Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: 10 हजारांपेक्षा जास्त गाणी लिहणारे गीतकार हरेंद्र जाधव यांचे निधन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुडमहाराष्ट्र

10 हजारांपेक्षा जास्त गाणी लिहणारे गीतकार हरेंद्र जाधव यांचे निधन

Surajya Digital
Last updated: 2021/04/25 at 10:42 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : गीतकार हरेंद्र जाधव (वय 87 ) यांचे आज निधन झाले. ते अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांनी 10 हजारांपेक्षा जास्त गाणी लिहिली. यामध्ये तूच सुखकर्ता, तूच दुखहर्ता, अवघ्या दिनाच्या नाथा…, पाहा पाहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा, आता तरी देवा मला पावशील का ?, माझ्या नवऱ्यानं सोडलीय दारू… हा संसार माझा छानं, राव दिला मला देवानं… या गाण्यांचा समावेश आहे. जाधव हे समाजकार्यातही अग्रेसर होते.

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात 5 दिवस पावसाची शक्यता https://t.co/052tFoIqVp

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 25, 2021

गणेशोत्सवात भाविकांना साद घालणारे आणि मंगलमय वातावरण तयार करणारे ‘तू सुखकर्ता…तू दु:खहर्ता, तूच कर्ता.. तुच करविता. मोरया मोरया…मंगलमूर्ती मोरया’ या गाण्याचे गीतकार हरेंद्र जाधव यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. जाधव यांची ‘माझ्या नवऱ्यानं सोडलीया दारू..पहा पहा मंजुळा.. हा माझ्या भीमरायाचा मळा’ यांसारखी एकापेक्षा एक गाजलेली गाणी लिहिली.

Tribute to famous Lyricist Harendra Jadhav who passed away in his 85th year.

He wrote around 10k Bheemgeet. Some of his famous songs are:

"पहा पहा मंजुळा माझ्या भीमरायाचा मळा"
“हे खरंच आहे खर श्री भीमराव रामजी आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतय हो जगभर" #JaiBhim pic.twitter.com/i3fv2WRXRN

— Dalit Chef (@DalitChef) April 25, 2021

निफाड तालुक्यातील मिग ओझर येथे १६ फेब्रुवारी, १९३३ ला जन्मलेल्या जाधव यांनी जवळपास १० हजारहून अधिक गाणी लिहिली.

गेल्या काही वर्षांपासून हरेंद्र जाधव आजारी होते. त्यांना पक्षाघात झाल्याने झोपून होते. त्यांनी दीर्घकाळ शिक्षक म्हणून सेवा केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याने प्रभावित होऊन ते समाजकार्यात ओढले गेले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

आंबेडकरी जलसा मंडळांकडून मोठ्या प्रमाणावर प्रबोधन केलं जात होतं. त्यातून त्यांना गीतलेखनाची प्रेरणा मिळाली. त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून अनेक बहारदार गाणी लिहिली गेली. त्यांनी वयाच्या १७ व्या वर्षी पहिलं गाणं लिहिलं होतं. मात्र, हे गाणं रेकॉर्ड करण्यासाठी त्यांना तब्बल दहा वर्ष वाट पहावी लागली होती.

आधी लगीन लसीकरणाचं; मुलाच्या लग्नाचा पैसा लसीकरणावर खर्च करणार, या भाजप नेत्याचे कौतुक https://t.co/N4PzsyV5vX

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 25, 2021

प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजातील ‘आता तरी देवा मला पावशील का?…सुख ज्याला म्हणतात ते दावशील का,’ गणेशवंदनेतील ‘तूच सुखकर्ता..तुच दुःखहर्ता…’, ‘देवा मला का दिली बायको अशी…’, ‘माझ्या नवऱ्यानं सोडलिया दारू…’, ‘हा संसार माझा छानं, राव दिला मला देवानं…’, अशी १० हजारहून अधिक गाणी जाधव यांनी लिहिली. तसेच, त्यांनी शब्दबद्ध केलेली गाणी अजित कडकडे, सुरेश वाडकर, प्रल्हाद शिंदे, अनुराधा पौडवालपासून ते बेला सुलाखे, साधना सरगमपर्यंत अनेक गायक, गायिकांनी गायली आहेत.

दिलासादायक! पुण्यात आज 4 हजार 759 तर मुंबईत 8 हजार 478 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज https://t.co/UJtRWNsW40

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 25, 2021

एक शांत, संयमी, संवेदनशील थोर विचारवंत साहित्यिक, कवी, अख्या जगाला आपल्या लेखणीने प्रेरणा देणारे.. आंबेडकरी चळवळीला बळ देणारे लोककवी…. ‘पहा पहा मंजूळा..हा माझ्या भीमरायाचा मळा’ हा विचार काव्यातन फुलविणारे.. ‘तूच सुखकरता तूच दुखहर्ता’ हे गीत लिहून प्रत्येक माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारे… भावगीत, भक्ती गीतातून प्रबोधन करणारे कवी म्हणून हरेंद्र जाधव यांची ख्याती होती. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र लाडक्या कवीला मुकला आहे, अशी प्रतिक्रिया गायक नंदेश उमप यांनी व्यक्त केली आहे.

माजी मंत्री आणि भाजप नेते संजय देवतळे यांचे निधन https://t.co/3mBUpvJwOD

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 25, 2021

 

You Might Also Like

गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण

धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव

धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

टाटा ऑटो कॉम्प सादर करणार रेल्वेसाठी नवीन उत्पादने

मविआचे शिष्टमंडळ 14 ऑक्टोबरला घेणार निवडणूक आयोगाची भेट

TAGGED: #10हजारांपेक्षा #जास्तगाणी #लिहणारे #गीतकार #हरेंद्रजाधव #निधन, #Lyricist #HarendraJadhav #wrote #10000 #songs #passed #away
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article दिलासादायक! पुण्यात आज 4 हजार 759 तर मुंबईत 8 हजार 478 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज
Next Article भारताला कोरोना लशीच्या उत्पादनासाठी कच्चा माल देण्यास अमेरिका तयार

Latest News

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 14, 2025
कर्नाटकातील १२ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरांवर लोकायुक्तांनी टाकले छापे
देश - विदेश October 14, 2025
शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल – लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
देश - विदेश October 14, 2025
धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव
महाराष्ट्र October 14, 2025
धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
महाराष्ट्र October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?