Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: थोबडे वस्तीतील शाळेला घातले कुलूप; विद्यार्थ्यांचे दाखले घेऊन जाण्याची भाषा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

थोबडे वस्तीतील शाळेला घातले कुलूप; विद्यार्थ्यांचे दाखले घेऊन जाण्याची भाषा

Surajya Digital
Last updated: 2022/01/06 at 11:24 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : जुना देगाव नाका येथील थोबडे वस्तीतील रितेश बालक मंदिर शाळेला (school) आज संस्थाचालकांच्या सूचनेनुसार कुलूप (lock) घातले. त्यामुळे शिक्षक (teacher) विद्यार्थ्यांना (students) भर उन्हात बाहेर बसावे लागले.

विद्यार्थी बाहेर बसल्याने पालकांची गर्दी (crowd) झाली. पालकांकडून विचारणा केली असता मुख्याध्यापिका (principle) नीता कांबळे यांनी अचानक दाखला घेऊन जाण्याची भाषा केल्याचे पालकांनी सांगितले. अधिक माहिती (information) घेतली असता पहिली ते सहावीच्या विद्यार्थ्यांना वा-यावर सोडले असून सातवी ते दहावीचे (10th) वर्ग चालू असल्याचे सांगितले.

संस्थाचालक विजया थोबडे यांनी शाळेकडून ठरावीक रक्कमेची (money)  मागणी (demand) केली आहे. आता अचानक आणि कोरोनाकाळात (corona)  आर्थिक परिस्थितीवर नसताना या विद्यार्थ्यांकडून रक्कम कशी मागायची असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. कित्येक दिवस शाळा बंद (school closed) होती, आता चालू झाली असताना पैशावरून विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती (fear) निर्माण झाल्याचे उपस्थित पालकांनी सांगितले.

Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी मुख्याध्यापिका कांबळे यांना फोन (phone) केला असता त्यांचा फोन बंद होता. मात्र या परिस्थितीत भर उन्हात पहिली ते सहावीच्या विद्यार्थ्यांना अडीच ते तीन तास बसावे लागले. तरीही कोणताही संस्थाचालक, सदस्य अथवा मुख्याध्यापक घटनास्थळी आले नाहीत. आपली शाळा बंद होणार का आणि आपल्या पाल्याचे काय होणार हीच चिंता विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या चेह-यावर प्रकर्षाने जाणवत होती.

शहरातील प्रतिष्ठित आणि ज्येष्ठ वकिल मिलिंद थोबडे यांचा वकिल मुलगा रितेश थोबडे यांच्या नावाने ही शाळा सुरू आहे. थोबडे वस्तीतील प्रत्येक समाज कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो. येथील लोक त्यांना थोबडेमालक नावाने ओळखतात. येथील अनेक मंदिरे आणि समाज मंदिरासाठी त्यांनी जागा देऊन आर्थिक मदत (help) केली आहे. अशा व्यक्तीच्या नावाने असलेल्या शाळेसमोर असा प्रकार घडावा, याबाबत तेथील रहिवासी आणि पालकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात होते.

शाळेला कुलूपसह अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या

याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी ॲड. मिलिंद थोबडे यांना फोन केला असता त्यांनी याबाबत आपणास माहिती नसून माहिती घेतो, अशी प्रतिक्रिया मिळाली. मात्र विद्यार्थ्यांना आजचा दिवस गेटच्या बाहेरच काढावा लागला. शाळा सुटण्याची वेळ होताच हाताश होऊन विद्यार्थी घरी परतले. मात्र पालक आणि विद्यार्थ्यांना उद्या तरी शाळा भरणार का, याबाबत संभ्रम आणि चिंता आहे.

You Might Also Like

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा

TAGGED: #थोबडेवस्ती #शाळा #कुलूप #विद्यार्थी #दाखले #भाषा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राज्यातील सर्व विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन होणार; 15 फेब्रुवारीपर्यंत कॉलेज बंद
Next Article एसटी संप – 55 हजार संपकऱ्यांना नोटीस, तर कंत्राटी चालकांच्या भरतीचा निर्णय

Latest News

इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज
देश - विदेश June 24, 2025
शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण
महाराष्ट्र June 24, 2025
फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी
राजकारण June 24, 2025
महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल
महाराष्ट्र June 24, 2025
नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार
देश - विदेश June 24, 2025
दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक
देश - विदेश June 24, 2025
भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 24, 2025
crime
सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक
सोलापूर June 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?