Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: महाराष्ट्रातही भगवा फडकवणार; देवेंद्र फडणवीसांचे नागपुरात जंगी स्वागत
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

महाराष्ट्रातही भगवा फडकवणार; देवेंद्र फडणवीसांचे नागपुरात जंगी स्वागत

Surajya Digital
Last updated: 2022/03/17 at 9:51 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

□ विमानतळ ते गडकरी निवासस्थान अंतर कापण्यासाठी लागले दोन तास

नागपूर : गोवा विधानसभा निवडणूकीत भाजपला मिळालेल्या यशाबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी कौतुक केले आहे. लोकं ही जाती धर्मापेक्षा विकासाला मतदान करतात. आपण जातीवाद करत नाहीस, असं नितीन गडकरी म्हणाले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाबद्दल लोकांनी दिलेली ही पोचपावती आहे. येत्या निवडणूकीत महाराष्ट्रातही भगवा फडकवल्या शिवाय राहणार नाही, असंही नितीन गडकरी म्हणाले.

गोव्यातील भाजपच्या कामगिरीबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सत्कार सोहळ्यामध्ये ते बोलत होते.

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर अशा चार राज्यांत भारतीय जनता पक्षाने बाजी मारली. गोवा विधानसभा निवडणुकीत विजयाचे शिल्पकार ठरले. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गोव्यात बहुमताने सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदाच नागपुरात आले. त्यांच्या जंगी स्वागत करून रॅली काढून भाजपकडून शक्तिप्रदर्शन केले.

विमानतळावर देवेंद्र फडणवीस यांचे हजारो कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. भगवे व निळे फेटे घाललेले, महिला-पुरुष, तरुण-तरुणींनीच्या, डोक्यावर भाजपाची टोपी, गळ्यात पक्षाचा दुपट्टा तसेच हातात पक्षाचे झेंडे तसेच पंखे होते. भारत मातेच्या जयजयकाराने हा परिसर दणाणून गेला. ‘देवेंद्र फडणवीस आगे बढो’ घोषणाही कार्यकर्ते देत होते. बाभुळगाव बँडच्या तालावर कार्यकर्ते नाचत होते. महिलांनी फुगड्याही खेळल्या.

देवेंद्र फडणवीस स्वागताचा स्वीकार करून विजयरथावर स्वार झाले. खा. विकास महात्मे, चंद्रशेखर बावनकुळे, कृष्णा खोपडे, प्रवीण दटके, समीर मेघे, परिणय फुके, विकास कुंभारे, टेकचंद सावरकर हे आमदार, दयाशंकर तिवारी, गिरीश व्यास व इतर पदाधिकारी त्यांच्यासोबत होते. तेथून मिरवणूक पुढे निघाली. दोन हजार दुचाकीस्वार युवक-युवती मिरवणुकीत होत्या. Saffron will be spread in Maharashtra too; Welcome to Devendra Fadnavis in Nagpur

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

विमानतळ ते नितीन गडकरींचे निवासस्थान एवढे अंतर कापायला या मिरवणुकीला दोन तास लागले. देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी गेले. कांचन गडकरी यांनी या दोघांचेही औक्षण केले. त्यानंतर देवेंद्र यांनी तेथील श्री रेणुका मातेचे दर्शन घेऊन तिचे व नितीन गडकरींचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर दोघेही सोबतच खाली स्वागत सभास्थळी आले.

यावर गडकरी म्हणाले कि, निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस होते तर मुख्यमंत्री प्रमोद सावंत होते. दोघांच्या नेतृत्वाखील अभूतपूर्व यश मिळालं,’ अशा शब्दांत नितीन गडकरींनी फडणवीसांचे कौतुक केलं आहे. तसंच, विजयाची पताका महाराष्ट्रात फडकेल. गेल्यावेळी महापालिकेत जे यश मिळाले त्यापेक्षा मोठे यश यावेळी मिळवू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी बोलत असताना त्यांनी सांगितले की, गोवा निवडणुकीमध्ये जनतेने भाजपला बहुमत दिले. जनतेने भाजपवर विश्वास दाखविला आहे. गोव्यासह चार राज्यांमध्ये भाजपला अभूतपूर्व यश मिळाले आहे. पुढे असेही म्हणाले की, मोदीजींनी केलेल्या चांगल्या कामावर जनतेने शिक्कामोर्तब केले आहे. जातीयवादावर राजकारण आपण करत नाही. लोक जाती धर्म यापेक्षा विकासाला मत देतात.

आगामी 2024 च्या निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करेल, असा विश्‍वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभेत व्‍यक्‍त केला. देशात भाजपची शक्ती वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृष्टीकोन सकारात्मक आहे. त्यांच्या नेतृत्वात आणि गोव्यातील सर्व भाजपच्या सदस्यांच्या मेहनतीमुळेच गोव्यात भाजपची एक हाती सत्ता आली आहे. त्यांच्या वतीनेच मी आज हा सत्कार स्वीकारत असल्याचे फडणवीस म्हणाले.

You Might Also Like

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन

अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन

अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे

शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री

महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी

TAGGED: #Saffron #spread #Maharashtra #too #Welcome #DevendraFadnavis #Nagpur, #महाराष्ट्र #भगवा #फडकवणार #देवेंद्रफडणवीस #नागपूर #जंगी #स्वागत
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ठाकरे सरकारकडून होळी, धुळवडीवरील निर्बंध मागे
Next Article पंजाबच्या नवीन मुख्यमंत्र्याची घोषणा, व्हॉट्सॲपवर करा भ्रष्टाचाराच्या तक्रारी

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?