Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: महाराष्ट्र–जर्मनी सहकार्यास नवे आयाम मिळतील – उपमुख्यमंत्री अजित पवार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

महाराष्ट्र–जर्मनी सहकार्यास नवे आयाम मिळतील – उपमुख्यमंत्री अजित पवार

admin
Last updated: 2025/10/01 at 5:04 PM
admin
Share
1 Min Read
SHARE
  • जर्मनीचे वाणिज्यदूत-जनरल यांनी घेतली उपमुख्यमंत्री पवारांची सदिच्छा भेट

मुंबई, 1 ऑक्टोबर : जर्मनीचे वाणिज्यदूत यांच्या शिष्टमंडळाने आज सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांची सदिच्छा भेट घेतली. या बैठकीत महाराष्ट्र–जर्मनी सहकार्याच्या विद्यमान प्रकल्पांचा आढावा घेऊन महाराष्ट्र–बॅडन वुर्टेम्बर्ग भागीदारी, कौशल्य स्थलांतर व व्यावसायिक प्रशिक्षण कराराची प्रगती, तसेच भाषा प्रशिक्षणासह विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. या शिष्टमंडळात जर्मनीचे वाणिज्यदूत ख्रिस्तोफ हॅलियर व जर्मनीचे उपवाणिज्यदूत ख्रिस्तोफ रेंडटॉर्फ यांचा समावेश होता.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, येत्या काळात महाराष्ट्र आणि जर्मनी यांच्यात हरित ऊर्जा, शाश्वत गतिशीलता, स्मार्ट सिटी, संशोधन व स्टार्टअप इकोसिस्टीम, उच्च शिक्षण देवाणघेवाण आणि सांस्कृतिक संबंध विस्तार या क्षेत्रांत सहकार्य वाढविण्यासाठी महाराष्ट्र–जर्मनी संयुक्त संचालन समिती स्थापन करणे आवश्यक आहे.

तसेच जर्मन उद्योजकांना महाराष्ट्रात गुंतवणूक करताना भासणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य सरकारकडून आवश्यक ती मदत करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. जर्मनीत महाराष्ट्रातील युवकांना रोजगाराच्या संधी वाढविणे, तसेच जर्मनीत शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबतही त्यांनी शिष्टमंडळाचे लक्ष वेधले. या सहकार्यामुळे महाराष्ट्राला प्रगत तंत्रज्ञान, कौशल्य वृद्धी, रोजगार निर्मिती व विदेशी गुंतवणूक लाभेल, तर जर्मनीला विश्वासार्ह भागीदारी व नवीन बाजारपेठ उपलब्ध होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article हमासने शांती कराराला मान्यता न दिल्यास अत्यंत गंभीर परिणाम होतील – ट्रम्प
Next Article भामरागडमध्ये घातपातासाठी रेकी करणाऱ्या कट्टर नक्षल समर्थकाला अटक

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?