Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सुखसोयींना चटावलेल्या कैद्यांना कोविड सेंटरमधून परत आणताना उडाली धुमश्चक्री
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
गुन्हेगारीसोलापूर

सुखसोयींना चटावलेल्या कैद्यांना कोविड सेंटरमधून परत आणताना उडाली धुमश्चक्री

Surajya Digital
Last updated: 2020/09/14 at 5:52 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

बार्शी : कोविड सेंटरमध्ये मिळणार्‍या सुखसोयींना चटावलेल्या कैद्यांना परत सबजेलमध्ये आणताना पोलिसांना बरीच मेहनत घ्यावी लागली. यावेळी कैद्यांच्या विरोधामुळे उडालेल्या धुमश्चक्रीमुळे थोडा गोंधळ उडाला. अखेर सर्व कैद्यांना कडक बंदोबस्तामध्ये आणून सबजेलमध्ये घातल्यानंतरच पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

येथील तहसील कार्यालयातील सबजेलमध्ये असलेल्या न्यायालयीन कोठडीतील काही कैद्यांना जुलै महिन्याच्या प्रारंभी कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. त्यानंतर सर्वच कैद्यांना पुढील उपचारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या वसतीगृहात हलविण्यात आले होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

त्याठिकाणी उपचार घेवून बरे झाल्यानंतरही सबजेलपेक्षा अधिक मोकळीक तेथे मिळत असल्याने कैद्यांनी अनेक क्लुप्त्या योजून तेथील आपला मुक्काम वाढविला होता.

या कैद्यांमध्ये खूनासारख्या गंभीर गुन्ह्यात गेली सलग तीन ते चार वर्षे कोठडीत असलेल्यांचा समावेश होता. कोविड सेंटरमध्ये नातेवाईक-मित्रपरिवारांना त्यामानाने सहज भेट मिळत होती. घरातून डबा तसेच अन्य पदार्थांची लयलूट होती. त्यातून एका कैद्याने पलायनाची प्रयत्न केला होता. एरवी सबजेलमध्ये सहजासहजी न मिळणार्‍या अनेक सुखसोयी सेंटरमध्ये सहजच उपलब्ध होत असल्याने ऐनकेनप्रकारे कैद्यांचा तेथील मुक्काम लांबविण्यात येत होता.

या कैद्यांचा तेथील उपद्रव वाढल्यानंतर अन्य रुग्णांना तसेच आरोग्य यंत्रणेला त्याचा त्रास होवू लागला. त्यामुळे त्यांच्याकडून वारंवार त्यांना हलविण्याची मागणी होत होती. अखेरीस त्यांना सबजेलमध्ये नेण्यासाठी पोलिस तेथे गेल्यानंतर कैद्यांनी विरोध करण्यास सुरुवात केली. प्रारंभी पोलिसांनाही त्यांनी जुमानले नाही. त्यामुळे पोलिसांना जबरदस्तीने त्यांना तेथून हलवावे लागले. यावेळी थोडी धुमश्चक्री उडाली. मात्र पोलिसांनी लगेच स्थिती नियंत्रणात आणली

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #सुखसोयीने #चटावलेले #कैदी #सबजेल #बार्शी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article संसद अधिवेशनापूर्वी कोरोना चाचणी; दोन केंद्रीय मंत्र्यांसह 25 खासदारांना कोरोना
Next Article हिमाचल प्रदेशमध्ये जावून कंगनाने केले गंभीर आरोप; ठाकरे पिता-पुत्रांना थेट आव्हान

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?