Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आमदार शिंदेंची किसान रेलला मोडनिंब येथे थांबा व शेतीमालासाठी गोडावून देण्याची मागणी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

आमदार शिंदेंची किसान रेलला मोडनिंब येथे थांबा व शेतीमालासाठी गोडावून देण्याची मागणी

Surajya Digital
Last updated: 2020/08/30 at 11:15 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

टेंभुर्णी : शेतक-यांचा शेतीमाल पाठविण्यासाठी किसान रेल्वेस मोडनिंब येथे थांबा देणेबाबत व रेल्वे स्थानकावर शेतीमाल साठवणुकीसाठी गोडावून उपलब्ध करून देण्याबाबतची मागणी रेल्वेच्या वाणिज्य विभागाकडे आमदार बबनराव शिंदे यांनी  केली आहे.

रेल्वे मंत्रालयाने पुढाकार घेवून भारत सरकार सोबत किसान रेल्वे ही वाहतूक व्यवस्था सुरू केली आहे. जेणेकरून या योजनेमुळे शेतक-यांना त्यांचा नाशवंत शेतीमाल लवकरात लवकर पोहोचविण्यासाठी शेतीमाल किसान रेल्वे सुरू केली आहे. नुकतीच सांगोला ते दानापूर ही शेतीमाल वाहतुकीसाठी किसान रेल्वे सुरू केली आहे. ही रेल्वे मोडनिंब (ता.माढा) या मार्गाने मार्गक्रमण करीत आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

माढा मतदारसंघातील मौजे मोडनिंब हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असून मोठ्या बाजारपेठेसाठी पूर्वीपासून परिचित आहे. मोडनिंब परिसरामध्ये फळ बागांचे उत्पादन होत असून त्यामध्ये प्रामुख्याने टोमॅटो, बोर, डाळींब, लिंबू, द्राक्ष, पेरू व इतर पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेण्यात येत आहे.

सांगोला ते दानापूर या किसान रेल्वेस मोडनिंब येथे थांबा नसल्याने शेतक-यांना त्यांचा माल विक्रीसाठी पाठविणे अडचणी निर्माण होत आहे. त्यांचा माल इतर मार्गाने विक्रीस पाठविल्यामुळे वाहतुकीसाठी जादा पैशे मोजावे लागत असून त्यांना चांगला दर देखील मिळत नाही. परिणाम शेतक-यांचे आर्थिक नुकसान होत आहे. मोडनिंब रेल्वे स्थानकावर शेतीमाल साठविण्यासाठी गोडावून उपलब्ध नसल्याने शेतक-यांना त्यांचा माल ठेवण्यासाठी अडचणी येत असून परिणामी शेतीमाल खराब होवून नुकसानी होत आहे. त्यामुळे शेतकरी व व्यापारी यांचेकडून किसान रेल्वेस थांबा मिळण्यासाठी मागणी होत आहे.

* ताजा माल वेळेत पोहचण्यास मदत

सांगोला-दानापूर या रेल्वेस मोडनिंब रेल्वे स्थानकावर थांबा मिळाल्यास मोडनिंब व परिसरातील शेतक-यांचा ताजा शेतीमाल वेळेत विक्रीसाठी पाठविणे सोयीचे होवून त्यास चांगला दर मिळणार आहे. मोडनिंब येथून दैनंदिन विक्रीसाठी जाणारा शेतक-यांचा कमी व अधिक प्रमाणातील माल रेल्वेने वाहतुकीसाठी स्विकारणे व शेतीमाल साठविणेसाठी रेल्वे स्थानकावर गोडावून उपलब्ध करुन देण्याबाबत आ. बबनराव शिंदे यांचेकडून संबंधित भारतीय रेल्वेच्या वाणिज्य विभागाकडे तसेच माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे.

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #मोडनिंब #किसानरेल #किसानरेल्वे #गोडावून #आमदारशिंदे
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article धोकादायक जुगाड ! सॅनिटायझरचा असाही वापर; रॉकेल मिळत नाही म्हणून चूल पेटवण्यास वापर
Next Article मंदिर उघडण्याच्या वंचितच्या आंदोलनाला ब्राह्मण समाज समन्वय समितीचा पाठिंबा

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?