Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: स्थगिती उठवली, राज्यातील जिल्हा परिषदेतील सहा हजारांहून अधिक रिक्त पदे भरणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

स्थगिती उठवली, राज्यातील जिल्हा परिषदेतील सहा हजारांहून अधिक रिक्त पदे भरणार

Surajya Digital
Last updated: 2022/11/16 at 10:02 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
□ फेब्रुवारीत निघणार जाहिरातस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

□ फेब्रुवारीत निघणार जाहिरात

 

मुंबई : राज्यातील विविध जिल्हा परिषदांमधील सुमारे सहा हजारांहून अधिक रिक्त पदे भरण्यासाठी जानेवारी ते मे दरम्यान भरती मोहीम राबविण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतल्याची आनंदाची बातमी आहे. कालच भरतीवरील स्थगिती उठवण्यात आली आहे.  The moratorium has been lifted, more than six thousand vacancies in the Zilla Parishad in the state will be filled

त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेतील गट ‘क’मधील सर्व संवर्गातील रिक्त पदांच्या ८० टक्के पदे जिल्हा निवड मंडळाच्या माध्यमातून भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोरोनामुळे मे २०२० मध्ये सरकारी नोकर भरतीवर बंदी घालण्यात आली होती. कालांतराने भरतीवरील ही बंदी मे महिन्यात उठविण्यात आल्यानंतर जिल्हा परिषदामधील गट ‘क’मधील सर्व रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

आता पुढील महिन्यातील सप्टेंबरमध्ये जिल्हा परिषद आरोग्य विभागाशी सबंधित आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य पर्यवेक्षक अशी पदे भरण्यासाठी जिल्हा निवड मंडळाच्या माध्यमातून भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र शिंदे-फडणवीस सरकारे काही दिवसांपूर्वीच या प्रक्रियेला स्थगिती दिली होती.

काल मंगळवारी (ता. 15) या भरतीवरील स्थगिती उठविली. गट क मधील सर्व संवर्गातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. त्यानुसार वाहन चालक आणि शिपाई ही पदे वगळता अन्य सर्व पदे ८० टक्क्यांपर्यँत भरण्याची परवानगी जिल्हा परिषदांना देण्यात आली आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

ही भरती प्रक्रिया जिल्हा परिषदेला जिल्हा निवड मंडळामार्फत राबविण्यास परवानगी देताना ग्रामविकास विभागाने भरतीचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. त्यानुसार १ ते ७ फेब्रुवारी २०२३ मध्ये भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. एप्रिलमध्ये लेखी परीक्षा होणार आहे. संपूर्ण निवड प्रक्रिया मे अखेपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हा परिषदांना देण्यात आल्या आहेत.

 

१५ ऑगस्ट २०२३ पर्यंत ही भरती करणे बंधनकारक आहे. भरतीचा ३१ मेपर्यंतचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला आहे. ही भरती जिल्हा परिषदांनी त्यांच्या स्तरावर जिल्हा निवड मंडळामार्फत करण्यासही सांगण्यात आले आहे.

 

या भरतीसाठी संभाव्य वेळापत्रकही तयार करण्यात आले आहे. जिल्हा परिषद यांनी ३१ जानेवारी अखेर बिंदू नामावली अंतिम करणे, संवर्गामधील आरक्षण निश्चित करणे, तसेच कंपनीची निवड ही कामे येत्या अडीच महिन्यात पूर्ण करायचे आहेत. त्यानंतर १ ते ७ फेब्रुवारीपर्यंत पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल.

८ ते २२ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांचे अर्ज मागवून १ मार्चपर्यंत अर्जांची छाननी करून ५ मार्चपर्यंत पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल. प्रत्यक्ष परीक्षेच्या आयोजनासंदर्भात जिल्हा परिषद व जिल्हा निवड समितीने ५ एप्रिलपर्यंत कार्यवाही करायची असून प्रत्यक्ष परीक्षा १४ ते ३० एप्रिलपर्यंत घ्यावी लागणार आहे. तर ३१ मेपर्यंत निकाल जाहीर करून पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश द्यावे लागणार आहेत.

 

You Might Also Like

शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण

महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल

पुणे-सिंगापूर विमानसेवा १५ जुलैपर्यंत बंद

पुणे रेल्वे स्टेशनला थोरल्या बाजीराव पेशव्यांचं नाव द्या – खासदार मेधा कुलकर्णीं

लंडनहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात ५ प्रवासी आणि २ क्रू मेंबर्सची प्रकृती बिघडली

TAGGED: #moratorium #lifted #morethan #six #thousand #vacancies #Zilla #Parishad #state #filled #jobserch #job, #स्थगिती #उठवली #राज्य #जिल्हा #परिषद #सहा #हजार #अधिकरिक्त #पदे #भरणार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article एकनाथ खडसेंचे कारनामे बाहेर येणार, खडसेंना धक्का, मनोज लिमयेंसह सहाजणांना अटक
Next Article स्वगृही ग्रह फिरले, गृहनिर्माणासाठी दिलीपभाऊ कोल्हे शिंदेगृहात गेले

Latest News

इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज
देश - विदेश June 24, 2025
शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण
महाराष्ट्र June 24, 2025
फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी
राजकारण June 24, 2025
महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल
महाराष्ट्र June 24, 2025
नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार
देश - विदेश June 24, 2025
दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक
देश - विदेश June 24, 2025
भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 24, 2025
crime
सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक
सोलापूर June 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?