Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापुरातील गाव : एक लाख एकराला बांधच नाही, शेकडो वर्षाची परंपरा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsशिवारसोलापूर

सोलापुरातील गाव : एक लाख एकराला बांधच नाही, शेकडो वर्षाची परंपरा

Surajya Digital
Last updated: 2023/01/15 at 8:03 PM
Surajya Digital
Share
5 Min Read
SHARE

 

Contents
● महाराष्ट्रात एकमेव गाव; ना वाद ना तंटा; शेकडो वर्षाची परंपरास्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ जमिनीला धर नसल्यानं शेतात टाकलेलं बांध टिकत नाही□ मंगळवेढ्याची ज्वारी सातासमुद्रापार□ हद्दीवरून दोन शेतकऱ्यांत कधीच वाद होत नाहीत

● महाराष्ट्रात एकमेव गाव; ना वाद ना तंटा; शेकडो वर्षाची परंपरा

सोलापूर / शिवाजी हळणवर

राज्यात सर्वात जास्त तंटे हे शेतीच्या बांधावरुन होत असतात. बांधाच्या वादावरून अगदी सख्खे भाऊ पक्के वैरी झाल्याचे अनेक ठिकाणी आपल्या वाचनात किंवा पाहण्यात येते. महसूल, पोलीस आणि न्यायालयात सर्वात जास्त वाद देखील बांधावरुन झाल्याचे दिसते. Village in Solapur: One lakh acres is not built, hundreds of years of tradition Maharashtra Mangalvedha  मात्र, महाराष्ट्रातातील एक असे गाव आहे की जिथे शेतीला बांधच नाही. शेतीला बांध न घालण्याची शेकडो वर्षाची अनोखी परंपरा आजही कायम आहे. सोलापूर जिल्ह्यातील संत दामाजी पंताच्या पदस्पर्शाने पावण झालेल्या मंगळवेढा शिवारात आजही जवळपास 38 हजार हेक्टर म्हणजे 1 लाख एकर शेतीला बांध नाहीत.

 

एका बाजूला राज्यात पिढ्या वाढतील तशी शेतीच्या तुकड्यांची संख्या वाढत चालली आहे. हे होत असताना बांधाचे वाद ही महाराष्ट्रासमोरची मोठी डोकेदुखी बनत चालली आहे. मंगळवेढ्यात आजही शेतीला बांध न घालण्याची शेकडो वर्षाची अनोखी परंपरा आजही कायम आहे. इथे शेतीच्या शिवेवरून किंवा बांधावरून कधी वादच होत नाहीत.

 

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा हे शहर संत दामाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आणि संतपरंपरा असणारे शहर आहे. मंगळवेढ्यात जवळपास 38 हजार हेक्टर म्हणजे 1 लाख एकर शेतीला आजवर कधीच बांध घालण्याची परंपरा नाही. हे विशेष आहे. एखाद्या रोडवर सलग 15 किलोमीटरपर्यंत पाहत गेला तरी तुम्हाला बांध नावाचा प्रकार पाहायला मिळत नाही.

 

निसर्गाने दिलेल्या या परिस्थितीवर येथील हजारो शेतकऱ्यांनी समजूतदारपणे मात करीत महाराष्ट्रासमोर एक आदर्श उभा केला आहे. बांधावरून जीवघेण्यापर्यंत येणाऱ्या महाराष्ट्रातील इतर सुपीक बागायती गावांनी मंगळवेढ्याचा समजूतदारपणाचा आदर्श घेतल्यास यापुढे शेतीची शिव आणि बांधावरून होणारे वाद शमणार नसले तरी नक्की कमी होण्यास मदत होणार आहे. यासाठी फक्त स्वार्थीपणाला मुरड घालून थोडा समंजसपणा धरल्यास खऱ्या अर्थाने तंटामुक्त महाराष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

 

□ जमिनीला धर नसल्यानं शेतात टाकलेलं बांध टिकत नाही

 

मंगळवेढ्यातील जमिनीला धरच नसल्याने या शेतीत बांध केलेले टीकत नाहीत. एखाद्या पावसात केलेले बांध मोडून जातात. हा पूर्वापार चालत आलेला अनुभव असल्याने या भागातील शेतकरी कधी बांधाच घालण्याच्या भानगडीत पडत नाहीत. मग आपली जमीन केवळ नजरेवर ओळखायची कशी याचे टेक्निक देखील पिढ्यानपिढ्या चालत आलेले आहे.

तसे बांधावर असलेले एखादे झुडूप, एखादी दगडाची खून यावरून बांध नक्की होतात आणि यानंतर प्रत्येक शेतकरी आपल्या मालकीची जमीन लक्षात ठेवत असतो. याला शेजारी शेतकरी देखील कधी आक्षेप घेत नाही किंवा वाद करीत नाही.

□ मंगळवेढ्याची ज्वारी सातासमुद्रापार

 

मंगळवेढ्याची ओळख ज्वारीचे कोठार म्हणून केली जाते. येथील मालदांडी ज्वारीला केंद्र सरकारचे GI मानांकन देऊन तिला सातासमुद्रापार पोहोचवले आहे. अगदी 200 मीटरपर्यंत धर नसलेली काळ्याशार जमिनीतून ही कसदार ज्वारी पिकते. त्यामुळेच या शिवारातील गुळभेंडी हुरड्याला देखील काही न्यारीच चव असते.

येथील काळ्या कसदार जमिनीतून केवळ एखाद्या पावसावर येणारी मोत्यासारखी पांढरी शुभ्र ज्वारी, हरभरा, करडई या पिकात औषधी गुणधर्म असल्याने याला फार मोठी मागणी असते. येथील शेतकऱ्यांनी कधीच ज्वारीचे बियाणे बाजारातून खरेदी केल्याचे ऐकिवात नाही. पिढ्यानपिढ्या शेतात आलेल्या ज्वारीतून दरवर्षी पुढच्या वर्षीच्या बियाणासाठी थोडी ज्वारी ठेवण्याची ही परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आलेली आहे. त्यामुळेच की काय या परिसरात आजारी पाडण्याचे प्रमाण अत्यंत अत्यल्प असल्याने या भागात आयसीयू सेंटर देखील नसल्याचे अंकुश पडवळे  (कृषिभूषण, शेतकरी ) यांनी सांगितले.

□ हद्दीवरून दोन शेतकऱ्यांत कधीच वाद होत नाहीत

 

जमीन मालकासोबत बैलाला देखील मालकाच्या जमिनीच्या खुणा माहित असल्याने तो त्याच पद्धतीने नांगरट, पेरणी करीत असतो. तसेच आमच्या 10 पिढ्या जमीन कसत आहोत, जमिनीचे तुकडे पडत गेले तरी आमच्यात कधी हद्दीवरून आजवर वाद झाले नाहीत. जमिनीत धर नसल्याने येथील शेतकरी कधीच या शेतात वस्ती करून राहू शकत नाहीत. तसे येणारे पीक फक्त पावसावर अवलंबून असल्यानं आपल्या शेतावर येण्यासाठी सुद्धा घरातून पिण्यासाठी पाणी आणावे लागते.

काळ्या मातीमुळं इथे कोणत्याही शेतात ना विहीर आहे ना बोअरवेल आहे. त्यामुळं प्रत्येक शेतकरी सकाळी रानात येऊन संध्याकाळी परत जातो. पिढ्यानपिढ्या शेतकऱ्यांमध्ये असणाऱ्या या समजूतदारपणामुळं इथे कोणतेच वाद कधी होत नाहीत.

– मुरलीधर दत्तू
संचालक, संत दामाजी कारखाना

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Village #Solapur #One #lakh #acres #not #built #hundreds #years #tradition #Maharashtra #Mangalvedha #santdamaji, #संतदामाजी #मंगळवेढा, #सोलापूर #महाराष्ट्र #एकमेव #गाव #एकलाख #एकर #बांध #शेकडो #वर्ष #परंपरा #शेती #शेतकरी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापुरात डोक्यात फरशी घालून एकाचा खून, जवळच आढळला फरशीचा तुकडा
Next Article परिचारक – भालके समविचारी आघाडीने वाढवली आमदार अवताडेंची डोकेदुखी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?