Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: वडवळजवळ भीषण अपघात; वृद्ध पती-पत्नी ठार; ट्रकची ट्रॅव्हल्स बसला धडक 
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

वडवळजवळ भीषण अपघात; वृद्ध पती-पत्नी ठार; ट्रकची ट्रॅव्हल्स बसला धडक 

Surajya Digital
Last updated: 2021/11/23 at 9:44 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मोहोळ :  राष्ट्रीय महामार्गावर वडवळ रेल्वे पुलाजवळ भीषण अपघात झाला आहे. मोटरसायकलला पाठीमागून भरधाव येणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिल्याने वृद्ध दाम्पत्य ठार झाले. मेंदूचा चेंदामेंदा झाल्याचे भीषण दृश पाहावयास मिळाले.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  मुळगांव कोंबडवाडी येथील  मयत अर्जुन नामदेव थिटे व अनिता नामदेव थिटे हे पति-पत्नी  सोरेगांव  येथील रहिवासी आहेत. ते शेतीच्या कामानिमित्त मूळगांव कोंबडवाडी येथे गावी आले होते.

शेतीची व अन्य  कामे उरकुन परत ते मोटार सायकल ( एम .एच.13 AK 7332  क्रंमाक  ) वरुन परत जात असताना  मोहोळहून सोलापूरकडे जाणाऱ्या मालट्रकने ( क्रमांक अे .पी .39  V 6829 ) पाठीमागून जोराने धडक दिली. यात मोटार सायकलवरील  अर्जुन नामदेव थिटे  ( वय  ६५ ) व अनिता नामदेव थिटे ( वय ६० ) हे दोघा पती पत्नीचा जागीच मृत्यु झाला.

घटनास्थळावर मृतदेहाचे मेंदुचे तुकडे अत्यावस्त विखुरल्याने अतिशय भयानक चित्र दिसत होते. याबाबतची खबर पोलीसांना मयताचे पुतणे सचिन शंकर थिटे यांनी दिली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मालट्रकच्या चालकास अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

मृत अर्जुन नामदेव थिटे हे निवृत्त एसआरपी कर्मचारी असून त्यांना उत्कृष्ट कामगिरी बद्दल राष्ट्रपती पदक मिळाले होते. मृत अर्जुन थिटे यांना एक मुलगा, सुन व दोन मुली आहेत.

* ट्रकची ट्रॅव्हल्स बसला धडक 

सोलापूर – ट्रक चालकाने अतिवेगाने वाहन चालवून ट्रॅव्हल्स बसला धडक दिल्याची घटना २२ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सोलापूर एसटी स्टँड समोर घडली. याप्रकरणी काशिनाथ भगवंत हुगार (फुलारी) (वय-३०,एन जी चाळ, गणपती मंदिरजवळ सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीवरून ट्रक क्र.एम.एच.१३.आर.३८२० या ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

ट्रक चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक हे अती वेगाने चालवून फिर्यादी यांच्या ट्रॅव्हल्स क्र.के.ए ५१. ए.जी.०२३८ ला पाठीमागून धडक दिली. त्यानंतर बसच्या मागील टेल लॅम्प, डिक्की, आपत्कालीन दरवाजा, मागील काच, स्पीकर कोचचे पाच सीट चिमटून फुटून नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. बसमधील प्रवाशांना हादरा बसून मुक्का मार लागून जखमी होण्यास कारणीभूत झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलिस नाईक पैकेकरी हे करीत आहेत.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #tragic #accident #Wadwal #couple #killed #truck's #travels #hit #bus, #वडवळ #भीषण #अपघात #वृद्ध #पती-पत्नी #ठार #ट्रक #ट्रॅव्हल्सबस #धडक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मुस्लिम बांधवांनो खिशात पेन ठेवायला शिका तलवार नव्हे; अजित पवार 48 तासांचे नवरदेव बनले
Next Article आमिर खानचं तिसरं लग्न होणार का ? अमिर खाननेच दिले उत्तर

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?