प्रतिनिधी
करकंब -शेती आपल्या नावावर करण्याच्या कारणावरून चाकूने केलेल्या मारहाणीत महिला जखमी झाली. ही घटना पटवर्धन कुरोली (ता.पंढरपूर) येथे गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली.
वैशाली दादासाहेब इनामदार (वय ५१ रा.पटवर्धन कुरोली) असे जखमीचे नाव आहे. त्यांना मारहाण केल्याप्रकरणी पांडुरंग गोरख चव्हाण आणि अनिता गोरख चव्हाण (दोघे रा.हणार पटवर्धन कुरवली यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
गुरुवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास वैशाली इनामदार या घरासमोरील अंगण झाडत होत्या. त्यावेळी पांडुरंग आणि त्याची आई अनिता या दोघांनी शेती नावावर करण्याचा कारावरून त्यांना शिवीगाळ केली तेंव्हा पांडुरंग याने चाकूने त्यांना दंडावर मारून जखमी केले. आणि पोलिसात तक्रार दिली तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली होती