Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कुरनूर धरणातून २४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग, सतर्क राहण्याचा इशारा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsशिवारसोलापूर

कुरनूर धरणातून २४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग, सतर्क राहण्याचा इशारा

Surajya Digital
Last updated: 2021/09/26 at 9:28 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरणातून सकाळी १४०० क्युसेक पाणी सोडण्यात आले होते. त्‍यानंतर परत दुपारी २१०० क्युसेक तर सायंकाळी प्रवाहात वाढ करुन सध्या २४०० क्युसेक इतके पाणी खाली सोडण्यात आले आहे. यामुळे नदीकाठावरील शेतकरीबरोबर तलाठी,मंडल अधिकारी ,पोलीस पाटील व कोतवाल यांना नदीकाठच्या भागातच थांबण्याचा इशारा तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी दिला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने बोरी व हरणा या दोन्ही ही नदीतील नळदुर्ग धरणातून ही प्रवाह वाढवण्यात आल्याने बोरी धरणातून आज संध्याकाळपर्यंत अजून प्रवाहात वाढ होऊन २४०० क्युसेक इतके पाणी खाली सोडण्यात आले आहे.

तरी नदीकाठावरील सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.तसेच खासपूर आणि चांदणी मध्यम प्रकल्पातून ही पाणी सोडल्यामुळे भीमा सीना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. संध्याकाळी बोरी उमरगे येथील पुलावर दुसऱ्यांदा पाणी येण्याची शक्यता होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

तालुक्यात उत्तरा नक्षत्राच्या दमदार आगमनाने एकीकडे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असताना दुसरीकडे कुरनूर धरणातून मोठ्याप्रमाणात पाणी सोडण्यात येत असल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे अक्कलकोटवासीयांची जीवनदायिनी ठरलेले कुरनूर धरण पुन्हा एकदा ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे.

तालुक्यातील अन्य गावांतील लहान-मोठे तलाव, ओढे देखील भरून वाहताना दिसून येत आहे.
धरणाच्या वरील भागातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह येत असल्याने सध्या कुरनूर धरणातून पाणी खालच्या बाजूस मोट्याळ, बावकरवाडी, सांगवी बु येथील नदीपात्रात सोडले जात आहे. यामुळेच बोरी नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी वाढली आहे. म्हणून तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी नदीकाठच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

गरज पडल्यास नागरिकांचे स्थलांतर करून त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे, व त्यांना निवारा लाईट, पाण्याची व्यवस्था करण्याचे फर्मान तहसीलदार यांनी स्थानिक पातळीवरील कर्मचाऱ्यांना दिले.  सांगवी बु, खु, बोरीउमरगे, यासह बोरी नदीकाठच्या सर्व गावांना तहसीलदार यांनी भेट देत आहेत.

आणखीन पाणी वाढण्याची शक्यता नाकारता येत आहे. त्यामुळे, नदीकाठच्या सर्व नागरिकांना सुरक्षिततेचा इशारा देण्यात येत आहे. आणि वेळोवेळी स्थानिक पातळीवरील सर्व प्रशासनाचे कर्मचारी माहिती देत राहतील तसेच नागरिकांना सुरक्षित स्थळी ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.  नागरीकांनी ही सतर्क राहावे व सरपंच, उपसरपंच, सदस्य, पुढारी यांनी वेळोवेळी दक्षता घ्यावी, असे आवाहन केले आहे.

You Might Also Like

सोलापूर : टुर्स बुकिंगच्या आमिषातून ३१ लाखांची फसवणूक

जयकुमार गोरे यांच्या हस्ते बार्शी तालुक्यातील विकासकामांचे उद्घाटन

डॉ. वळसंगकर आत्महत्या : डॉ. शोनाली, डॉ. जोशींच्या सहीचे निवेदन व्हायरल

सोलापूर मनपा, नऊ नगर परिषदा, 11 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा

यशवंत पंचायत राजमध्ये सोलापूर जिल्हा परिषद तृतीय

TAGGED: #Discharge #cusecs #water #Kurnoor #Dam #warning #vigilant, #कुरनूर #धरणातून #२४००क्युसेक #पाण्याचा #विसर्ग #सतर्क #इशारा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बेकायदेशीर वाळू उत्खनन व चोरीला आळा घालण्यासाठी ‘ॲक्शन प्लॅन’
Next Article सोलापुरात औरंगाबाद वक्फ बोर्डाचे विभागीय कार्यालय लवकरच होणार

Latest News

थोरात कारखान्याच्या मदतीने हायटेक बसस्थानकाची स्वच्छता
महाराष्ट्र May 8, 2025
मालेगाव स्फोट प्रकरणाचा निकाल पुन्हा लांबणीवर
महाराष्ट्र May 8, 2025
पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट
देश - विदेश May 8, 2025
भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीममुळे पाकिस्तानी हल्ला निष्क्रीय
देश - विदेश May 8, 2025
ऑपरेशन सिंदूर’मध्ये 100 दहशतवादी ठार
देश - विदेश May 8, 2025
छत्तीसगड : चकमकीत 8 नक्षलवादी ठार, 5 जवान हुतात्मा
महाराष्ट्र May 8, 2025
दोन दिवसांपूर्वी झाला विवाह अन् फौजी निघाला देशसेवेसाठी
महाराष्ट्र May 8, 2025
अंगणवाडी सेविकांच्या कुटुंबासाठी मोफत आरोग्य तपासणी – आदिती तटकरे
महाराष्ट्र May 8, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?