Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: Lavani artist Meena Deshmukh सोलापूर । फॉर्म्युनर कार कालव्यात कोसळली; लावणी कलावंत मीना देशमुखांचे निधन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

Lavani artist Meena Deshmukh सोलापूर । फॉर्म्युनर कार कालव्यात कोसळली; लावणी कलावंत मीना देशमुखांचे निधन

Surajya Digital
Last updated: 2022/11/28 at 6:16 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

सोलापूर : ज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख यांचे अपघातात निधन झाले आहे. पंढपूरजवळ एक फॉर्म्युनर कार 50 फूट खोल कालव्यात पडल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. रविवारी (ता. 27) रात्रीच्या सुमारास अपघात झाला. Solapur. Formuner car crashes into canal; Lavani artist Meena Deshmukh passed away Pandharpur Modlimb

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)● दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयासमोर वृद्ध शेतकऱ्याचे नग्न आंदोलन

 

या रस्त्यावरुन जाताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे. अपघातातील जखमींना रुग्णालयात नेण्यात आले आहे. यावेळी त्या मोडलिंबकडून पंढरपूरकडे चालल्या होत्या. फॉर्च्युनर कार 50 फूट खोल कालव्यात कोसळली या अपघातात कलावंत मीना देशमुख यांचे निधन झाले. तर तीन जखमी झाले आहेत. पंढरपूर कुर्डुवाडी रस्ताच्या चौपदीकरणाचं काम सुरु असल्यामुळे या पुलावर नेहमी अपघात घडतात. रात्रीच्या वेळी या अरुंद पुलावरून जात असता कार चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार 50 फूट खोल कालव्यात कोसळली.

 

या अपघातात लावणी कलावंत यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची कन्या, नातं, आणि वाहन चालक हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची कार ज्या कालव्यात पडली त्या ठिकाणी उतरायला जागा नाही. अपघाताची माहिती मिळतातच स्थानिक नागरिकांनी बचाव कार्य सुरु केले. रुग्णवाहिका बोलावून तातडीने दोऱ्याच्या साहाय्याने जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले.

 

स्थानिकांनी जखमींना दोरीच्या साहाय्याने बाहेर काढले आणि उपचारासाठी पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, या अपघातात मीना देशमुख यांचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. रात्री या रस्त्यावरील अरुंद पूल ओलांडताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार खोल कालव्यात पडल्याचे सांगण्यात येत आहे.

 

 

पंढरपूर – कुर्डूवाडी रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले असताना पाटबंधारे विभागाच्या अनास्थेमुळे या पुलाबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे हा पूल सध्या प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा ठरत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आलंय.

 

अरुंद पुलामुळे या परिसरात अनेकदा अपघात हाेतात. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणखी किती अपघात हाेऊन बळीं जाण्याची वाट पाहणार आहेत असा प्रश्न परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

● दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयासमोर वृद्ध शेतकऱ्याचे नग्न आंदोलन

दक्षिण सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिंगडगाव येथे आहे अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाले आहे. ती नुकसान भरपाई अद्यापही मिळाली नसल्याने कुमार नामदेव मोरे हे तहसील कार्यालयात आले होते. मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी थेट अंगावरील सर्व कपडे काढून नग्न आंदोलन केले. 

दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयासमोर सोमवारी एका वृद्ध शेतकऱ्याने अंगावरील सगळे कपडे काढून नग्न अवस्थेत बराच वेळ ठिय्या मांडला होता. हे पाहण्यासाठी बघायची मोठी गर्दी झाली होती.
संबंधित शेतकऱ्याचे नाव कुमार नामदेव मोरे असे असून त्यांचे शेत दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिंगडगाव येथे आहे. अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाले आहे. ती नुकसान भरपाई अद्यापही मिळाली नसल्याने मोरे हे तहसील कार्यालयात आले होते. मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी थेट अंगावरील सर्व कपडे काढून नग्न आंदोलन केले.

 

संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्याला हे समजले असता ते तातडीने तेथे येऊन त्या शेतकऱ्याला कपडे घालण्यास लावले कार्यालयामध्ये नेऊन कागदपत्रे दाखवले असता दहा नोव्हेंबर रोजीच त्यांचा अतिवृष्टीचा मदत निधी बँकेकडे पाठवल्याची माहिती मिळाली. तेव्हा कुठे मोरे शांत झाले. एवढ्या दिवसात चेक कसा जमा झाला नाही? असा प्रश्न करत बँकेकडून चूक दिसून आल्यास त्या ठिकाणी मी नग्न आंदोलन करेल असा इशारा यावेळी त्यांनी दिला.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Pandharpur #Modlimb, #Solapur #Formunercar #crashes #canal #Lavani #artist #MeenaDeshmukh #passedaway Pandharpur Modlimb, #सोलापूर #फॉर्म्युनर #कार #कालवा #कोसळली #लावणी #कलावंत #मीनादेशमुख #निधन #पंढरपूर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article लातूरमधील अधिकाऱ्याच्या पत्नीची सोलापूरच्या हॉटेलमध्ये आत्महत्या
Next Article राज्यपालांची पदमुक्त होण्याची इच्छा ! महाराष्ट्र बंदचे संकेत देताच पळापळ

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?