Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ठाकरे परिवाराचा व्यवसाय कोणता ? मुख्यमंत्री ठाकरेंनी स्पष्टीकरण द्यावे
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्रराजकारण

ठाकरे परिवाराचा व्यवसाय कोणता ? मुख्यमंत्री ठाकरेंनी स्पष्टीकरण द्यावे

Surajya Digital
Last updated: 2020/11/20 at 9:55 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांचे पुत्र आदित्य यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्ती संदर्भात दिलेली माहिती तसेच रश्मी ठाकरे यांच्या जमीन खरेदीबाबत उपलब्ध झालेली कागदपत्रे पाहता ठाकरे कुटुंबाचा व्यवसाय जमीन खरेदीचा की इमारती बांधण्याचा (बिल्डर) आहे?  याबाबत मुख्यमंत्र्यांनी एकदा स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी भाजपा नेते डॉ. किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषदेत केली.

डॉ. सोमय्या यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीबाबत दिलेल्या माहितीची कागदपत्रे सादर केली. डॉ. सोमय्या म्हणाले की “आदित्य ठाकरे हे ३१ मार्च २०२० पर्यंत हिबिस्कस फूड एलएलपी, एलिओरा सोलर एलएलपी या कंपन्यांचे डेझिग्नेटेड पार्टनर होते असे दिसते आहे. मंत्री बनल्यावर जवळपास चार महिने ते एखाद्या कंपनीचे संचालक म्हणून कसे राहू शकतात? कंपनीचा डेझिग्नेटेड पार्टनर हे पद लाभाचे (ऑफिस ऑफ प्रॉफिट) नाही का?” याबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

जनतेच्या मनात उत्सुकता आहे की मुख्यमंत्री ठाकरे परिवाराचा मूळ व्यवसाय काय? जमीन घेणे -विकणे, बांधकाम क्षेत्र, इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्या, अनेक कंपन्यांमध्ये ते संचालक होते, आहेत. अनेक कंपन्यांमध्ये ते शेअरहोल्डिंग आहेत. अनेक कंपन्यांमध्ये ते पार्टनर दिसत आहेत. त्यामुळे त्यांचा मूळ व्यवसाय काय यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी माहिती जाहीर करावी अशी आमची मागणी आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिज्ञापत्रात पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावावर असलेल्या खालापूर तालुक्यातील वैजनाथ येथील जमिनीचा उल्लेख आहे. या जमिनीचा उल्लेख करताना एकाच सर्व्हे क्रमांकाच्या जमिनीचा उल्लेख दोन वेळा करण्यात आला आहे. हा प्रकार संशयास्पद असल्याने मुख्यमंत्री ठाकरे यांनीच याबाबत खुलासा करणे आवश्यक आहे, असे डॉ. सोमय्या यांनी सांगितले.

डॉ. सोमय्या यांनी सांगितले की मुरुड तालुक्यातील कोर्लई गावात ठाकरे परिवार व अन्वय मधुकर नाईक परिवारासोबत जमीन खरेदीचे ३० करार झालेले दिसत आहेत. या सर्व व्यवहारांच्या ७/१२ च्या उताऱ्यांवर ‘सदर जमीन लागवडीस अयोग्य” असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. या व्यवहारांवरून काही प्रश्न उपस्थित होत आहेत त्यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खुलासा करावा अशी महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा आहे.

* वायकर आणि ठाकरे परिवाराचे संबंध काय ?

सौ. रश्मी उद्धव ठाकरे व सौ. मनिषा रविंद्र वायकर म्हणजे उद्धव ठाकरे व  रविंद्र वायकर या दोन्ही परिवारामध्ये कोणत्या स्वरूपाचे आर्थिक संबंध आहेत? ठाकरे व वायकर या दोन्ही परिवारामध्ये व्यावसायिक संबंध आहेत का? त्यांची बिझिनेस पार्टनरशिप आहे का? या दोघांनी अशाप्रकारे संयुक्त व्यवहार अन्यत्र केले आहेत का? सौ. रश्मी उद्धव ठाकरे यांचे कोर्लई येथील जमीन खरेदीचे ७/१२ चे ३० उतारे आम्हांला सापडले आहेत. माननीय उद्धव ठाकरे यांच्या प्रतिज्ञापत्राप्रमाणे सौ. रश्मी उद्धव ठाकरे यांच्या नावाने एकंदर ४० ७/१२ उतारे आहेत, त्यापैकी ३०  ७/१२ उतारे हे सौ. रश्मी उद्धव ठाकरे व अन्वय मधुकर नाईक परिवाराचे आहेत.

You Might Also Like

उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल

पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला

हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्रच मोर्चा काढणार – संजय राऊत

न्यायाधीश समाजाशी एकरुप असावा – भूषण गवई

TAGGED: #ठाकरेपरिवाराचा #व्यवसायकोणता? #मुख्यमंत्रीठाकरेंनी #स्पष्टीकरणद्यावे
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मराठा महिला मुख्यमंत्री व्हावी; शरद पवारांच्या उपस्थितीत केले भाजपा नेत्यांने विधान
Next Article अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना; सोलापूर पोलिसांनी वाटेतच पकडले

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?