पीडित पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांची अंबादास दानवे यांच्याकडे धाव
छत्रपती संभाजीनगर, 1 ऑगस्ट – परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्याकांडाला तब्बल 21 महिने उलटूनही दोषींना अटक झालेली नाही. त्यामुळे अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेट घेतली.
ज्ञानेश्वरी मुंडे यांनी परळी येथील पोलीस यंत्रणेच्या निष्क्रीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, “आजवर मला न्याय मिळालेला नाही” अशी खंत व्यक्त केली.