लातूर, ४ सप्टेंबर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी देशाला दिलेले वचन पूर्णत्वास नेत जीएसटी या अप्रत्यक्ष कर प्रणालीत आमुलाग्र सुधारणा केल्या आहेत. जीएसटी मध्ये अभिनंदनीय सुधारणा झाली असल्याची प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी दिली आहे. ५%, १२%, १८% आणि २८% या टॅक्स स्लॅबच्या जागी ५% आणि १८% या दोनच स्लॅब ठेवल्या आहेत.
सुपर लक्झरी आणि तंबाखूजन्य पदार्थांवर ४०% जीएसटी असणार आहे, तर शैक्षणिक साहित्य व विमा कवच सारख्या अनेक महत्त्वाच्या गोष्टींवरील टॅक्स शून्य टक्के करण्यात आला आहे. बहुतांश गोष्टींवरील टॅक्स कमी झाल्याने आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे.