Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: लोकल दहशतवाद्यांच्या निशाण्यावर, ‘गॅस अटॅकची योजना, त्यात बाँम्ब ठेवल्याची फोनद्वारे खोटी माहिती
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीमहाराष्ट्र

लोकल दहशतवाद्यांच्या निशाण्यावर, ‘गॅस अटॅकची योजना, त्यात बाँम्ब ठेवल्याची फोनद्वारे खोटी माहिती

Surajya Digital
Last updated: 2021/09/18 at 1:27 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : दिल्लीत सहा दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्यानंतर काल मुंबईमध्ये आणखी एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर मुंबई लोकल असल्याची माहिती पुढे आली आहे. अशातच दहशतवाद्यांनी मुंबई लोकलमध्ये विषारी गॅसच्या सहाय्याने हल्ला करण्याची योजना आखल्याचा इशारा गुप्तचर विभागाने दिला आहे. त्यामुळे मुंबई लोकल स्थानकांवरच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

गुप्तचर विभागाने तशी माहिती रेल्वे पोलिसांना दिल्याचं वृत्त आहे. या इशाऱ्यानंतर रेल्वे पोलिसांनी स्थानकावरील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली असून प्रत्येक गोष्टीची तपासणी केली जात आहे. काही महत्वाच्या रेल्वे स्थानकावरील एन्ट्री आणि एक्झिटच्या मुख्य मार्गाव्यतिरिक्त इतर सर्व रस्ते बंद केले आहेत. दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा मुंबई लोकलवर निशाणा साधण्याचा कट रचला होता. त्यांनी मुंबई लोकलची रेकी केली होती. यापूर्वी मुंबई लोकल अनेकदा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आली आहे. मुंबई लोकलमध्ये यापूर्वी सीरिअल बॉम्बस्फोट झाले आहेत. त्यामुळे दहशतवाद्यांचा मुंबई लोकलची रेकी करण्यामागे नक्की काय हेतू होता? याबाबत तपासयंत्रणा आणखी तपास करत आहेत.

लोकलमध्ये विषारी गॅसच्या सहाय्याने हल्ला करण्याची योजना दहशतवाद्यांनी आखल्याचा इशारा गुप्तचर विभागाने दिल्यामुळे मुंबई लोकल स्थानकांवरच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. रेल्वे पोलिसांना तशी माहिती गुप्तचर विभागाने दिल्याचे वृत्त आहे. रेल्वे पोलिसांनी या इशाऱ्यानंतर स्थानकावरील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली असून प्रत्येक गोष्टीची तपासणी केली जात आहे. काही महत्वाच्या रेल्वे स्थानकावरील एन्ट्री आणि एक्झिटच्या मुख्य मार्गाव्यतिरिक्त इतर सर्व रस्ते बंद केले आहेत.

पुन्हा एकदा मुंबई लोकलवर निशाणा साधण्याचा कट दहशतवाद्यांनी रचला होता. मुंबई लोकलची त्यांनी रेकी केली होती. मुंबई लोकल यापूर्वी अनेकदा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आली आहे. यापूर्वी मुंबई लोकलमध्ये सीरिअल बॉम्बस्फोट झाले आहेत. त्यामुळे दहशतवाद्यांचा मुंबई लोकलची रेकी करण्यामागे नक्की काय हेतू होता? याबाबत तपासयंत्रणा आणखी तपास करत आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सहा दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. त्यापैकी दोघांनी पाकिस्तानात प्रशिक्षण घेत असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतून दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे, तर उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधून चौघांना अटक केली आहे.

या दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे. एका गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. स्पेशल सेलला माहिती मिळाली होती की पाकिस्तान समर्थित दहशतवादी गट दिल्ली आणि जवळपासच्या भागात स्फोट घडवण्याचा कट आखत आहेत आणि त्यांचे लक्ष्य गर्दीची ठिकाणे आहेत.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने या दहशतवाद्यांना अटक केली आहे. पोलिसांनी एका गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. स्पेशल सेलला माहिती मिळाली होती की पाकिस्तान समर्थित दहशतवादी गट दिल्ली आणि जवळपासच्या भागात स्फोट घडवण्याचा कट आखत आहेत आणि त्यांचं लक्ष्य गर्दीची ठिकाणं आहेत.

दरम्यान, मुंबई आधीच दहशतवाद्यांच्या रडारवर असल्याचे दिल्ली स्पेशल सेलनं केलेल्या कारवाईत आरोपीच्या चौकशीतून पुढे आले असताना आता आणखी एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मुंबई पोलिसाच्या नियंत्रण कक्षाला फोन करून बाँम्ब ठेवल्याची खोटी माहिती दिल्याचा प्रकार पुढे आला आहे. आझाद मैदान परिसरातील एका इमारतीत हा बाँम्ब ठेवल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवले मात्र संशयास्पद काही आढळून आले नाही. या प्रकरणी खोटी माहिती दिल्या प्रकरणी आझाद मैदान पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #Local #terrorists #target #gas #attack #plan', #लोकल #दहशतवाद्यांच्या #निशाण्यावर #गॅसअटॅक #योजना #बाँम्ब #ठेवल्याची #फोनद्वारे #खोटीमाहिती
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बंद पुकारणार्‍या व्यापार्‍यांना सामाजिक कार्यकर्ते कोर्टात खेचणार
Next Article अंत्रोळी फाट्याजवळ अपघात; पतीच्या समोर पत्नीचा मृत्यू, पतीचा पाय निकामी

Latest News

По какой причине головной мозг откликается на случайные победы особенно ярко
Top News December 5, 2025
Почему мы лучше откладываем в памяти моменты риска, чем эпизоды умиротворения
Top News December 5, 2025
По какой причине мы ярче фиксируем в памяти эпизоды опасности, чем моменты спокойствия
Top News December 5, 2025
Зачем человек превозносят душевные подъемы
Top News December 5, 2025
По какой причине человеческий разум откликается на непредвиденные успехи чрезвычайно интенсивно
Top News December 5, 2025
Из-за чего человек дорожат эмоциональные пики
Top News December 5, 2025
Почему удовольствие связано с ощущением роста
Top News December 5, 2025
Зачем мы приходим к моментам везения мысленно
Top News December 5, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?