बीड, 16 ऑक्टोबर। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी बीड येथे सकल ओबीसी – भटके विमुक्त महा एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी बीडमध्ये जोरदार तयारी सुरू आहे.
मेळाव्याला ओबीसी समाज बांधवांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे यासाठी संघटनेतील नेत्यांनी विविध गावांमध्ये प्रबोधन मोहीम राबवली आहे. श्री सुघोष भैया मुंढे, श्री परमेश्वर महाराज वाघमोडे, राजेंद्र विटकर, बापू गाडेकर यांनी मौजे गोविंद वाडी, केकत पंगरी, रोहितल, डोईफोडवाडी या ठिकाणी जाऊन ओबीसी व भटके विमुक्त मुस्लिम मागासवर्गीय समाजाला सभेला उपस्थित राहण्यासाठी बैठका घेतल्या आहेत व प्रबोधन केले आहे.
या महा एल्गार मेळाव्यात ओबीसी समुदायाच्या विविध समस्यांवर चर्चा होणार असून, समाज बांधवांना एकत्रित करणे हे या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.