Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: विवाहित महिलेने दुसऱ्या पुरुषासोबत लिव्ह इनमध्ये राहणे बेकायदेशीर – कोर्ट
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

विवाहित महिलेने दुसऱ्या पुरुषासोबत लिव्ह इनमध्ये राहणे बेकायदेशीर – कोर्ट

Surajya Digital
Last updated: 2021/08/18 at 1:53 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

जयपूर : घटस्फोट न घेता विवाहित महिला इतर पुरुषासोबत लिव्ह इनमध्ये राहत असेल तर अशा प्रकारचे संबंध अवैध, असामाजिक आणि कायद्याविरोधात आहेत. राजस्थान हायकोर्टाने हे स्पष्ट केले आहे. लिव्ह-इनमध्ये राहणारा 24 वर्षीय पुरुष आणि 33 वर्षीय विवाहित महिलेच्या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने हे स्पष्टीकरण दिले आहे. आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा करत याचिकाकर्त्यांनी सुरक्षेची मागणी केली होती.

राजस्थान उच्च न्यायालयाने नुकतेच एका निकालात विवाहित महिला आणि तिचा प्रियकर यांना पोलीस संरक्षण नाकारले आहे. वास्तविक, ही महिला दुसऱ्या पुरुषासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहते. राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील या 33 वर्षीय महिलेने आणि तिच्या 24 वर्षीय प्रियकराने एकत्रितरित्या दाखल केलेल्या याचिकेच्या माध्यमातून, काही नातेवाईकांकडून जीवास धोका असून जिवेमारण्याच्या धमक्या येत असल्याने पोलिस संरक्षण मागितले होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

कोर्टात सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद करत म्हटले कि, दोघेही प्रौढ असून परस्पर सहमतीने लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. सदर महिला विवाहित आहे. मात्र, तिच्या पतीकडून अत्यंत क्रूर वागणूक आणि छळ या महिलेला होत असल्याने ती पतीपासून दूर राहत आहे.

राजस्थान उच्च न्यायालयाने इलाहाबाद उच्च न्यायालयाच्या अश्याच एका प्रकरणातील निर्णयाचा हवाला देत म्हटले कि, इलाहाबाद उच्च न्यायालयाने देखील एका प्रकरणात लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेस संरक्षण देण्यास नकार दिला होता. या प्रकरणात देखील, सदर महिला आधीच विवाहित होती आणि दुसऱ्या पुरुषासोबत लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होती, जे हिंदू विवाह कायद्याच्या तरतुदीच्या विरुद्ध आहे. न्यायालयाने म्हटले की, अशा लोकांचे संरक्षण करण्याचे आदेश देऊ शकत नाही, ज्यांनी दंड संहिता आणि हिंदू विवाह कायद्याचे उघडपणे उल्लंघन केले आहे.

You Might Also Like

भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी

रेल्वे प्रवाशांसाठी ‘रेलवन’ सुपर अ‍ॅप लॉंच; सर्व सुविधा आता एका ठिकाणी

ट्रम्प यांनी ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ मंजूर केल्यास मस्क नवीन पक्ष करणार स्थापन

राजधानीत वसंतराव नाईक जयंती साजरी

ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला नव्याने टॅरिफ लावण्याची धमकी

TAGGED: #illegal #married #woman #live #Inlive-in #man #court, #विवाहित #महिलेने #दुसऱ्या #पुरुषासोबत #लिव्हइनमध्ये #बेकायदेशीर #कोर्ट
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article 12 वर्षाच्या मुलीच्या पोटातून काढला अर्धा किलो केसांचा गोळा
Next Article जगाची चिंता वाढली; तालिबानच्या हाती लागलं कोट्यवधींचं घबाड

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?