Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: झाडावरील साप नाकाला चावल्याने शेतकरी जखमी; मोहोळमध्ये ऊस जाळून पाच लाखाचे नुकसान
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

झाडावरील साप नाकाला चावल्याने शेतकरी जखमी; मोहोळमध्ये ऊस जाळून पाच लाखाचे नुकसान

Surajya Digital
Last updated: 2022/02/15 at 7:15 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

सोलापूर – शेतातील वस्तीवर घराला कुलूप लावताना झाडावरचा साप डोक्यावर पडून नाकाला दंश केल्याने शेतकरी जखमी झाले. ही घटना दोड्याळ (ता.अक्कलकोट) येथे आज सोमवारी दुपारच्या सुमारास घडली.

चनबसप्पा मल्लेशप्पा जोकारे (वय ५३) असे जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ते सकाळी शेतात काम करून दुपारच्या सुमारास घराला कुलूप लावत होते. त्यावेळी झाडावरचा साप अचानक डोक्यावर पडून त्यांच्या नाकाला दंश केला. त्यांना अक्कलकोट येथे प्राथमिक उपचार करुन सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे .

□ बापुजी नगरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर – शास्त्रीनगर परिसरातील बापूजी नगरात राहणाऱ्या बापू रामचंद्र म्हेत्रे (वय ४९) याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आज  सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास त्याने घरातील छताच्या लोखंडी हुकाला ओढणीने गळफास घेतला होता. त्याला फासातून सोडून सय्यद म्हेत्रे (भाऊ) यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र तो उपचारापूर्वीच मयत झाला. या घटनेची नोंद सदर बाजार पोलिसात झाली असून या मागचे कारण समजले नाही .

□ कामती येथे विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्‍न

कामती खुर्द (ता. मोहोळ) येथे राहणाऱ्या दीपक आगतराव माळी (वय ३४) याने स्वतःच्या शेतात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्‍न केला. ही घटना आज सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. त्याला बेशुद्धावस्थेत गोपीनाथ माने (मित्र) यांनी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले.या घटनेची नोंद तालुका पोलिसात झाली असून या मागचे कारण समजले नाही.

Farmers injured by snake bite on tree; Loss of Rs 5 lakh due to burning of sugarcane in Mohol

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

□ ऊस जाळून केले पाच लाखाचे नुकसान, आज्ञात व्यक्ती वर गुन्हा दाखल

मोहोळ : शेतातील चार एकर ऊसासह त्यातील ठिंबक सिंचन अज्ञात व्यक्तीने जाळून एकूण चार लाख रुपयांचे नुकसान केल्याची घटना दि.१४ फेब्रुवारी रोजी पेनूर (ता. मोहोळ) येथे दुपारी साडेबारा वाजताच्या दरम्यान घडली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, पेनूर (ता. मोहोळ) येथील कार्तिक कुबेर चवरे यांच्या शेतामध्ये पंधरा महिन्याचा ऊस आहे. दि.१४ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने त्यांच्या शेतातील मुद्दाम लबाडीने ऊस पेटवून दिला. यावेळी शेजारच्या शेतकऱ्यांनी शेतमालकाशी संपर्क करीत त्यांना ऊस पेटला असल्याची माहिती दिली.

तात्काळ स्थानिक नागरिक व ट्रॅक्टर, रोटावेटर च्या मदतीने उसाची तूट करून आग आटोक्यात आणण्यात आली, मात्र यातील चार एकर ऊस आणि त्यातील ठिबक सिंचन असा एकूण ४ लाख ८० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची फिर्याद शेतकरी कार्तिक कुबेर चवरे यांनी दिली आहे. यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार लोबु चव्हाण करीत आहेत.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Farmers #injured #snake #bite #tree #Loss #5lakh #burning #sugarcane #Mohol, #झाडावरील #साप #नाक #चावा #शेतकरी #जखमी #मोहोळ #ऊस #पाचलाख #नुकसान
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article फडणवीसांच्या काळात महाराष्ट्रात सर्वात मोठा घोटाळा, राऊत यांचा आरोप; भाजपचे लोक ईडीचे वसुली एजंट
Next Article दूध संघ निवडणूक : 16 जागेसाठी 31 उमेदवार रिंगणात, दिलीप मानेंचा निवडणुकीला नकार तर हसापुरेंची माघार

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?