Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: महाशिवरात्री : भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह सोहळा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
ब्लॉग

महाशिवरात्री : भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह सोहळा

Surajya Digital
Last updated: 2021/03/11 at 9:46 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

महाशिवरात्री हा महादेव आणि माता पार्वतीच्या विशेष पूजेचा दिवस असतो. दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री येते. आज महाशिवरात्री साजरी केली जात आहे. असे मानले जाते की, या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचे लग्न झाले होते.

महादेव अर्थात शंकर भगवान रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतात. शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला ‘महाशिवरात्री’ असे म्हणतात. माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते. यंदा ही महाशिवरात्र 11 मार्च रोजी आली आहे. या दिवशी शंकराची पूजा करून, बेल अर्पण करुन आणि दुधाचा अभिषेक करुन त्याची पूजा करतात. यंदाही महाशिवरात्रीसाठी शिवभक्तांमध्ये प्रचंड उत्साह आहे. मात्र कोरोनाच्या सावटामुळे शिवभक्तांना मर्यादा पडल्या आहेत.

या दिवशी विधिवत पूजा केली गेली तर, महादेव खूप आनंदी होतात आणि भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. जर, तुम्हीही या दिवशी महादेव-पार्वतीसाठी उपवास ठेवला असेल, तर त्यांच्या पूजेच्या वेळी इथे नमूद केलेल्या गोष्टी लक्षात ठेवा. जेणेकरून, महादेव आणि माता पार्वती प्रसन्न होतील आणि त्यांचे आशीर्वाद लवकर प्राप्त होतील.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

शिवचंद्रमोळी येथे आजही महाशिवारात्रीला शिव-पार्वतीचे विधिवत लग्न लावले जाते. देवाच्या या लग्नाचे साक्षीदार होण्यासाठी भाविकांची १०० पेक्षा अधिक गावांतून शिवमंदिरात एकच गर्दी जमते. मंगलाष्टक म्हणून शिव-पार्वतीचे लग्न लावण्याची ही प्रथा शिवचंद्र मोळीवासी कित्येक वर्षांपासून जपत आहेत. अगदी पारंपरीक पद्धतीने आंतरपाठ व मंगलाष्टकांसह महादेवाचे पार्वतीशी लग्न लावणे हा या सोहळ्याचा महत्त्वपूर्ण भाग आहे.

कोरोनामुळे शिवपार्वतीचा विवाह हा कमी भाविकांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने होणार आहे तसेच महाशिवरात्रीला विधिवत पूजन, महाआरतीही अत्यंत कमी भाविकांच्या उपस्थितीतच करण्यात येणार आहे. यावेळी कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निर्देशित सर्व नियमांचे पालन करण्यात येणार आहे.

* एक शिवभक्त

You Might Also Like

गृहकलह… शरद पवारांचे वारसदार कोण  ?

राजकारणाचे उद्योग; उद्योगाचे राजकारण

आघाडीत बिघाडी… काँग्रेस-शिवसेनेच्या नव्या दोस्तीची सुरुवात

‘सततची तोंडपाटीलकी’ नडली… अदृश्य महाशक्ती सुद्धा तितक्याच ताकदीने काम करतीय

लगाम लावाच…आता नाही सहन होत…

TAGGED: #Mahashivaratri #Marriageceremony #LordShiva #Parvati, #महाशिवरात्री #भगवानशिव #मातापार्वती #विवाहसोहळा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अनुषाचा टॉपलेस फोटो, सोशल मीडियावर वातावरण गरम
Next Article महाशिवरात्री : श्री विठ्ठलास एक टन शेवंती फुले, बेलपत्रांची आरास

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?