माढा : माढा शहरातील एका व्यापाऱ्याच्या संपर्कात आलेल्या आणि पॉझिटिव्ह निघालेल्या इतर व्यक्तींच्याही संपर्कातील एकूण 29 जणांच्या आज रॅपिड अॅटिजन टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये 14 जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. यामुळे माढा शहरात मोठे भीतीचे वातावरण पसरले असून माढा ग्रामीण रुग्णालय आणि नगरपंचायतीच्यासमोर आता मोठे आव्हान उभे राहिले आहे.
माढा शहरातील व्यापाऱ्यासह शहरातील दुसऱ्या मयत व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तीची रॅपिड अॅटिजन टेस्ट करण्यात आली. यामध्ये 14 व्यक्ती पाॅझीटीव्ह आल्या असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. सदानंद व्हनकळस यांनी दिली.
तुमचे हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
एकूणच शुक्रवार पेठ, साठे गल्ली आणि शिवाजी नगर व उपळाई रोड वरील एका हाॅटेलच्या जवळच्या भागातील हे रूग्ण असल्याने माढा शहरात सर्वत्रच कोरोनाचा फैलाव दिसून आल्याने नागरिकांमध्ये मोठी भीती पसरली आहे.
आज अखेर माढ्यामध्ये 18 रूग्ण असून कुर्डूवाडी येथील हेल्थ सेंटर तसेच खाजगी रूग्णालयात उपचार घेत आहेत. तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या 200 च्या पुढे गेली आहे. आजपर्यंत 6 जणांना यामध्ये आपला जीव गमवावा लागला आहे.