Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: महाळुंग श्रीपूर नगराध्यक्ष निवडणुकीतून राष्ट्रवादीची माघार, स्थानिक आघाडीच्या लक्ष्मी चव्हाण होणार बिनविरोध नगराध्यक्ष
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारणसोलापूर

महाळुंग श्रीपूर नगराध्यक्ष निवडणुकीतून राष्ट्रवादीची माघार, स्थानिक आघाडीच्या लक्ष्मी चव्हाण होणार बिनविरोध नगराध्यक्ष

Surajya Digital
Last updated: 2022/02/17 at 9:15 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

श्रीपूर : महाळूंग श्रीपूर नगरपंचायतीच्या निवडणुकीतून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवाराने नामदेव इंगळे यांनी माघार घेतल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळेच स्थानिक आघाडीच्या लक्ष्मी चव्हाण बिनविरोध नगराध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला.

राष्ट्रवादीच्या उमेदवाराने माघार घेतल्यामुळे स्थानिक आघाडीच्या उमेदवार लक्ष्मी अशोक चव्हाण या भिमराव रेडे पाटील स्थानिक पॅनलवर रिपाइं युती आहे. या युतीमधून रिपाइंकडून आघाडीतून लक्ष्मी चव्हाण या निवडून आल्या आहेत. त्यांचा बिनविरोध निवडीची केवळ औपचारिकता उरली आहे.
१७ सदस्य असलेल्या या नगरपंचायतीमध्ये स्थानीक आघाडीचे नऊ सदस्य निवडून आले आहेत. NCP withdraws from Mahalung Sreepur mayoral election; Local leader Lakshmi Chavan will be the unopposed mayor

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सहा सदस्य, तर कॉंग्रेस व भाजपचा प्रत्येकी एक सदस्य विजयी झाले आहेत. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी विकास आघाडीने लक्ष्मी चव्हाण यांचा व राष्ट्रवादी कॉंग्रेसने नामदेव इंगळे यांचा उमेदवारी अर्ज भरला होता. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख होती. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार नामदेव इंगळे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे लक्ष्मी चव्हाण यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

उद्या शुक्रवारी (दि.१८) नगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर उपनगराध्यक्ष पदाची निवड होणार आहे. या पदावर सुध्दा स्थानिक आघाडीच्या उमेदवाराची वर्णी लागणार आहे. हे आज स्पष्ट झाले आहे. स्थानिक आघाडीचे नेते नानासाहेब मुंडफणे व भिमराव रेडे पाटील यांच्या समन्वयातून उपनराध्यक्ष पदाचा उमेदवार निश्‍चित होण्याची शक्यता आहे. स्थानिक आघाडीने नगराध्यक्ष पदासाठी रेडे पाटील गटाचा उमेदवार दिला आहे. त्यामुळे उपनगराध्यक्ष पदासाठी नानासाहेब मुंडफणे गटाला संधी मिळू शकते.

You Might Also Like

फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ऑक्टोबरमध्ये

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

TAGGED: #NCP #withdraws #Mahalung #Sreepur #mayoral #election #Localleader #LakshmiChavan #unopposed #mayor, #स्थानिक #आघाडी #लक्ष्मीचव्हाण #बिनविरोध #नगराध्यक्ष
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article उपचारासाठी टाळाटाळ; आरोग्य केंद्राच्या दारातच प्रसुती, अर्भकाचा मृत्यू
Next Article सोलापुरात पिकअप उलटल्याने 9 प्रवासी जखमी; नवर्‍याच्या घरात का राहते म्हणून सवतीला मारहाण

Latest News

इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज
देश - विदेश June 24, 2025
शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण
महाराष्ट्र June 24, 2025
फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी
राजकारण June 24, 2025
महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल
महाराष्ट्र June 24, 2025
नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार
देश - विदेश June 24, 2025
दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक
देश - विदेश June 24, 2025
भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 24, 2025
crime
सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक
सोलापूर June 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?