Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: महाड इमारत दुर्घटनेत माणुसकीला महत्त्व देत अविरतपणे ‘किशोर’ ने चालविले 26 तास पोकलेन; मृतांची संख्या 15
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

महाड इमारत दुर्घटनेत माणुसकीला महत्त्व देत अविरतपणे ‘किशोर’ ने चालविले 26 तास पोकलेन; मृतांची संख्या 15

Surajya Digital
Last updated: 2020/08/27 at 4:03 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

रायगड : महाड इमारत दुर्घटनेत माणुसकीला महत्त्व देत किशोर लोखंडे याने तहान, भूख, झोपेला फाटा देऊन अविरतपणे तब्बल 26 तास पोकलेन चालवित ढिगारा दूर केला. किशोर हा बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील उखंडा लिंबडेवी या ठिकाणचा आहे. या दुर्घटनेनंतर एनडीआरएफ, अग्निशमन दल, विविध स्वयंसेवी संस्थांनी बचावकार्यात पुढाकार घेतला.

महाडमध्ये इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. तारिक गार्डन ही पाच मजली इमारत 24 ऑगस्टला संध्याकाळच्या सुमारास कोसळली. या दुर्घटनेला 40 तास उलटल्यानंतर हे शोध कार्य संपलं. या दुर्घटनेतील बचावकार्याला गती देण्यासाठी माणुसकीला महत्त्व देत अविरतपणे एका रिअल हिरोने तब्बल 26 तास पोकलेन चालवलं आहे. किशोर भागवत लोखंडे (24) असे या व्यक्तीचे नाव आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

या बचावकार्यात गती यावी यासाठी किशोरने तब्बल 26 तास अविरतपणे पोकलेन चालवलं. या खऱ्या नायकाने प्रशंसनीय असे काम केले. त्यामुळे महाड दुर्घटनेनतंर शोधकार्यात तो खरा रिअल हिरो ठरला. त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. महाडमध्ये इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 7 पुरुष आणि 8 महिलांचा समावेश आहे.  या इमारतीत 41 कुटुंब राहत होते.

पुण्याहून एनडीआरएफची तीन पथकं महाडला दाखल झाल्यानंतर मदत कार्याला आणखी गती मिळाली. घटनास्थळी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कुटुंबाना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. 8 तव, 10 जेसीबी, 4 पोखलेन तसेच, 15 डंपरच्या साहाय्याने मातीचा ढिगारा हटवण्यात आला. बचाव कार्यात साळुंखे ग्रुप, महाबळेश्वर ट्रेकर्स ग्रुप, ठाणे डिझास्टर मॅनेजमेंट फार्स, कोल्हापूर रेस्क्यू टीम या संस्थांचा मोलाचा वाटा आहे.

महाड शहर पोलीस ठाणे हद्दीत काजलपुरा भागात 05 मजली इमारत सायंकाळी सातच्या सुमारास कोसळली. या इमारतीचं नाव तारीक गार्डन असं होतं. यामध्ये 45 ते 47 फ्लॅट होते. या दुर्घटनेत अनेक रहिवाशी अडकले होते. त्यानंतर प्रशासनाने युद्ध पातळीवर बचाव कार्य करण्यास सुरुवात केली. यातील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे.

तब्बल पाच मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली. इमारतीचा पाया खचल्यामुळे ती आहे तशीच खाली बसली. एखादी इमारत तयारी करुन पाडली जाते, अगदी तसंच वाटावं, अशी ही इमारत जागच्या जागी खाली बसली. इमारतीचा राडारोडा उपसण्यासाठी दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. स्थानिकांनी हा ढिगारा उपसण्याचं काम सुरु केलं आहे

इमारत कोसळल्यामुळे मोठा ढिग निर्माण झाला आहे. हा ढिग बाजूला सारायला अडचणी येत आहेत. स्थानिकांनी तातडीने जेसीबी लावून ढिगारा उपसण्याचं काम सुरु केलं. हा ढिगारा उपसायला जवळपास दीड ते दोन दिवस लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतरच खरी परिस्थिती कळेल, असे सांगण्यात येत आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #महाडइमारत #दुर्घटना #किशोर #26तास #पोकलेन #15मृत्यू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article गौराईबरोबर इतिहास घडविलेल्या पाच रणरागिणीची विरवडे बुद्रुकमध्ये प्रतिष्ठापना
Next Article सुशांतसिंह प्रकरणात रियाने नष्ट केले पुरावे; अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून रियावर गुन्हा दाखल

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?