Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: प्रचाराला जात असलेल्या ‘वंचित’च्या लातूर जिल्हाध्यक्षांसह पाचजणांचा दुर्दैवी मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

प्रचाराला जात असलेल्या ‘वंचित’च्या लातूर जिल्हाध्यक्षांसह पाचजणांचा दुर्दैवी मृत्यू

Surajya Digital
Last updated: 2020/11/26 at 5:55 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

बीड / लातूर : जिल्ह्यातील गेवराईजवळ कार आणि ऑईल टँकरचा भीषण अपघात झाला. या अपघातात वंचित बहुजन आघाडीच्या पाच पदाधिकाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात पाच पदाधिकाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. पोलिसांनी क्रेन बोलावून कार बाजूला केली.

दरम्यान , वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या घटनेमुळे तीव्र दुःख झाल्याचे समाज माध्यमावर म्हटले आहे.

औरंगाबादकडे जात असताना वंचितच्या पदाधिकाऱ्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. लातूरचे वंचितचे जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे यांचा मृतात समावेश आहे. गेवराई बायपास जवळ झालेल्या अपघातातील सर्व पदाधिकारी लातूरचे रहिवासी आहेत. गेवराई शहरापासून दोन किमी अंतरावर असणा-या बायपासजवळ कारचा भीषण अपघात झाला.

अपघातात वंचित बहुजन आघाडीच्या पाच पदाधिकाऱ्यांचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी आहे. अपघातात मृत्यू झालेले सर्व पदाधिकारी लातूरचे रहिवासी असल्याची माहिती आहे. ते लातूरहून बीड मार्ग औरंगाबादकडे पक्षाच्या प्रचारासाठी जात होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* ताबा सुटल्याने अपघात

हा अपघात कारचालकाचा ताबा सुटल्याने झाल्याचं सागण्यात येत आहे. चालकाचा ताबा सुटल्याने कार ऑईल टँकरला जाऊन धडकली. या भीषण अपघातात पाच मृत्यू झाला आहे. काही मृतांची नावे अद्याप समजलेली नाहीत. एका जखमीवर बीडमध्ये उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त कारवरुन गाडीतून प्रवास करणाऱ्या व्यक्ती वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी असल्याचे स्पष्ट झाले.

* गाडीत प्रचाराचे साहित्य

अपघातग्रस्त कारमध्ये मराठवाडा पदवीधर निवडणुकीचे प्रचार साहित्य होते. त्यावरून सर्वजण वंचितच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ जात असल्याचे समजते. सर्व पदाधिकारी लातूरचे रहिवासी असून ते लातूरहून बीड मार्गे औरंगाबादकडे जात होते. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #प्रचाराला #जातअसलेल्या #वंचितच्या #लातूर #जिल्हाध्यक्षांसह #पाचजणांचा #दुर्दैवी मृत्यू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ संप, सरकारने दिला शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा
Next Article पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी पुणे दौऱ्यावर; एक तास घालवणार सिरम इन्स्टिट्यूटमध्ये वेळ

Latest News

Как чувство риска помогает почувствовать себя энергичным
Top News December 16, 2025
Почему мы нравится мониторить за чартами
Top News December 16, 2025
По какой причине человекам приятно следить за процессом чужим опасностью
Top News December 16, 2025
Genießen Sie die handheld App von Spingranny Casino für Casino-Spiele in Deutschland
Top News November 3, 2025
Lemon Casino – Word nu lid en spin voor levensveranderende prijzen
Top News November 3, 2025
Kifizetések és befizetések a Shuffle Játékteremben Magyarországon
Top News November 3, 2025
Kraken Casino – Türkiye Oyuncuları İçin Premium Bir Çevrimiçi Casino
Top News November 3, 2025
Spielen Sie Live-Spiele und erzielen Sie sofort über das Spingranny Casino
Top News November 3, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?