नवी दिल्ली : दिल्लीत विकेंड कर्फ्यूदरम्यान एका दाम्पत्याने भररस्त्यात पोलिसांशी हुज्जत घातली. विकेंड कर्फ्यूदरम्यान पोलिसांनी रोखले असता महिलेने राडा घातला. ही महिला आणि तिचा पती कारमध्ये विनामास्क फिरत होते. त्यांच्याजवळ मास्कही नव्हता. पोलिसांनी हटकले असता मी माझ्या नवऱ्याला किस करेल, तुम्ही रोखणार का? असेही ही महिला उद्धटपणे बोलली. या दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1383986575596421120?s=19
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आख्ख्या भारताची झोप उडाली आहे. कधी एकदाचा हा कोरोना जातो असं प्रत्येकाला झालंय. कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी देशभरात अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. या नियमांचे पालन केले नाही तर पोलीस आणि प्रशासनाकडून कडक कारवाई केली जात आहे. मात्र, काही ठिकाणी पोलिसांच्या या कारवाईला विरोध होताना दिसतोय. दिल्लीच्या दर्यागंजमध्ये तर एका महिलेला मास्क न घातल्याबद्दल विचारले असता ती थेट किसवर आली आहे. ‘हा माझा पती आहे. माझ्या मनात आलं तर मी त्याला किससुद्धा करेल,’ असे उत्तर या महिलेने दिलं आहे. महिलेच्या या थेट किसपर्यंत जाण्यामुळे तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीमध्ये कोरोनामुळे परिस्थिती चिंताजनक बनली आहे. परिस्थिती बिघडल्यामुळे दिल्लीमध्ये अनेक कोरोना प्रतिबंध लागू करण्यात आले आहेत. जागोगाजी पोलीस गस्त घालत असून कारमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तपासणी करत आहेत. दर्यांगज येथे एका जोडप्याला असंच पोलिसांनी मास्क न घातल्यामुळे टोकलं.
https://twitter.com/Supriya23bh/status/1383813482047434753?s=20
पोलिसांनी मास्कबद्दल विचारल्यामुळे त्यातील महिला पोलिसांवर थेट भडकली. तिने पोलिसांशी अरेरावी करत शिवराळ भाषा वापरली. तसेच मास्क घालणार नाही. काय करणार असा उलट सवालही केला. या प्रकारामुळे रस्त्यावर काही काळासाठी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
* महिलेचे ऐकून सर्वांनी तोंडात घातले बोट
पोलिसांनी या महिलेला मास्क न घालण्याचे कारण विचारले. त्यावर उत्तर म्हणून या महिलेना कोरोना वगैरे काही नाही. कोरोनाच्या नावाखाली आम्हाला परेशान केलं आहे. मी मास्क लावणार नाही; काय करणार ? असे म्हणत पोलिसांना थेट आव्हान दिले. तसेच आपल्या पतीकडे बोट करत हा माझा पती आहे. माझ्या मनात आलं तरी मी त्याला आता इथेच किस करेल, असंसुद्धा ही महिली म्हणाली. पोलिसांसोबत उद्धटपणे बोलतानाचा हा व्हिडीओ नंतर काही क्षणांत व्हायरल झाला.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1383771846407901189?s=19
दरम्यान, ही घटना घडताना पोलिसांसोबत महिला पोलीस नसल्यामुळे दर्यागंजच्या रस्त्यावर काही काळासाठी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. तसेच या महिलेचा हेकेखोरपणा आणि उद्धटपणे बोलण्यामुळे सर्वांनी तोंडात बोट घातले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.