Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: दारु समजून कोंबड्यांसाठी आणलेले औषध प्राशन केल्याने मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

दारु समजून कोंबड्यांसाठी आणलेले औषध प्राशन केल्याने मृत्यू

Surajya Digital
Last updated: 2023/07/21 at 2:11 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)○ दोन हजाराच्या सव्वा कोटी नोटा देतो म्हणून 25 लाखास गंडविले, माळशिरस तालुक्यातील घटना

कुर्डुवाडी : दारु समजून कोंबड्यांसाठी आणलेले औषध प्यायल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी ( दि. १९) १० वाजण्याच्या सुमारास कुर्डू येथील कुकुटपालन येथे घडली. सतीश महादेव शिंदे (वय ४५ रा. रेल्वे हाॅस्पीटलच्यामागे कुर्डुवाडी) असे मयताचे नाव आहे. Kurduwadi Solapur died after drinking medicine brought for chickens mistaking it for alcohol

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की शुभम बोराडे (रा. भोगेवस्ती कुर्डू ) यांची कुर्डू येथे शेती असून शेतात कुकुटपालन ही आहे. दि. १८ रोजी बोराडे यांनी कुक्कुटपालन साफसफाई करिता कुर्डुवाडी येथील चंद्रकांत कुलकर्णी यांना सांगितले होते. त्याप्रमाणे कुलकर्णी हे दि.१९ रोजी सकाळी ७ वा. कुक्कुटपालन साफसफाई करिता सतीश महादेव शिंदे, भगवान भोसले,भास्कर श्रीमंत माने ,संदीप राठोड यांना घेऊन कुर्डू येथे गेले. त्यावेळी बोराडे हे त्यांना आपल्या गाडीतून कुक्कुटपालनकडे घेऊन गेले व काम व्यवस्थित करा म्हणून दुसऱ्या कुकुटपालनाकडे गेले.

त्यानंतर सकाळी १०.०६ मि चंद्रकांत कुलकर्णी यांनी बोराडे यांना फोन करुन सांगितले की, आमचे साफसफाईचे काम संपत आले असताना सतीश महादेव शिंदे व भास्कर श्रीमंत माने हे ड्रमच्या शेजारी बसून काही तरी पित होते. त्यानंतर त्यांना उलट्या होण्यास सुरुवात झाली. त्यावेळी कुलकर्णी यांनी त्यांना काय झाले हे विचारले असता सतीश महादेव शिंदे म्हणाला ड्रममध्ये दारु आहे असे समजून आम्ही ती पिलो तेंव्हापासून उलट्या व मळमळ होऊ लागले आहे, मला दवाखान्यात घेऊन चला, अशी मागणी केली.

बोराडे यांना गाडीत घालून त्यांना कुर्डुवाडी येथील सरकारी दवाखान्यात आणले, त्यावेळी डाॅक्टरांनी तपासून सतीश महादेव शिंदे हा मयत झाला असल्याचे सांगितले व भास्कर माने याच्यावर औषधोपचार केल्यानंतर त्याची प्रकृती बरी असल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुढील तपास पो.काॅ.नितीन गोरे हे करीत आहेत.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

○ दोन हजाराच्या सव्वा कोटी नोटा देतो म्हणून 25 लाखास गंडविले, माळशिरस तालुक्यातील घटना

सोलापूर – तुम्ही आम्हाला २५ लाख रुपये द्या, आम्ही तुम्हाला २ हजार रुपयाच्या सव्वा कोटीच्या नोटा देतो. अशी थाप मारून पुण्यातील तिघा भामट्यानी भांबुर्डी येथील इसमास पंचवीस लाख रुपयास गंडविले.

ही घटना भांबुर्डी (ता. माळशिरस) येथे शनिवारी (ता. १५) दुपारच्या सुमारास घडली. यासंदर्भात नामदेव जयराम वळकुंद्रे (वय २९ रा.मेडद ता.माळशिरस) यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली. त्याप्रमाणे माळशिरसच्या पोलिसांनी नवनाथ उर्फ नाथा (रा वाघोली जि .पुणे) आणि त्याच्या दोघा साथीदाराविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

नामदेव वलकुंद्रे (रा.मेडद) यांचा माळशिरस परिसरात गॅरेजच्या व्यवसाय आहे. त्यांचे मामा सोमनाथ वाघमोडे हे भांबुर्डी येथे राहतात. पुण्यातील त्यांच्या परिचयात असलेल्या नवनाथ उर्फ नाथा याने वाघमोडे यांना आमच्याकडे दोन हजार रुपये किमतीच्या भरपूर नोटा आहेत. तुम्ही आम्हाला शंभर आणि पाचशे रुपयाच्या नोटा दिल्यास आम्ही तुम्हाला पाचपट दोन हजार रुपयाच्या नोटा देतो असे सांगितले होते.

 

त्याप्रमाणे सोमनाथ वाघमोडे यांनी शनिवारी दुपारी नवनाथ उर्फ नाथा याला २५ लाख रुपये दिले. त्यानंतर तिघांनी पैसे घेऊन पोबारा केला . आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी माळशिरस पोलिसात फिर्याद दाखल केली. पुढील तपास फौजदार पुजारी करीत आहेत.

You Might Also Like

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा

सोलापूर – जिल्ह्यात अवकाळीने 64 कोटींच्या पिकांचे नुकसान

TAGGED: #Kurduwadi #Solapur #died #drinking #medicine #brought #chickens #mistaking #alcohol, #सोलापूर #कुर्डुवाडी #दारु #कोंबडा #औषध #प्राशन #मृत्यू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मुख्यमंत्री मुक्कामी : दरड दुर्घटनेतील मृतांचा आकडा 16 वर, 98 जणांना वाचवण्यात यश
Next Article कार व मोटर सायकल अपघातात मोहोळमधील तरुण ठार, कारचालक फरार 

Latest News

crime
सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी
सोलापूर June 23, 2025
बांगलादेशात पाकिस्तानी आयएसआय हस्तकाची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्तीची शक्यता
देश - विदेश June 23, 2025
रोहित शर्माच्या कारकीर्दीला १८ वर्षे पूर्ण, सोशल मीडियावर भावूक पोस्ट
Top News June 23, 2025
आता लक्ष्य टोकीयो वर्ल्ड चॅम्पियनशीप – नीरज चोप्रा
देश - विदेश June 23, 2025
इराणी लष्कराची अमेरिकेला थेट धमकी
देश - विदेश June 23, 2025
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ऑक्टोबरमध्ये
राजकारण June 23, 2025
पुण्यात 50 हजार कोटींचे पूल बनवणार – नितीन गडकरी
महाराष्ट्र June 23, 2025
भाकप हा आमचा मोठा भाऊ – शेकाप नेते जयंत पाटील
महाराष्ट्र June 23, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?