खास प्रतिनिधी
सोलापूर : जगप्रसिद्ध मेंदू विकार तज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांनी शुक्रवार (ता.18) रोजी डोक्यात स्वत: गोळ्या घालून आत्महत्या केली होती. ही घटना अद्याप ताजी आहे. त्यांच्या आत्महत्येचा उलगडा अजून झालेली नाही, तोपर्यंतच सोलापुरात डॉ.वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयामधील 24 वर्षीय शिकावू डॉ. आदित्य नमबियार या तरुण डॉक्टरने होटगी रस्त्यावरील द्वारका अपार्टमेंटमधील आपल्या फ्लॅट नंबर 105च्या बाथरुमध्ये चाकू आणि कात्रीच्या साहाय्याने गळा हाताच्या शिरा कापून आत्महत्या केल्याची अत्यंत धक्कादायक अन् तितकीच खळबळजक घटना मंगळवारी (ता.29) सकाळी समोर आली.
दरम्यान, आत्महत्या केलेल्या डॉ. आदित्य नमबियार याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात करण्यात आले असून मृत डॉ.आदित्यच्या हादवरून सोडणार्या आत्महत्येच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर, डॉ. वैशंंपायन स्मृती शासकीय महाविद्यालयामधील डॉक्टर मंडळींनी शासकीय रुग्णालयात धाव घेतली. मुळ मुंबईमधील वेरुळ परिसरात रहिवाशी असलेल्या डॉ. आदित्य याने एमबीबीएसचे शिक्षण नुकतेच पूर्ण केले होते. तो येथील शासकीय रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणून वैद्यकीय सेवा करु लागला होता. याच टप्यावर त्याने मंगळवारी गळा आणि हाताच्या नसा कापून स्वत:ला संपविले. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी व्यसन, नैराश्य, कौटुंबिक कलह, प्रेम विरह की अन्य काय? या अँगलने विजापूर नाका पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवायला चालू केली आहेत. दारुसह अन्य व्यसने त्याला होती, नशेतून त्याने स्वत:ला संपविल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
डॉ. आदित्यच्या आत्महत्येबद्दल मित्र परिवारात वेगळीच कुजबुज
24 वर्षाच्या मुंबईस्थित डॉ. आदित्य याच्या आत्महत्येबद्दल त्याच्या मित्र परिवारात वेगळीच कुजबूज होती. एकलकोंडा स्वभावाच्या डॉ. आदित्याला वेगवेगळी व्यसने जडली होती.त्यातून तो व्यसनाधीन बनला होता. व्यसनाधीन होण्याच्या कारणातूनच त्याने स्वत:ला संपविण्याचा अविचारी निर्णय घेतला असावी, असा बोलबाला त्याच्या मित्र परिवारात होता.
डॉ. आदित्य दारु अन् ड्रग्ज व्यसनाच्या दलदलीत…
स्वत:ला संपविण्याचे अगदी टोकाचे आणि शेवटचे पाऊल उचललेला अवाहित तरुण डॉ. आदित्य हा दारु अन् ड्रग्ज व्यवसनाच्या दलदलीत फसला होता. त्याच्या मित्रांनी या दलदलीमधून त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्नदेखील केले होते, मात्र तो बाहेर येऊ शकला नाही, असा सूर त्याच्या मित्र परिवारात मंगळवारी होता.
सकाळी सकाळीच ‘या’ किंकाळ्या कानावर,
द्वारका अपार्टमेंटमधील सगळ्यांच्या पायाखालची सरकली जमीन
मंगळवारी सकाळी होटगी रस्त्यावरच्या द्वारका अपार्टमध्ये इथं वास्तव्यास असलेल्यांचं सगळं काही रुटीन सुरु होतं. अशातच बचाव…बचाव…अशा कर्णकर्कश किंकाळ्या अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमधून ऐकायला आल्या.अपार्टमेंटमधील रहिवाश्यांना सुरुवातीला काहीच कळेना. नेमका काय प्रकार? मात्र डॉ. आदित्यच्या अगदी शेजारच्या फ्लॅटमधील लोकांना किंकाळ्याचा आवाज अगदी स्पष्ट जाणवला. तद्नंतर त्यांनी फ्लॅटमधील अन्यजणांना माहिती दिली. सगळ्यांनी जाऊन पाहिले असता डॉ. आदित्यच आत्महत्येचा प्रकार दिसला.
रक्ताच्या थारोळ्यातील डॉ. आदित्य
अन् बाथरुममध्ये अक्षरश: रक्ताचे वाहिलेले पाट
द्वारका अपार्टमेंटमधील ज्या बाथरुममध्ये डॉ. आदित्य याने आत्महत्या केली ते बाथरुम पोलीस, शेजारी तसेच डॉ. आदित्य याचे मित्र यांनी जेव्हा उघडले तेव्हा तो रक्ताच्या अक्षरश: थारोळ्यात निपचित पडला होता. गळा आणि मनगटाची नस कापल्याचे सर्व संबधितांना दिसून आले. गळा आणि मनगटाची नस कापण्यातून बाथरुममध्ये रक्ताचे पाट वाहिलेले दिसले. मंगळवारी सकाळी 8 वाजून 50 मिनिटांनी घटना घडली. 11 वाजून 40 मिनिटांनी विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात नेला. उपचारापूर्वीच तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
आयुष्याला सुरुवात होण्याआधीच आयुष्याचा शेवट
डॉ.आदित्य नमबियार याचे वैद्यकीय शिक्षण सोलापूरमधील डॉ. वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात झाले आहे. नमबियार याने एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नुकतेच शिकाऊ डॉक्टर म्हणून सेवेला सुरुवात केली होती. मात्र, नमबियार याने आयुष्याला सुरुवात होण्याआधीच शेवट करून घेतला आहे.
यशस्वी करिअर बघण्याचे सोडून
पोटच्या गोळ्याचा मृतदेह पाहण्याची माता-पित्यावर वेळ
एमबीबीएस पदवी उत्तीर्ण झालेल्या आदित्यबद्दल आई-वडिलांना प्रचंड अभिमान होता. मुलगा डॉक्टर झाल्याचा त्यांना मनस्वी अभिमान आणि आनंद होता. त्याचे वैद्यकीय क्षेत्राती यशस्वी करिअर त्याच्या आई-वडिलासह बहिण आणि भाऊजीला बघायचं होते. मात्र त्याऐवजी आदित्यचा मृतदेह पाहण्याची दूर्देवी वेळ त्याच्या सर्व नातेवाईकावर आली.
डॉ. आदित्यचे वडिल सेवानिवृत्त नेव्ही ऑफिसर,
आई गृहिणी, बहिण बेंगलोरमध्ये निवासी
डॉ. आदित्य याचं कुंटुंब हे मुळचे केरळ राज्यातील आहे. मात्र वडिल नेव्हीमध्ये ऑफिसर असल्याने ते मुंबईमधील वेरुळ परिसरात वास्तव्यास आहेत. आई गृहिणी आहे तर आदित्यची बहिण ही बेंगलोरला वास्तव्यास आहे. आदित्य हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.
-डॉ. आदित्य याने फ्ॅलटमधील सगळे दरवाजे लावून घेऊन
स्वत: आत्महत्या केल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट
– घटनास्थळी चाकू आणि कैची अशी धारदार शस्त्रे
आढळून आल्याची पोलिसांची माहिती
– मंगळवारी संध्याकाळी पावणेआठ वाजण्याच्या दरम्यान
डॉ. आदित्यच्या पार्थिवाचे झाले शवविच्छेदन
– डॉ. आदित्यचा व्हिसेरा डॉक्टरांनी ठेवला राखून
– मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान
डॉ. आदित्यचा मृतदेह दिला आई-वडिलांच्या ताब्यात
कोट
एमबीबीएस पदवी घेतलेला डॉ. आदित्य नमबियार हा सोलापुरच्या शासकीय रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणून कार्यरत होता. राहत्या फ्लॅटच्या बाथरुमध्ये त्यांनं मान आणि हाताच्या नसा कापून घेऊन आत्महत्या केली आहे. घटनास्थळी आढळलेल्या चाकू आणि कात्रीने कापून घेऊन त्याने स्वत:ला संपविले असावे. आत्महत्येचे ठोस कारण आत्ताच सांगता येणार नाही, तपास सुरु आहे. मात्र नशितेतून त्याने हा प्रकार केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.एकलकोंडी स्वभावाचा आणि अत्यंत व्यसनाच्या गर्तेत तो गेलेला होता, अशी माहिती मिळाली आहे. तपासाअंती अधिक माहिती देता येईल.
: अशोक तरंगे, पोलीस निरीक्षक, विजापूर नाका पोलिस ठाणे, सोलापूर