Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कोकणची ‘काजू’ सोलापूरच्या शिवारात पश्चिम महाराष्ट्रातील पहिलीच यशस्वी काजूबाग
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsशिवारसोलापूर

कोकणची ‘काजू’ सोलापूरच्या शिवारात पश्चिम महाराष्ट्रातील पहिलीच यशस्वी काजूबाग

Surajya Digital
Last updated: 2023/02/03 at 8:33 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

Contents
□ शेजबाभळगावच्या शशिकांत पुदेंची किमयासोलापूर / शिवाजी हळणवर : जिल्ह्यातील मोहोळ सारख्या तालुक्यात चक्क काजुची बाग बहरली आहे. ती ही सेंद्रिय खताच्या वापरावर ….वाटले ना आश्चर्य… पण खरंय. वाचा सोलापूरची शेतक-याची सक्सेस स्टोरी. ‘Cashew’ of Konkan The first successful cashew orchard in West Maharashtra Mohol Shejbabhalgaon on the outskirts of Solapurस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)○ काजू कल्पवृक्ष

□ शेजबाभळगावच्या शशिकांत पुदेंची किमया

सोलापूर / शिवाजी हळणवर : जिल्ह्यातील मोहोळ सारख्या तालुक्यात चक्क काजुची बाग बहरली आहे. ती ही सेंद्रिय खताच्या वापरावर ….वाटले ना आश्चर्य… पण खरंय. वाचा सोलापूरची शेतक-याची सक्सेस स्टोरी. ‘Cashew’ of Konkan The first successful cashew orchard in West Maharashtra Mohol Shejbabhalgaon on the outskirts of Solapur

 

 

काजुची बाग केवळ समुद्र किनारी आणि मुबलक प्रमाणात पाणी असलेल्या भागातच पाहवयास मिळते. पण मोहोळ तालुक्यातील शेजबाभळगाव येथील उद्यानपंडीत असणाऱ्या शेतकऱ्याने दीड एकरामध्ये ही किमया केली आहे. अथक परिश्रम आणि योग्य नियोजन यावरच बाग मोठ्या डोलाने बहरत आहे. दीड एकरातील १४० झाडापासून दोन ते तीन लाखाचे उत्पन्न शेतकऱ्याच्या पदरी पडत आहे.

 

सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणामुळे पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असल्याने बहुतांश शेतकरी ऊस शेती करतात. ऊसाबरोबर द्राक्ष, डाळिंब, केळी यासारख्या नगदी फळपिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे तर पाणी उपलब्ध नसलेल्या शेतकऱ्यांचा भर हा पारंपरिक पिकावरच राहिलेला आहे. काळाच्या ओघात ऊसाचे क्षेत्र वाढत आहे पण पुदे यांनी पश्चिम महाराष्ट्रात पहिली काजू लागवड करून ते यशस्वी उत्पादन घेत आहेत.

 

कोकणातून वेंगुर्ला ४ वेंगुर्ला ७ या जातीची काजूची रोपे आणून त्याची लागवड केली होती. सुरवातीस कमी काजू उत्पादन मिळाले परंतु तीन वर्षानंतर एका झाडापासून १० किलो काजू मिळत असून १ किलो काजू ९०० रूपये या दराने विक्री केली जात आहे. कोणतीही प्रक्रिया न करता ही काजू पैलवान व बागेस भेट देणाऱ्यासह बाजार विकली जातात. काजुच्या झाडांची वाढ होण्यासाठी दमट हवामान अनुकूल असले तरी मोहोळ भागातही काजु उत्तमरित्या बहरतात हे दाखवून दिले आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

 

केवळ काजूच नाही तर त्यांच्या शेतामध्ये आंबा,चिक्कू,नारळ पेरु, दालचिनी सह मसाल्याची पिके अशी एक ना अनेक झाडे आहेत. सुरवातीच्या काळात त्यांनी अथक परीश्रम करीत तळहाताच्या फोडाप्रमाणे झाडांची जोपासना केली आहे.

 

काजूच्या शेतीला अधिकचे पाणी लागते असे नाही. केवळ नियमित वेळी जेमतेम पाणी दिल्यास बहरते. पाण्याबरोबरच वर्षातून दोन वेळा फवारणी ही व शेणखताच्या वापरावर केला जातो. बागेसाठी सुपिक जमीन आणि मुबलक पाणी असावे लागते हा येथील शेतकऱ्यांचा गैरसमज झालेला आहे. उलट निचरा होणारी किंवा खडकाळ जमिनीवरच काजुची बाग बहरत असल्याचे सांगत त्यांनी आरोग्य चांगले ठेवायचे असेल सेंद्रिय शेती ही काळाची गरज असल्याचा सल्ला ही शेतकऱ्यांना दिला आहे.

 

 

○ काजू कल्पवृक्ष

काजूचे झाड हे कल्पवृक्ष असून याच्या ‘गराचा’ उपयोग खाण्यासाठी ड्रायफ्रूट म्हणून केला जातो तर टरफलापासून तेल काढून त्याचा उपयोग सागवानी दरवाज्यांना कलर दिला जातो आणि बोंडापासून ‘फेणी’ बनविले जाते त्याचा उपयोग ‘किडणी’ सारख्या आजारावर केला जातो.

 

ही बाग केवळ सेंद्रिय खताचा वापर करून करीत आहे. यासाठी मी ११ खिलार गाईंचे संगोपन केले असून त्यांच्या शेणखत व गोमुत्र याच्या वापर करीत आहे. माझ्या कडे २८ जातीचे आंबे आहेत तर सुपारी,फणस, जायफळ, काळीमिरी, दालचिनी व मसाल्याच्या सर्व झाडांची लागवड केली असून राज्य सरकारने याची दखल घेऊन मला ‘उद्यानपंडित’ हा पुरस्कार ही दिला असल्याचे शशिकांत पुदे (शेजबाभळगाव ता. मोहोळ) यांनी सांगितले.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Cashew #Konkan #first #successful #cashew #orchard #West #Maharashtra #Mohol #Shejbabhalgaon #outskirts #Solapur, #कोकण #काजू #सोलापूर #शिवार #पश्चिम #महाराष्ट्र #पहिली #यशस्वी #काजूबाग
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूरसह तीन विद्यापीठांच्या परीक्षा झाल्या स्थगित
Next Article Maratha youth मराठा तरूणांना मॅटचा धक्का; सरकारी नोकर भरतीत ईडब्ल्यूएस अंतर्गत संधी नाही

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?