नाशिक, 13 एप्रिल (हिं.स.)।
: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रायगडावर गेले. त्यांनी आता शत्रू कोण आहे ? हे ठरवावे लागेल. देशात कायदा सुव्यवस्था राखली जावी असे वाटत असेल तर शाह यांनी स्वतःहून चर्चा निर्माण केली पाहिजे. खरे गुन्हेगार सोडून विरोधी पक्षातील लोकांना शासन देण्याचे काम बंद करावे असे आवाहन खासदार अरविंद सावंत यांनी केले.
परशुराम सायखेडकर नाट्यगृहात भगवान महावीर जन्मकल्याणक सोहळ्यानिमित्त व्याख्यानमालेत तीसरे शेवटचे पुष्प खासदार अरविंद सावंत यांनी भारतीय लोकशाहीचे भवितव्य या विषयावर गुंफले. तत्पूर्वी शासकीय विश्रामगृहात माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. देशाचे गृहमंत्री रायगडवर येतात आणि त्या जिल्ह्याचा पालकमंत्रीपदाचा प्रश्न सोडवू शकत नाहीत. रायगडावर आल्यानंतर तरी शहा यांनी आपला शत्रू आणि मित्र कोण याबाबत परखडपणे विचार मांडावेत. तिथे गेल्यानंतर चौफेर नजर गेली पाहिजे ,त्यांची लढाई कोणाशी होती मुस्लिमांशी होती का मुघलांशी होती हे ठरवा.देशात महागाईसह बोरोजगारी आणि इतर प्रश्नांनी डोके वर काढले आहे. वक्फ विरोधात वातावरण तापले आहे. त्या मुद्यांवरून लक्ष बाजुला करण्यासाठी सत्ताधारी इतर मुद्द्यांना महत्व दिले आहे. मुनव्वर राणा मुद्याचे त्यासाठीच भांडवल सुरू असल्याचाआरोपही खा. सावंत यांनी केला.
देशात महागाईसह बेरोजगारी आणि इतर प्रश्नांनी डोके वर काढले आहे. वक्फ विरोधात वातावरण तापले आहे. त्या मुद्यांवरून लक्ष बाजुला करण्यासाठी सत्ताधारी इतर मुद्द्यांना महत्व दिले आहे. मुनव्वर राणा मुद्याचे त्यासाठीच भांडवल सुरू असल्याचा आरोप उद्धवसेनेचे खा. अरविंद सावंत यांनी केला.
महावीर जयंती व्याख्यानमालेसाठी नाशिकमध्ये आले असता शासकीय विश्रामगृहात माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत बोलताना त्यांनी भाजपमधल्या वादावर टीका केली. देशाचे गृहमंत्री रायगडवर येतात आणि पालकमंत्रीपदाचा प्रश्न सोडवू शकत नाहीत. रायगडावर आल्यानंतर तरी शहा यांनी आपला शत्रू आणि मित्र कोण याबाबत परखडपणे विचार मांडावेत असे मत सावंत यांनी व्यक्त केले.