा) येथे राहणाऱ्या स्वाती संतोष भोंग (वय ३०) यांना उलट्या झाल्याने त्या उपचारा दरम्यान गुरुवारी सकाळी मरण पावल्या.२९ जुलै रोजी त्यांना उलट्याची लागण झाली होती. त्यांना कुर्डूवाडी येथे आणि सोलापुरात खाजगी रुग्णालयात उपचार करून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तालुका पोलिसात याची नोंद झाली आहे.

□ कोयत्याच्या मारहाणीत जखमी

विजापूर रोडवरील इंचगिरी मठाजवळ कोयता आणि हाताने केलेल्या मारहाणीत दशरथ पोला राठोड (वय ४९ रा.नेहरूनगर विजापूर रोड) हे जखमी झाले. ही घटना काल बुधवारी रात्रीच्या सुमारा घडली. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. लखन पवार आणि फुलाबाई पवार या दोघांनी मारहाण केली अशी नोंद विजापूर नाका पोलिसात झाली आहे.

 

□ लवंग येथे कोयत्याने मारहाण

लवंग तालुका माळशिरस येथे मी दिलेली गाय आणि वासरू परत दे म्हणून कोयता आणि दांडक्याने केलेल्या मारहाणीत स्वप्नील विश्वनाथ कोकाटे-पाटील (वय ३३ रा.लवंग) हा जखमी झाला. ही घटना आज गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली. त्याला अकलूज येथे प्राथमिक उपचार करून श्रीराम माने (भाऊजी) यांनी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले. ज्ञानेश्वर आणि त्याचा भाऊ अमर दिनकर कोकाटे या दोघांनी मारहाण केली. अशी प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे.

 

 

 

You Might Also Like

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

TAGGED: #Husband #wife #killed #grandson #injured #truck-car #collision #Tembhurni #Birthday #celebration, #टेंभुर्णी #ट्रक -कार #धडक #पती-पत्नी #ठार #नातू #जखमी #वाढदिवस #साजरा #ईच्छा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पंढरपूर : बिबट्यासदृश्य प्राणी दिसल्याने पटवर्धन कुरोली, देवडे परिसरात घबराट
Next Article ग्रामपंचायत निवडणूक निकाल ; सोलापुरात ठाकरे गटाने खाते उघडले, बार्शीत राऊत गटाचा झेंडा

Latest News

‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
हिमाचल प्रदेशमध्ये प्रवाशांनी भरलेली बस उलटली; ४४ प्रवासी जखमी
Top News July 1, 2025
रेल्वे प्रवाशांसाठी ‘रेलवन’ सुपर अ‍ॅप लॉंच; सर्व सुविधा आता एका ठिकाणी
देश - विदेश July 1, 2025
राजदंड उचलण्याचा प्रयत्न, नाना पटोले एक दिवसासाठी निलंबित
Top News July 1, 2025
ट्रम्प यांनी ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ मंजूर केल्यास मस्क नवीन पक्ष करणार स्थापन
देश - विदेश July 1, 2025
पहलगाम हल्ला हा एक प्रकारचे आर्थिक युद्ध होते-  जयशंकर
Top News July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?