Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: काय भाजप… काय नेते…काय धंदे..? समधं लाजिरवाणं….
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारणसोलापूर

काय भाजप… काय नेते…काय धंदे..? समधं लाजिरवाणं….

Surajya Digital
Last updated: 2022/07/24 at 11:50 AM
Surajya Digital
Share
5 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ दैवाने दिले, कर्माने नेले…□ तेव्हाचे निष्ठावंत, आताचे ‘धंदे’वाईक…. ‘धंदेवाईक…..

सोलापूर : पुरुषोत्तम कुलकर्णी

भारतीय जनता पक्षातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते अत्यंत शालिन असतात. त्यागी असतात. त्यांच्यात अभ्यासूवृत्तीही असते, अशा शब्दात या पक्षाची साधूनशुचिता सांगितली जाते. हे एकदम बरोबर आहे. ह्यात काहीही चुकीचे नाही. भाजप ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची केडर पार्टी आहे. या पक्षात येणारे नेते व कार्यकर्ते हे संघाच्या मुशीतून तयार झालेले असतात. त्यामुळे संघ हा भाजपसाठी नेता व कार्यकर्ते घडवण्याचा कारखाना आहे, असेही म्हटले जाते. What BJP… what leaders… what business..? Embarrassing…
BJP politics

 

 

तेही काही चुकीचे नाही. जनता परिवाराची शकले पडल्यानंतर व समाजवाद्यांची टाळकी सरकल्यानंतर आता आपले राजकीय अस्तित्व काय ? या विवंचनेतून भाजपची पताका १९८० मध्ये रोवली गेली. स्व. अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, कुशाभाऊ ठाकरे, विजयाराजे सिंधिया, आदी प्रभूतींनी यात पुढकार घेतला होता. पक्ष उभारणीच्या वेळी ज्यांनी ज्यांनी योगदान दिले, त्या नेत्यांची यादी लांबलचक असेल. भाजपच्या पहिल्या फळीतील नेते खरंच चारित्र्यवान, प्रामाणिक होते. त्यांच्यात देशभक्ती -अपार होती. कार्यकर्तेही निष्ठावंत होते. पक्षाचा हुकूम आला की, खाद्यांवर पताका घ्यायची आणि भाजपचा प्रसार करायचा हे एकमेव ध्येय कार्यकर्त्यांमध्ये होते.

 

पक्षाचा मेळावा ठरला की, तिथे संतरज्या टाकायलाही लाज नसे. कारण पक्षनिष्ठा रक्तात भिनलेली असायची. अशा कार्यकर्त्यांमधून नेते घडत गेले. पक्षाची पाळेमुळे देशात कशी रूजली हे कुणालाच कळले नाही. इतकेच काय? भाजप बहुमताने केंद्राच्या सत्तास्थानी आला. आज सारा देश भाजपमय होत चालला आहे. सत्ता आली की नेते आणि कार्यकर्ते बिघडतात, असे म्हटले जाते. खरेच सत्तासुंदरी त्यांना बिघडवते की हेच लोक तिला भाळून बिघडतात या प्रश्नाचे उत्तर राजकीय पंडितांना अजूनही सापडत नाहीत. बिघडण्याला कुठलीही पार्टी अपवाद नाही.

 

 

सगळे एकाच माळेचे मणी. आज राजकीय पटलावर जे अवगुण दिसत आहेत, त्याची लागण भाजपलाही झाली आहे. बंडखोरी, सत्तेसाठी घोडेबाजार, एकमेकांचे पाय ओढणे, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता ही सारी खाबुगिरी भाजपमध्ये शिरली आहे. त्यामुळे साधनशुचितेला तडे गेले आहेत. आचार विचार तत्वं गळून पडली आहेत. अभ्यासूपणा नष्ट झाला आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांचा जमाना संपला आहे.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

 

अवैध व्यावसायिक आणि ठेकेदारांचा भाजपवर कब्जा पडला आहे. आपली साधनशुचिता हरपत चालली आहे, अशी ओरड गेल्या काही वर्षांपासून होते आहे पण कुणाचे आत्मचिंतन नाही. कुणाला चिंता नाही. ‘आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार’ ?, अशी भाजपची अवस्था झाली आहे. राज्यात सत्तेसाठी भाजपचा काय धुमाकूळ चाललाय? कशाचे हे द्योतक आहे.

 

 

□ दैवाने दिले, कर्माने नेले…

 

‘काय डोंगार, काय झाडी, काय हाटिल’ या डॉयलॉगने सांगोल्याचे नाव झळकले. आमदार शहाजीबापू या शेरशायरीने प्रसिद्धी झोतात आले. सांगोल्याचे वैभग कोणकोणत्या शब्दात सांगायचे. कृषी, शिक्षण, व्यापार अशी क्षेत्रे पादाक्रांत करत सांगोल्याने राज्यात लौकिक प्राप्त केला आहे.

 

त्याच जन्मभूमीत वाढलेले भाजप नेते श्रीकांत देशमुख यांचा जो हिडीस प्रकार उघड झाला, त्याने भाजपला मोठा धब्बा बसला आहे. त्या अगोदर पालघरमधील भाजप नेत्याची भानगड उजेडात आली. या दोन नेत्यांनी लावलेला डाग साधासुधा नाहीच. भाजपच्या साधनशुचितेचे त्याने अक्षरशः धिंडवडे निघाले. भाजपश्रेष्ठींना मोठा विश्वास टाकून देशमुखांवर जिल्हाध्यक्षपदाची जोखीम दिली. त्या जबाबदारीचे मातीमोल करत ते सत्तेच्या पुरेपूर लाभ घेतला. ऐषही केली. म्हणतात ना, ‘दैवाने दिले पण कर्माने नेले’

 

□ तेव्हाचे निष्ठावंत, आताचे ‘धंदे’वाईक…. ‘धंदेवाईक…..

 

 

सोलापूर जिल्ह्याच्या भाजपला त्यागाचा व प्रामाणिकपणाचा इतिहास आहे. पक्षाची स्थापना झाल्यानंतर ऐंशी-नव्वदच्या दशकात माळशिरसचे सुभाष पाटील, नातेपुतेचे ॲड. रामहरी रूपनर, अक्कलकोट तालुक्यातील केगावचे शिवशरण दारफळे, अक्कलकोटचेच पंचप्पा कल्याणशेट्टी, उत्तर सोलापूर तालुक्याचे शिवाजी सोनार आदी नेत्यांनी ‘वर खाली’ सत्ता नसतानाही पक्षाचा झेंडा खाली पडू दिला नाही.

 

ना घोडा, ना गाडी, ना बंगला, चलो पैदल… अशा प्रतिकूल स्थितीत या लोकांनी एसटी व रिक्षा पकडून जिल्ह्यात भाजपचे मूळ रूजवले. पक्षाचे जे कार्यक्रम होतील, जी काही आंदोलने होतील, त्याची प्रेसनोट हे सर्वजण स्वतः पायी फिरून दैनिकांना देत असत. स्व. बाबासाहेब तानवडे हे एसटी स्टॅन्डवर बसून सभासद करून घेत असत. आजची स्थिती पाहिली तर पक्षासाठी संतरज्या टाकलेले ज्येष्ठ कार्यकर्ते विजनवास सहन करत आहेत तर मागच्या दाराने येऊन आयाराम नेते, पदाधिकारी सत्तेची फळे चाखत आहेत. सत्तासुंदरीचा मनसोक्त उपभोगही घेत आहेत. निष्ठावंतांना त्याचे का वैषम्य वाटू नये? काय चीड येऊ नये?

 

 

You Might Also Like

राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा

सोलापुरात शरद पवारांना बसणार जोरदार धक्का ?

गेले त्यांचा विचार करू नका, पुन्हा कामाला लागा, शरद पवार

सोलापूर-दिल्ली विमानसेवा नोव्हेंबरपासून सुरू होणार

TAGGED: #WhatBJP #whatleaders #whatbusiness #Embarrassing #BJP #politics #solapur, #कायभाजप #कायनेते #कायधंदे #समधंलाजिरवाणं #राजकारण #भाजप
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पोलिसाच्या सतर्कतेमुळे एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला
Next Article अक्कलकोटमध्ये विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू तर पालिका कर्मचाऱ्याची आत्महत्या

Latest News

सांगलीच्या जयश्री पाटील यांचा शेकडो समर्थकांसह भाजपा प्रवेश
महाराष्ट्र June 18, 2025
पालखी सोहळ्यासाठी ३५०० पोलिसांचा बंदोबस्त, साध्या आणि वारकऱ्यांच्या वेशातही पोलीस
महाराष्ट्र June 18, 2025
काश्मीर मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी स्वीकारली जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 18, 2025
वारकरी भक्तीयोग’कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सर्वांनी पुढाकार घ्यावा – चंद्रकांतदादा पाटील
Top News June 18, 2025
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, इराणकडून इस्राइल विरोधात युद्धाची घोषणा
देश - विदेश June 18, 2025
‘जारण’ ने १२ दिवसांत कमावले ३.५ कोटी
महाराष्ट्र June 18, 2025
कोणताही देश दहशतवादाला पाठिंबा देत असेल तर त्याला त्याची किंमत मोजावी लागेल – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 18, 2025
भारत-कॅनडा करणार उच्चायुक्तांची पुनर्स्थापना
देश - विदेश June 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?