नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने लॉकडाऊनच्या चर्चेविरोधात इशारा दिला आहे. संपूर्ण देशात लॉकडाऊन झाल्यास त्याचा परिणाम पुरवठा साखळीवर होईल. यामुळे महागाई वाढू शकते, असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे. लॉकडाऊनमुळे वस्तूंच्या हालचालींवर दीर्घ बंदी लागू शकते, जी पुरवठा साखळीवर दिसून येईल आणि जर देशातील पुरवठा साखळी खालावली तर इंधन महागाई होईल, असेही RBI ने म्हटले आहे.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1387373512965332997?s=19
भारतातील कोरोनाव्हायरसची दुसरी लाट थांबायचं नाव घेत नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वाढती कोरोनाची प्रकरणे आणि लॉकडाऊनच्या चर्चेविरोधात इशारा दिला आहे. RBI चे म्हणणे आहे की,’ कोरोनाची प्रकरणे अशाच प्रकारे वाढत राहिली आणि संपूर्ण देशात लॉकडाऊन झाल्यास त्याचा परिणाम पुरवठा साखळीवर होईल. यामुळे महागाई वाढू शकते.’ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या इको स्टेटमध्ये या गोष्टी बोलल्या आहेत.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1387329312525733888?s=19
RBI काय म्हणाले ते जाणून घ्या
RBI चे म्हणणे आहे की,’ कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांवर वेळीच नियंत्रण न ठेवल्यास वस्तूंच्या हालचालींवर दीर्घ बंदी लागू शकते, जी पुरवठा साखळीवर दिसून येईल आणि जर देशातील पुरवठा साखळी खालावली तर इंधन महागाई होईल.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
https://twitter.com/SurajyaDigital/status/1387254420472139778?s=19
वाढीमुळे संपूर्ण देशात महागाई वाढण्याचा धोका असेल. ग्राहक किंमत निर्देशांक आधारित महागाई फेब्रुवारीच्या 5.5 टक्क्यांवरून मार्चमध्ये 5 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. त्याचबरोबर अन्न आणि इंधन दराच्या महागाईत झपाट्याने वाढ झाली आहे.
देशात कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत आणि त्यामुळे लॉकडाऊनसह अनेक राज्यात अनेक प्रकारची निर्बंध घातली गेली आहेत. यामुळे, आउटलुकमध्ये बरीच अनिश्चितता आहे. यामुळे एप्रिल आणि मेमध्ये महागाई वाढू शकते. खरं तर, कोरोनाच्या वाढत्या घटनांमुळे देशाची राजधानी दिल्ली गेल्या 15 दिवसांपासून लॉकडाऊनमध्ये आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात लॉकडाउनमुळे पुरवठा साखळीवर परिणाम होत आहे. अनेक राज्यांमध्ये स्थानिक बंदीमुळे आर्थिक हालचालीही पाहायला मिळत आहेत.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1387423976880701440?s=19