Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: Blog उपेक्षेचे धनी ठरलेले लालकृष्ण अडवाणी; वृध्दापकाळात उपेक्षा वाट्याला आलेला राजकीय प्रवास
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsब्लॉगराजकारण

Blog उपेक्षेचे धनी ठरलेले लालकृष्ण अडवाणी; वृध्दापकाळात उपेक्षा वाट्याला आलेला राजकीय प्रवास

Surajya Digital
Last updated: 2022/11/09 at 1:53 PM
Surajya Digital
Share
5 Min Read
SHARE

 

आज लालकृष्ण अडवाणींच्या वयाचे शिल्पकार राम सुतार अयोध्येत रामराज्याचे पुनरागमन अधोरेखित करणाऱ्या भगवान रामाची अतिभव्य मूर्ती साकारण्यात गर्क आहेत. पण त्यांच्याप्रमाणेच शरीर, मन, बुद्धी आणि विचार शाबूत असलेले अयोध्येतील राम मंदिर आंदोलनाचे शिल्पकार अडवाणी यांच्या वाट्याला कधीच न संपणारा वनवास आला आहे. Lalkrishna Advani who became the master of neglect; A neglected political travel blog in old age

 

जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीवादी पक्षाचे शिल्पकार लालकृष्ण अडवाणी, मंगळवारी ९५ वर्षांचे झाले. कर्तृत्व सिद्ध करूनही वृध्दापकाळात उपेक्षा वाट्याला आलेला त्यांचा राजकीय प्रवास कोणालाही अंतर्मुख करणारा ठरावा. अडवाणींच्या राजकीय महत्त्वाकांक्षा वाजपेयींमुळे बोथट झाल्या की मोदींमुळे की त्यांच्या स्वतःच्या चुकांमुळे? अडवाणींचे राजकारणातील तारुण्य वाजपेयी नावाच्या वटवृक्षाच्या ६५ वर्षांच्या दीर्घ सहवासाच्या सावलीत करपून गेले. उरल्या फक्त वाजपेयींसोबत पाहिलेल्या ‘फिर सुबह होगी’ सारख्या चित्रपटांच्या आठवणी.

पंतप्रधान म्हणून उदारमतवादी वाजपेयींची धोरणे न पटल्याने संघाने त्यांना राजकारणातून निवृत्त करेपर्यंत २००४ वर्ष उजाडले. या रोषाची जाणीव असलेले अडवाणी वाजपेयींच्या पश्चात हिंदुत्वाचा अजेंडा केंद्रस्थानी ठेवतील, अशी संघाला अपेक्षा होती.

त्यातून काँग्रेस- यूपीएविरुद्ध २००९ ची निवडणूक जिंकून पंतप्रधान होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची शेवटची संधीही अडवाणींना साधता आली असती. पण कराचीतून दिल्लीत येऊन संघाचे खंदे स्वयंसेवक झालेले अडवाणी दिल्लीहून परत कराचीला जाताच
वाजपेयींसारखे उदार होण्याच्या नादात कुणाच्या ध्यानीमनी नसताना बॅरिस्टर जिनांच्या मजारवर नतमस्तक झाले. इतकी वर्षे संपादन केलेल्या संघाच्या विश्वासार्हतेचा हौद त्यांनी जिनांच्या एका थेंबाच्या प्रशंसेतून त्यांनी रिकामा करून टाकला.

भाजपने २००९ ची लोकसभा निवडणूक गमावल्यानंतर पुढची पाच वर्षे अडवाणींना त्यांची सावलीही साथ देईनाशी झाली. पक्षातल्या तुलनेने तरुण नेत्यांपैकी आपण नेमकी कोणाला साथ द्यावी, हेही ते नीट ठरवू शकले नाहीत. भाजपच्या पडतीच्या काळात पक्षाची धुरा सांभाळायला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नागपुरातून दिल्लीत आलेल्या नितीन गडकरींशी त्यांचे फारसे पटलेच नाही.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण, याचा निर्णय निवडणुकीचा निकाल लागल्यावर घेऊ अशी भूमिका घेणाऱ्या गडकरींचे समर्थन केले असते तर अडवाणींना कदाचित आणखी एक संधी मिळाली असती. पण गडकरी दुसऱ्यांदा अध्यक्ष होत असताना ‘पूर्ती’ समूहावरून उठलेल्या वादंगात त्यांच्या विरोधात व्हेटो वापरून अडवाणींनी पंतप्रधान होण्याची स्वतः च्याही ‘स्वप्नपूर्ती’ ची संधी लाथाडली. एवढेच नव्हे तर गुजरात दंगलींनंतर ज्या नरेंद्र मोदींचा वाजपेयींसह पक्षातील इतर उदारमतवादी नेत्यांचा रोष पत्करून बचाव केला, याच मोदींचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नाव येताच अडवाणींनी विरोध करण्याची भूमिका घेतली. मोदींचे समर्थन केले असते तर मार्गदर्शक मंडळात समावेश होऊनही भाजपमध्ये अडवाणींचे मानाचे स्थान अबाधित राहिले असते. पण अडवाणी या सांत्वनपर सन्मानासही पात्र ठरू शकले नाहीत.

 

नरेंद्र मोदींच्या सौजन्याने २०१४ मध्ये ते गांधीनगरमधून लोकसभेवर शेवटचे निवडून आले. भाजपला लाभलेल्या पूर्ण बहुमताच्या सत्तेचा ऐतिहासिक आणि भावुक क्षण बघण्याची संधी दिली, ही नरेंद्रभाई मोदींची कृपा आहे, अशी बदलत्या काळाची जाणीव झालेल्या अडवाणींनी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये उपकृततेची भावना व्यक्त केली. पण तोपर्यंत उशीर झाला होता.

 

‘क्या माँ की सेवा कभी कृपा हो सकती है ? कतई नहीं हो सकती, ‘ असे उपस्थितांना भावविवश करीत,
दाटलेला कंठ पाण्याचा घोट घेत मोकळा करणाऱ्या मोदींनी त्याच क्षणी गुरू अडवाणींचे सर्व कर्ज फेडले. त्यानंतर सुरू झाला अडवाणींचा पृथ्वीराज रोडवरील सरकारी बंगल्यातील राजकीय वनवास. पंतप्रधान होताच मोदींनी अडवाणींची मार्गदर्शक मंडळ नावाच्या बंदीगृहात रवानगी केले. लोकसभेत सत्ताधारी भाजपच्या पहिल्या बाकावर मूकदर्शक होऊन श्रवणानंदासाठी उपस्थित राहणेच त्यांच्या वाट्याला आले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्रभाईंची कृपाही त्यांच्या वाट्याला आली नाही. माध्यमे आणि समाज माध्यमांवरील अडवाणींचे अस्तित्व नगण्य आणि एखाद्या समकालीन नेत्याच्या निधनावर शोकसंवेदना व्यक्त करण्यापुरते उरले.

आज अडवाणींच्या वयाचे शिल्पकार राम सुतार अयोध्येत रामराज्याचे पुनरागमन अधोरेखित करणाऱ्या भगवान रामाची अतिभव्य मूर्ती साकारण्यात गर्क आहेत. पण त्यांच्याप्रमाणेच शरीर, मन, बुध्दी आणि विचार शाबूत असलेले अयोध्येतील राम मंदिर आंदोलनाचे शिल्पकार अडवाणी यांच्या वाट्याला कधीच न संपणारा वनवास आला आहे. भाजपचे निवडणूक चिन्ह कमळाची प्रेरणा अडवाणींच्या राजकीय वाटचालीवर गाढा प्रभाव असलेल्या त्यांच्या पत्नी कमला अडवाणींच्या नावातून मिळाली असावी, असे गंमतीने म्हटले जायचे.

 

अडवाणींच्या दैवदुर्विलासाने नेमक्या भाजपच्या स्थापनादिनी म्हणजे ६ एप्रिल २०१६ रोजीच कमला अडवाणींची इहलोकाची यात्रा संपली. भाजपशी असलेले अडवाणींचे उरलेसुरले नातेही प्रतीकात्मकदृष्ट्या तिथेच संपले, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

📝 📝 📝

– सुनील चावके

You Might Also Like

वडिलांचा ‘तो’ सल्ला ऐकायला हवा होता – अमित ठाकरे

राज्यात तर तीन माकडांचे सरकार- बच्चू कडू

ऑपरेशन सिंदूरसाठी शरद पवारांकडून अभिनंदन

जुन्या ओबीसी आरक्षणा नुसार निवडणुकांचे भुजबळ यांनी केलं स्वागत

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

TAGGED: #LalkrishnaAdvani #master #neglect #neglected #political #travel #blog #oldage, #उपेक्षेचे #धनी #ठरलेले #लालकृष्णअडवाणी #वृध्दापकाळ #उपेक्षा #वाट्याला #राजकीय #प्रवास #ब्लॉग
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शिंदे गटातील आमदार वैतागले; पन्नास खोक्यांवरून टीका कराल तर मानहानीचा खटला होणार दाखल
Next Article संजय राऊतांना जामीन । ‘टायगर इज बॅक !’; वाघ बाहेर आला, पवारांनी पोस्ट केलेला व्हिडिओ पहा

Latest News

सांबा सेक्टरमध्ये 7 घुसखोरांना कंठस्नान
देश - विदेश May 9, 2025
संघाकडून भारतीय सैन्याचे अभिनंदन
Top News May 9, 2025
सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या
सोलापूर May 9, 2025
भारत-पाकिस्तान तणावादरम्यान स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी
सोलापूर May 9, 2025
सोलापूरात पाणीपातळी २० टक्क्यांवर गेल्याने घटला कॅनॉलचा विसर्ग
सोलापूर May 9, 2025
crime
पंढरपुरात पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला खुनाचा डाव
सोलापूर May 9, 2025
पंजाबमध्ये सर्व शैक्षणिक संस्था बंद, परीक्षा रद्द
देश - विदेश May 9, 2025
सोलापूर तापमानाचा पारा घटला; आठवड्यात ८ अंशांनी घट
सोलापूर May 9, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?