Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शिवसेना ज्येष्ठ नेते सुधीर जोशींवर अंत्यसंस्कार, भूषवलेली अनेक खास पदे
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

शिवसेना ज्येष्ठ नेते सुधीर जोशींवर अंत्यसंस्कार, भूषवलेली अनेक खास पदे

Surajya Digital
Last updated: 2022/02/18 at 3:37 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

मुंबई : शिवसेना ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार झाले. ठाकरे कुटुंबिय यावेळी उपस्थित होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सहकारी आणि सच्चे शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती.

सुधीर जोशी यांनी वयाच्या 81 व्या वर्षी काल गुरुवारी अखेरचा श्वास घेतला. बाळासाहेब ठाकरेंचे सुधीर जोशी अत्यंत जवळचे सहकारी होते. जानेवारीमध्ये सुधीर जोशींना कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी त्यांना जसलोक रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

मुंबईचे माजी महापौर तसंच माजी मंत्री सुधीर जोशी यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धाजंली वाहिली आहे. मराठी भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांना आवाज देणारा सहृदयी नेता सुधीर जोशी यांना आज आपण गमावले आहे. त्यांच्यारखे व्रतस्थ आणि निष्ठावान असे उदाहरण आता दुर्मीळ झाले आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

सुधीरभाऊंनी मुंबईचे महापौर आणि महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री म्हणून दिलेले योगदान महाराष्ट्र सदैव स्मरणात ठेवेल, अशी श्रद्धांजलीही दिवंगत जोशी यांना अर्पण केली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी ते पहिल्या फळीतील निष्ठावान शिवसैनिक होते, त्यांच्या निधनाने शिवसेना एका सच्चा शिवसैनिकाला मुकली आहे. सुधीरभाऊंच्या जाण्याने माझी वैयक्तिक हानी झाली आहे, असही ठाकरे यांनी नमूद केलं.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांच्या निधनाने मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा लढवय्या नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. Funeral on Shiv Sena senior leader Sudhir Joshi, many special posts held

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

मुख्यमंत्री यांनी या शोकसंदेशात सांगितले की, कार्यकर्त्याचा पिंड आणि जनसामान्यांबद्दल प्रचंड कळवळा असल्यानेच दिवंगत सुधीरभाऊंनी शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून मराठी भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांना आवाज देण्याचा लढा उभारला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांसाठी ते पहिल्या फळीतील निष्ठावंत शिवसैनिक होते. त्यांच्या राजकारण आणि समाजकारणातील समतोल साधण्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे सुधीरभाऊ अखेरपर्यंत काम करत राहीले.

मुंबई आणि महाराष्ट्रातील अनेक कामगार, कर्मचारी संघटनांची त्यांनी उत्कृष्ट बांधणी केली. या संघटनेमुळेच मराठी भूमिपुत्रांना अनेक रोजगार, नोकऱ्यांच्या उत्तमोत्तम संधी मिळविता आल्या. सामान्य माणसांना, कष्टकरी – कामगारांना त्यांच्या न्याय हक्कांसाठी मदत करण्यात ते सातत्याने आघाडीवर होते. विधिमंडळात पोहचल्यावरही त्यांनी आपल्या अभ्यासू मांडणीने आणि अंगभूत हुशारीने अशाच प्रश्नांची मांडणी केली. त्यामाध्यमातून त्यांनी अनेक प्रश्नांवर आवाज उठवत, अनेकांना न्याय मिळवून दिला. असंही मुख्यमंत्री यांनी नमूद केलं आहे.

कोणत्या शब्दात श्रद्धांजली वाहू?
भाऊ तुमच्यासारखे तुम्हीच.
तुमचे स्मरण शिवसेनेला सदैव राहील..सुधीर जोशी अमर आहेत…अशी पोस्ट टाकून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भावना व्यक्त केल्या.

□ भूषवलेली काही खास पदे

अध्यक्ष- शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष

अध्यक्ष / विश्वस्त – साने गुरुजी विद्यालय, दादर सार्वजनिक वाचनालय

कार्यकारी समिती सदस्य – गरवारे क्लब.

सल्लागार-जसलोक रुग्णालय कर्मचारी संघटना.

विश्वस्त-जाणीव प्रतिष्ठान.

विश्वस्त-शिवाई सेवा ट्रस्ट.

अध्यक्ष-बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी सेना.

अध्यक्ष – इंडियन ओव्हरसीज बँक कर्मचारी सेना

अध्यक्ष – कॅनरा बँक कर्मचारी सेना

अध्यक्ष – महाराष्ट्र दूध वितरक सेना.

अध्यक्ष – विमा कर्मचारी सेना.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #Funeral #ShivSena #senior #leader #SudhirJoshi #special #posts, #शिवसेना #ज्येष्ठनेते #सुधीरजोशी #अंत्यसंस्कार #भूषवलेली #खास #पदे
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘माझ्या हत्येचा कट रचला जातोय’, गायिका वैशाली माडेची पोस्ट
Next Article दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकला; कोर्टात याचिका

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?