Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: Lingayat community मुंबईतला लिंगायत समाजाचा महामोर्चा अखेर मागे
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

Lingayat community मुंबईतला लिंगायत समाजाचा महामोर्चा अखेर मागे

Surajya Digital
Last updated: 2023/01/29 at 6:04 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

मुंबई : विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानात लिंगायत समाजाचा महामोर्चा सुरू होता. आता हा मोर्चा मागे घेण्यात आला आहे. सरकारकडून 70 ते 80 टक्के मागण्या पूर्ण झाल्या असल्याने हा मोर्चा मागे घेत असल्याचे अविनाश भोसिकर आणि विनय कोरे यांनी सांगितले. The grand march of the Lingayat community in Mumbai is finally behind the Azad Maidan

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ मोर्चेकऱ्यांसोबत बोलण्यासाठी सरकारी प्रतिनिधी दाखल● या आहेत समाजाच्या मागण्या

 

लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता द्यावी तर राज्यातील लिंगायत धर्मियांना अल्पसंख्यांक दर्जा जाहीर करावा, अशा त्यांच्या मागण्या होत्या. अखिल भारतीय लिंगायत समाजाकडून आज सकाळी 10 वाजता आझाद मैदानातून मुंबईत महामोर्चा काढण्यात आला. गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिंगायत समन्वय समितीच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली. सर्व मागण्या सोडवण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल उचलण्याचे आश्वासन दिले तरी समितीने लेखी उत्तर मिळाल्याशिवाय आंदोलन थांबवण्यास नकार दिला होता. त्यामुळे मुंबईत आज महामोर्चा काढण्यात आला. पण आता माघार घेतल्याचे जाहीर केले.

मुंबईतील आझाद मैदानात सुरु असलेला लिंगायत समाजानं मोर्चा मागे घेतला आहे. अविनश भोसीकर आणि विनय कोरे यांनी मोर्चा माघार घेत असल्याची घोषणा केली.

आमच्या 70 टक्के मागण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे आजचा आझाद मैदानातला मोर्चा स्थगित करत आहोत. काही केंद्राचे विषय आहेत त्या मागण्यासाठी लढाई पुढे सुरू राहील, असे अविनाश भोसीकर यांनी सांगितलं. तर 22 जानेवारीला समाजाच्या मागण्यावर, आमची चर्चा झाली होती. यासंदर्भात आम्ही त्यांचा काही मागण्यांवर सकारात्मक आहोत, त्या मान्य केल्या जातील. याचा पाठपुरावा स्वतः मी करणार आहे. काही मागण्या केंद्रातील सरकार संदर्भात आहेत, त्यावर पुढे अभ्यास आणि चर्चा करू , तो राष्ट्रीय निर्णय आहे, असे विनय कोरे म्हणाले. आमच्या 70 ते 80 टक्के मागण्या मान्य झाल्या आहेत. त्याबद्दल सरकारचे आभार व्यक्त करतो, असे अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीचे विजय हतुरे (सोलापूर) यांनी म्हटले.

बसवेश्वर यांच्या नावाचं विद्यापीठ तयार करण्यासाठी मान्यता द्यावी, अशी मागणी केली आहे. राज्य सरकारने ही मागणी मान्य केली आहे. बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी केली आहे. येणाऱ्या अधिवेशनापूर्वी घोषणा करण्याची आग्रही मागणी केली ती मान्य होईल, असे विनय कोरे यांनी सांगितलं. महाराष्ट्र विधिमंडळात बसवेश्वरांचा पुतळा बसवण्याची मागणी केली होती ,ती राज्यसरकारने मान्य केली. जागा शोधणं सुरू आहे. उपलब्ध झाली नाही तर तिथे तैलचित्र लावण्याचं मान्य करण्यात आलं आहे, असेही कोरे यांनी सांगितलं.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

 

□ मोर्चेकऱ्यांसोबत बोलण्यासाठी सरकारी प्रतिनिधी दाखल

लिंगायत समाजाच्या मोर्चेकऱ्यांसोबत बोलण्यासाठी सरकारचे प्रतिनिधी आले आहेत. या समजात माझा जन्म झालाय हे माझं भाग्य आहे. मुंबईत तुम्ही आपल्या मागण्यांसाठी आलात त्याबरोबर स्वामी ही आलेत. लढणाऱ्या सर्व पदाधिकऱ्यांचं आणि मेहनत घेणाऱ्या सर्वांच कौतुक आहे. गेल्या आठवड्यात आपल्या मागण्यांवर चर्चा झाली होती. जी चर्चा झाली त्या संदर्भात मी आपल्याला वस्तू स्थिती सांगायला आलोय.

जैन समाजालाही संवैधानिक मान्यता अद्याप नाही, मात्र आपण प्रयत्न करतोय. हा राष्ट्रीय स्तरावर कोणत्या धर्माला मान्यता द्यायची याचा अभ्यास सुरू आहे. यासाठी कायद्याचा ही अभ्यास सुरू झालाय. भाषिक अल्पसंख्याक म्हणून अनेक सोयी सुविधा देण्यासाठी सरकारने सकारात्मकता दाखवली आहे, असे विनय कोरे म्हणाले.

● या आहेत समाजाच्या मागण्या

 

लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता द्यावी
राज्यातील लिंगायत धर्मियांना अल्पसंख्यांक दर्जा जाहिर करावा
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुका येथे मंजूर असलेल्या महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारकाचे काम त्वरीत सुरु करण्यात यावे
मुंबई येथील विधानभवन परिसरात महात्मा बसवेश्वरांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यात यावा.
महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे.

 

गांव तेथे रुद्रभुमी ( स्मशानभुमी) आणि गांव तेथे अनुभव मंटप ( सभामंडप ) करण्यात यावे.
लिंगायत समाजातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरावर वसतिगृह निर्माण करण्यात यावे.
राष्ट्रीय जनगणनेत लिंगायतांसाठी स्वतंत्र कॉलम देण्यात यावे.
वीरशैव लिंगायत व हिंदू लिंगायत अशी नोंद असलेल्यांचा ओबीसी घटकामध्ये समावेश नाही, त्यामुळे या घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि सरकारी नोकरीची संधी मिळत नाही. सरकारने शुध्दीपत्रक काढून ओबीसीमध्ये समावेश करावा.

You Might Also Like

थोरात कारखान्याच्या मदतीने हायटेक बसस्थानकाची स्वच्छता

मालेगाव स्फोट प्रकरणाचा निकाल पुन्हा लांबणीवर

छत्तीसगड : चकमकीत 8 नक्षलवादी ठार, 5 जवान हुतात्मा

दोन दिवसांपूर्वी झाला विवाह अन् फौजी निघाला देशसेवेसाठी

अंगणवाडी सेविकांच्या कुटुंबासाठी मोफत आरोग्य तपासणी – आदिती तटकरे

TAGGED: #demands #grand #march #Lingayat #community #Mumbai #finally #behind #AzadMaidan, #आझादमैदान #मुंबई #लिंगायत #समाज #महामोर्चा #मागे #मागण्या #मान्य
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article Ujani dam burst उजनी धरणाचा उजवा कालवा फुटला, शेतीचे नुकसान
Next Article महापालिकेत धूम्रपान करणा-या कर्मचाऱ्यासह नागरिकांना होणार आर्थिक दंड, पण कर्मचा-यास पाचपट दंड

Latest News

भारत- पाकिस्तानातील वाढत्या तणावामुळे आयपीएलचा चालू हंगाम स्थगित
देश - विदेश May 9, 2025
चंद्रकांत पाटील यांनी ‍नवजात शिशू चोरी प्रकरणाची प्रत्यक्ष रूग्णालयात भेट देऊन केली विचारपूस
Top News May 9, 2025
थोरात कारखान्याच्या मदतीने हायटेक बसस्थानकाची स्वच्छता
महाराष्ट्र May 8, 2025
मालेगाव स्फोट प्रकरणाचा निकाल पुन्हा लांबणीवर
महाराष्ट्र May 8, 2025
पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट
देश - विदेश May 8, 2025
भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीममुळे पाकिस्तानी हल्ला निष्क्रीय
देश - विदेश May 8, 2025
ऑपरेशन सिंदूर’मध्ये 100 दहशतवादी ठार
देश - विदेश May 8, 2025
छत्तीसगड : चकमकीत 8 नक्षलवादी ठार, 5 जवान हुतात्मा
महाराष्ट्र May 8, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?