Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: लातुरात बाल लैंगिक प्रकरणासाठी विशेष न्यायालय; राज्यात आणखी ३० विशेष न्यायालये स्थापन होणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

लातुरात बाल लैंगिक प्रकरणासाठी विशेष न्यायालय; राज्यात आणखी ३० विशेष न्यायालये स्थापन होणार

Surajya Digital
Last updated: 2020/07/24 at 4:31 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

लातूर : बाल लैंगिक अत्याचार प्रकरणात पिडीत मुलीं-मुलांना जलद गतीने न्याय मिळावा या उद्देशाने लातुरात विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे. राज्यात ३० असे विशेष न्यायालये स्थापन करण्यात येत असून त्यात लातूरचा समावेश आहे. या न्यायालयाकडे बाल लैंगिक अत्याचाराची दीडशे प्रकरणे वर्ग करण्यात आली आहे.

देशात बाल लैंगिक अत्याचाराची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत चालली आहेत. असे प्रकरणे नियमित न्यायालयांतर्गत चालवली जात होती. यातून निकालाला विलंब लागत होता. यात एका जनहित याचिकेत सर्वोच्च न्यायालयाने शंभर पेक्षा अधिक प्रकरणे प्रलंबित असलेल्या जिल्ह्यांच्या ठिकाणी विशेष न्यायालये स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्यात ३० विशेष न्यायालय स्थापन करण्यात येणार आहेत. यात लातूरचा समावेश करण्यात आला आहे. या न्यायालयाकरीता सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधिशांची विशेष सत्र न्यायाधिश म्हणून नियुक्ती करण्याचे शासनाचे आदेश आहेत.

त्यानुसार लातूरच्या या विशेष न्यायालयाचे विशेष सत्र न्यायाधिश म्हणून बी. एस. कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बाल लैंगिक अत्याचार कायद्यांतर्गतची प्रलंबित प्रकरणे चालवून त्वरीत निकाली काढण्याचे काम या न्यायालयातून होणार आहे. यातून पिडीत लहान मुलींना न्याय मिळण्यास मदत होणार आहे. येथील या विशेष न्यायालयाचे विशेष सरकारी वकिल म्हणून शासनाने मंगेश महिंद्रकर यांची नियुक्ती केली आहे.

“बाल लैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत प्रकरणाचा निपटारा तातडीने व्हावा या करीता ही विशेष न्यायालये सुरु करण्यात आली आहेत. लातूरच्या या विशेष न्यायालयांतर्गत लातूर, रेणापूर, औसा, चाकूर हे तालुक्यातील बाल लैंगिक अत्याचाराची प्रकरणे येणार आहेत. या न्यायालयाकडे १५० प्रकरणे वर्ग करण्यात आली आहेत”

ॲड. मंगेश महिंद्रकर, विशेष सरकारी वकिल – लातूर

You Might Also Like

उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल

पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला

न्यायाधीश समाजाशी एकरुप असावा – भूषण गवई

हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा

TAGGED: #लातूर #न्यायालय #बाल #विशेषन्यायालय
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘लॉकडाऊन’ नावाची 40 फूट विहीर खोदून ग्रामस्थांनी लॉकडाऊनच नाव केले ‘चिरंतन’
Next Article सोलापूर शहरात कोरोनाचे आज पुन्हा 127 रुग्ण वाढले, एक मृत्यू तर 185 जण कोरोनामुक्त

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?