Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: लाडकी बहिण योजना कधीही बंद पडणार नाही – उपमुख्यमंत्री शिंदे
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

लाडकी बहिण योजना कधीही बंद पडणार नाही – उपमुख्यमंत्री शिंदे

admin
Last updated: 2025/06/07 at 6:00 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

जळगाव , 7 जून (हिं.स.) महायुती सरकारने सुरु केलेली लाडकी बहीण योजने अंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात आहे. आतापर्यंत ११ हप्त्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. दरम्यान ही योजना बंद पडणार का ? या योजनेमुळे सरकार अडचणीत आलं आहे का ? अशा अनेक चर्चांना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पूर्णविराम दिला आहे.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना कधीही बंद पडणार नाही. या योजनेमुळे सरकार कुठेही अडचणीत आलेलं नाही. लाडक्या बहिणींसाठीची आर्थिक तरतूद आहे, ती सरकारनं केलेली आहे. दर महिन्याला देण्यात येणाऱ्या पैशांची तरतूद करण्यात आलेली आहे. संतांच्या लाडक्या बहिणीच्या मुक्ताईच्या दर्शनासाठी मी आलेलो आहे. तिथल्या वारकऱ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो’, असं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. ते जळगावात बोलत होते.

दरम्यान, मंत्री संजय शिरसाट यांच्याकडे असलेल्या सामाजिक न्याय खात्याचा ४१० कोटीचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला असल्याची माहिती समोर आली होती. तसेच मागच्या महिन्यात देखील आदिवासी खात्याच्या निधीचा वापर लाडकी बहीण योजनेसाठी वापरला असल्याची माहिती माध्यमांमध्ये झळकली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिंदे गटाच्या आमदार आणि मंत्र्यांना पुरेसा निधी देत नसल्याची खंत देखील त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे बोलून दाखवली होती. या सगळ्यावर आज मंत्री संजय शिरसाट यांना प्रश्न विचारला असता संजय शिरसाटांनी काढता पाय घेतला. इतकंच नाही तर शिंदेच्या मंत्र्यांना निधी मिळतो का ? असा सवाल केल्यावर मंत्री संजय शिरसाट यांनी माध्यम प्रतिनिधीना हात जोडले.

You Might Also Like

भारत विरुद्ध इंग्लंड लीड्स कसोटी रंगतदार अवस्थेत

विद्यार्थिनींकडून कोणतेही शुल्क घेऊ नका – चंद्रकांत पाटील

वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात

संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातून मार्गस्थ

एकनाथ शिंदे यांनी साधला स्थानिक काश्मीरी नागरिकांशी संवाद

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भारताच्या अत्याधिक गरीबी दरात सुधारणा- जागतिक बँक
Next Article छत्तीसगड : चकमकीत 7 नक्षलवाद्यांचा खात्मा

Latest News

भारत विरुद्ध इंग्लंड लीड्स कसोटी रंगतदार अवस्थेत
महाराष्ट्र June 23, 2025
सासवड पालिकेतर्फे पालखीचे जोरदार स्वागत
Top News June 23, 2025
विद्यार्थिनींकडून कोणतेही शुल्क घेऊ नका – चंद्रकांत पाटील
महाराष्ट्र June 22, 2025
सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले
सोलापूर June 22, 2025
वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात
महाराष्ट्र June 22, 2025
संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट
सोलापूर June 22, 2025
सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा
सोलापूर June 22, 2025
सोलापूर – जिल्ह्यात अवकाळीने 64 कोटींच्या पिकांचे नुकसान
सोलापूर June 22, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?