Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राज्यात अचानक पावसाची हजेरी, बळीराजाची वाढली धाकधूक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रशिवार

राज्यात अचानक पावसाची हजेरी, बळीराजाची वाढली धाकधूक

Surajya Digital
Last updated: 2021/01/05 at 9:00 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात अचानक पावसाने हजेरी लावल्याने बळीराजाची धाकधूक वाढली आहे. रिमझिम पाऊस सुरू असल्यामुळे रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.

ऐन हिवाळ्यात पावसाने एन्ट्री घेतल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. मात्र, असे वातावरण पुढचे काही दिवस राहणार असून ढगाळ वातावरणासह अनेक ठिकाणी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

राज्यात गेल्या महिन्याभरापासून थंडीचा जोर वाढला आहे. पण अचानक हवामानात बदल होऊन राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. आज सकाळपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पुढचे काही दिवस राज्यात ढगाळ वातावरण असून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याच्या या अंदाजामुळे शेतकऱ्यांची धाकधूक आणखी वाढली आहे. रिमझिम पाऊस सुरू असल्यामुळे रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

राज्यातील अनेक जिल्ह्यात तुरळक पावसाला सुरुवात झाली आहे. सर्वत्र ढगाळ वातावरण असल्यामुळे हवेतला गारवा कमी झाला. अशा अवेळी पावसामुळे रब्बी पिकांना पुन्हा फटका बसला आहे. त्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात अडकला आहे. हेच वातावरण पुढचे काही दिवस असणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

लासलगावात काल दिवसभर ढगाळ वातावरण होते. मात्र मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास अचानक पावसाने हजेरी लावली. पाच ते सात मिनिटे झालेल्या पावसाने काढणीला आलेल्या द्राक्ष ,कांदा , हरभरे तसेच गहू पिकाला फटका बसण्याच्या शक्यता आहे. त्यामुळे बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे. शेतातील काढून ठेवलेला कांदा भिजल्याने कांद्याच्या बाजार भावावर परिणाम होत आर्थिक फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे

* अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान

सततच्या ढगाळ वातावरण आणि धुक्यामुळे निम्म्यापेक्षा अधिक कांद्याचे रोप खराब झाले तर लागवड केलेला उन्हाळ कांद्यावर मावा, करपा या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढत चालला असून मोठ्या प्रमाणावर कांदे मरत आहे. तर दुसरीकडे गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे विदर्भ, मराठवाड्यात कपाशी आणि सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यानंतर झालेल्या नुकसानीतून स्वतःला सावरत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हरभरा आणि गव्हाची पेरणी केली आहे. मात्र, पुन्हा अवकाळी पावसाचे वातारण तयार झालं असून मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा शेतकऱ्यांच्या छातीत धडकी भरवणारा आहे.

* राज्यात पुढील काही दिवस पावसाचा अंदाज

राज्यात 6 ते 7 जानेवारीला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात हलक्या सरींच्या पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. तसेच महाराष्ट्रातील किमान तापमानात येत्या 3 ते 4 दिवसांत घट होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे राज्यासह संपूर्ण उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात थंडी पडली आहे. संपूर्ण उत्तर भारत थंडीमुळे गारठला आहे.
राज्यात 6 ते 7 जानेवारीला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात हलक्या सरींच्या पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. तसंच महाराष्ट्रातील किमान तापमानात येत्या 3 ते 4 दिवसांत घट होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे राज्यासह संपूर्ण उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात थंडी पडली आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #राज्यात #अचानक #पावसाची #हजेरी #बळीराजाची #वाढली #धाकधूक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कायदे मागे घेतल्याशिवाय घरवापसी नाही, सातवी बैठकही निष्फळ, सरकारी जेवण नाकारले
Next Article प्रेयसीवर गोळ्या झाडून प्रियकराचीही आत्महत्या, मालाड परिसरातील थरार

Latest News

Как чувство риска помогает почувствовать себя энергичным
Top News December 16, 2025
Почему мы нравится мониторить за чартами
Top News December 16, 2025
По какой причине человекам приятно следить за процессом чужим опасностью
Top News December 16, 2025
Genießen Sie die handheld App von Spingranny Casino für Casino-Spiele in Deutschland
Top News November 3, 2025
Lemon Casino – Word nu lid en spin voor levensveranderende prijzen
Top News November 3, 2025
Kifizetések és befizetések a Shuffle Játékteremben Magyarországon
Top News November 3, 2025
Kraken Casino – Türkiye Oyuncuları İçin Premium Bir Çevrimiçi Casino
Top News November 3, 2025
Spielen Sie Live-Spiele und erzielen Sie sofort über das Spingranny Casino
Top News November 3, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?