Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सपोनि किरण उंदरे यांच्या बदलीसाठी मोहोळ तालुक्यात रंगले राजकारण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

सपोनि किरण उंदरे यांच्या बदलीसाठी मोहोळ तालुक्यात रंगले राजकारण

Surajya Digital
Last updated: 2020/08/08 at 6:58 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

विरवडे : मोहोळ तालुक्यातील कामती पोलीस स्टेशन
सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांच्या बदलीसाठी राजकीय घडामोडी घडू लागल्या असून यात कोण बाजी जिंकणार याकडे मोहोळ तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. या बदलीसाठी शिवसेना आक्रमक झाली तर काँग्रेस ही बदली होऊ नये म्हणून आक्रमक झाली आहे.

सहायक पोलीस निरिक्षक किरण उंदरे यांची बदली व्हावी यासाठी शिवसेना आंदोलनाचे हत्यार उपासले आहे. उंदरे यांची बदली होऊ नये म्हणू काँग्रेसदेखील रस्त्यावर उतरून जनआंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

किरण उंदरे यांच्याकडे दोन वर्षापासून कामती पोलीस स्टेशनचा पदभार आहे. त्यांनी पदभार घेतल्यापासून कामती पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्याना सुरुवातीच्या काही महिने चाप बसला होता. त्यानंतर अवैध धंदे जोमाने सुरु झाले. या अवैध धद्यांना उंदरे हे खत पाणी घालत असल्याचा आरोप शिवसेना तालुका प्रमुख अशोक भोसले यांनी केला होता. याबाबत सपोनि उंदरे यांची बदली व्हावी, अशी मागणी केली होती.

गेल्या महिन्यांत सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील काही सहाय्यक निरीक्षकांच्या जिल्हा अंतर्गत प्रशासकीय बदल्या केल्या होत्या. या बदलीमध्ये उंदरे यांचा समावेश होता. मात्र त्यानंतरही किरण उंदरे यांनी कामतीचा पदभार सोडलेला नाही. त्यामुळे शिवसेना आंदोलनाच्या तयारीत आहे व येत्या काही दिवसांत तालुका प्रमुख अशोक भोसले यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय पदाधिकारी आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

याविरोध काँग्रेससह अन्य पक्ष संघटना सपोनि किरण उंदरे यांच्या समर्थनार्थ पुढे सरसावल्या आहेत. उंदरे हे प्रामाणिक कर्तव्यदक्ष अधिकारी असल्याचे सांगत या परिसरातील अवैध धंदे, वाळू चोरी व अन्य धंदे बंद आहेत. त्यांच्यामुळेच या परिसरातील कायदा व सुव्यवस्था टिकून आहे. सामाजिक सलोखा राखला आहे. त्यामुळे त्यांची बदली करू नये, अशी मागणी काँग्रेस मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष गौरव खरात यांनी केली आहे. गरज पडल्यास जनआंदोलन करून रस्त्यांवर उतरण्याचा इशारा ही त्यांनी दिला.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #सपोनिकिरणउंदरे #बदली #वातावरण #राजकारण #शिवसेनाकाँग्रेस
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कन्नडीगांचं संतापजनक कृत्य; रातोरात छ. शिवाजी महाराजांचा हटविला पुतळा, मराठी माणूस संतप्त
Next Article लांबूनच बोल आमचे मंत्री कोरोना पॉझिटिव्ह झालेत; अजित पवार मनसे नगरसेवकांवर ओरडले

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?