मुंबई, 25 जून (हिं.स.)। कोल्हापूर जिल्हा म्हणजे कुस्तीची पंढरी असे म्हणत भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील नरतवडे गावचा सुपुत्र आदित्य जाधव याचे अभिनंदन केले. आदित्य याने आशियाई कुस्ती स्पर्धेच्या १७ वर्षांखालील गटात रौप्य पदक पटकावलं. ऊस तोड कामगाराच्या कुटुंबातून आलेल्या आदित्यने ग्रीको रोमन कुस्ती गटात हे यश मिळवत आपल्या आई-वडिलांच्या संघर्षाचं सार्थक केलं. तसेच सातत्य, सराव आणि कौशल्य या बळावर आदित्यने व्हिएतनाममधील वुंग ताउ येथील मल्लभूमीवर हे यश मिळवलं.
आदित्य, या रुपेरी यशासाठी तुझं हार्दिक अभिनंदन ! याहून उंच भरारी घेत जागतिक कुस्ती विश्वात भारताचा तिरंगा अभिमानानं उंचावण्यासाठी हार्दिक शुभेच्छा, असे ते म्हणाले.